हिंदूस्थान पेट्रोलिअम कार्पो. लि., मुंबई : २४७ इंजिनिअर्स पदांसाठी पदवी/उच्च पदवी/सीए इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३० जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – इंजिनिअर
शाखेनुसार पदविभागणी –
• पदाचे नाव – इंजिनिअर (मेकॅनिकल),
पदसंख्या – ९३
पात्रता – उमेदवार किमान ६० % (अजा/अज दिव्यांग (अपंग) – ५० % ) गुणांनी इंजि. पदवी (मेकॅनिकल/मेकॅनिकल ॲण्ड प्रॉडक्शन) उत्तीर्ण असावा.
• पदाचे नाव – इंजिनिअर (सिव्हिल),
पदसंख्या – १०
पात्रता – उमेदवार किमान ६० % (अजा/अज/दिव्यांग (अपंग) – ५० गुणांनी इंजि. पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा.
• पदाचे नाव – इंजिनिअर (इलेक्ट्रीकल),
पदसंख्या – ४३
पात्रता – उमेदवार किमान ६०% (अजा/अज/दिव्यांग (अपंग) – ५० % ) गुणांनी इंजि. पदवी (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.
• पदाचे नाव – इंजिनिअर (इन्स्ट्रूमेंटेशन),
पदसंख्या – ५,
पात्रता – उमेदार किमान ६०% (अजा/अज/दिव्यांग (अपंग) – ५० % ) गुणांनी इंजि. पदवी ( इन्स्टुमेंटेशन / इन्स्ट्रूमेंटेशन ॲड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स ॲड इन्स्टुमेंटेशन / इन्स्टुमेंटेशन ॲड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – चार्टड अर्कोट्स,
पदसंख्या – २९
पात्रता – उमेदवार सीए उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – क्वालीटी कंट्रोल ऑफीसर,
पदसंख्या – ९
पात्रता – उमेदवार एम.एस्सी (केमिस्ट्री – ॲनालीटिकल फिजिकल / ऑग्रॅनिक / इनऑग्रॅनिक) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वरील पदांसाठी जातीनुसार पदविभी – १९६ (ओपन ८५, ईडब्ल्युएस १९, ओबीसी ४५, अजा ३०, अज १७)
४) पदाचे नाव – सिनिअर ऑफीसर – सीटी गॅस डिस्ट्रीब्युशन ऑपरेशन्स ॲण्ड मेंटेनन्स,
पदसंख्या – ६
पात्रता – उमेदवार इंजि पदवी ( मेकॅनिकल / इलेक्ट्रीकल / इन्स्टुमेंटेशन/सिव्हील) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – सिनिअर ऑफीसर सीटी गॅस डिस्ट्रीब्युशन
पदसंख्या – ४
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हील) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वरील पदांसाठी जातीनुसार पदविभारणी – १० ओपन, ईडब्ल्युएस १, ओबीसी ३, अजा १, अज १)
वयोमर्यादा – दि ३० जून २०२४ रोजी पद क्रमांक १ साठी २५ वर्षापर्यंत, पद क्रमांक २ साठी २० वर्षापर्यंत, पद क्रमांक ३ साठी ३० वर्षापर्यंत, पद क्रमांक ४ व ५ साठी २८ वर्षात असावे. ओपन दिव्याग (अपंग) १० वर्ष, ओबीसी दिव्याग (अपंग) १३ वर्षे तर अजा/अज दिव्याग (अपंग) उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक ३ साठी ₹५००००१६००००/- पद क्रमांक ४ व ५ साठी ६००००-१८००००/- वेतन प्रदान केले जातील,
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ३० जून २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र मात्र अंतिम निवड प्रक्रीया पुर्ण होण्यापूर्वी अंतिम निकाल जाहीर होणे आवश्यक.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतील. पेपर १ मध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, आणि इंग्रजी भाषा या विषयांवर आधरित प्रश्न विचारले जातील तर पेपर २ मध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची प टेस्ट घेण्यात येईल. ग्रुप टेस्टमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा, ग्रुप टेस्ट आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन आणि कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या अजा/अज / दिव्यांग (अपंग) उमेदवारांना नियामप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रोबेशन कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹११८० (परीक्षा फी ₹१०००/- + जी.एस.टी ₹१८०) /- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज / अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक, यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.hindustanpetroleum.com या वेबसाईटवरून दि. ३० जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व बायोडाटा स्कॅन करून अपलोड करावा व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) पॅन कार्ड ७) आधार क्रमांक ८) बायोडाटा उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.hindustanpetrolium.com ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ३० जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या स्वसाक्षांकित व मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.