हिंदूस्थान एरोनॉटिक्स : एअर ट्रॅफिक कंट्रोल पदांसाठी इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १६ ऑक्टोबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – एअर ट्रॅफिक कंट्रोलर
पदसंख्या – ०९ (ओपन ५, ओबीसी ३, अजा १)
पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल अँण्ड इन्स्टुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन/इन्स्ट्रमेंटेशन अँण्ड कंट्रोल/इन्स्ट्रुमेंटेशन अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स/अँप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्फर्मेशन सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सिस्टीम्स/ इन्फर्मेशन सिस्टीम्स/इन्फर्मेशन सायन्स/सॉफ्टवेअर इंजि./कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजि.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. हिंदूस्थान एरोनॉटिक्स मध्ये अप्रांटिस पूर्ण केलेल्या उमेदवारांना अप्रांटिस कालावधीइतकी वयात सवलत. अनुभव असलेल्या व माजी सैनिक उमेदवारांना वयात ३५ वर्षांपर्यंत सवलत.
वेतन – उमेदवारांना रु.३०,०००-१,२०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उच्च पात्रताधारक उमेदवार अर्ज करण्यास अपात्र. ३) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजीची धरली जाईल. ४) दूरशिक्षण किंवा ई-लर्निंगद्वारे प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरली जाणार नाही.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट द्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा १३६ गुणांची आणि २ तास ३० मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये सामान्यज्ञान (१७ गुण), इंग्रजी आणि बुद्धीमत्ता (३४ गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (८५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. स्कील टेस्टमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.- ५००/- अशी असून ती नेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे परीक्षा फी भरू शकतात. अर्जाचा पहिला भाग भरल्यानंतर परीक्षा फी चलन प्राप्त होईल. अजा/अज/अपंग/माजी सैनिक/हिंदूस्थान एरोनॉटिक्समध्ये अप्रांटिस पूर्ण केलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी hal-india.co.in या वेबसाईटवरून दि. १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी स्टेटस ४८ तासांनी अपटेट होईल. यानंतर उमेदवारांना अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ६) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र.
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी hal-india.co.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १६ ऑक्टोबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सदरची भरती ४ वर्षे कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपाची आहे.