हिंदुस्थान एरोनॉटीक्स लि., हैद्राबाद : १२४ ट्रेड अप्रांटीस ट्रेनी पदांसाठी इंजि डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २३ व २४ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – इंजिनिअर ग्रॅज्युएट अप्रांटीस,
एकुण पदसंख्या – ६४,
शाखेनुसार पदविभागणी –
१) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजि. – ३०,
२) मेकॅनिकल इंजि. – १५,
३) इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजि. – १०,
४) सिव्हील इंजि. – २,
५) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. – ५,
६) एरोनॉटीकल इंजि. – २
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन इंजि. पदवी उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रांटीस,
एकुण पदसंख्या – ६४,
शाखेनुसार पदविभागणी –
१) इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजि. – १५,
२) मेकॅनिकल इंजि. – ६,
३) इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजि. – ५,
४) सिव्हील इंजि. – १,
५) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. – 8,
६) कमर्शिअल ॲण्ड कॉम्प्युटर प्रॅक्टीस – २,
७) फार्मसी – १
८) मेडीकल लॅब टेक्निशिअन – १
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन इंजि. डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रांटीस,
एकुण पदसंख्या – २५,
शाखेनुसार पदविभागणी –
१) बी.कॉम – १०,
२) बी.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) – १०,
३) बी.एस्सी (केमिस्ट्री) – १,
४) बी.एस्सी (कॉम्प्युटर्स) – ४,
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधुन पदवी उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना नियमानुसार विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी/अजा/अज/अपंग/माजी सैनिक (माजी सैनिक/माजी सैनिकांचे पाल्य /सैनिकांचे पाल्य) यांना पदसंख्येमध्ये नियमाप्रमाणे आरक्षण लागू राहील. ३) यापूर्वी अप्रांटीस पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
मुलाखतीचे वेळापत्रक
मुलाखतीचा दिनांक व वेळ
२३ मे २०२४ (सकाळी ९.०० वा.) – इंजिनिअरींग ग्रॅज्युएट
२४ मे २०२४ (सकाळी ९.०० वा.) – डिप्लोमा ट्रेनी
२४ मे २०२४ (सकाळी ९.०० वा.) – जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट अप्रांटीस
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेलद्वारे कळविले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. निवडीच्या वेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले एक ओळखपत्र (आधारकार्ड,पॅनकार्ड,ड्रायव्हींग लायसन्स इ.) व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. प्रथम उमेदवारांनी https:// nats.education.gov.in/ या वेबसाईटवरून २३ मे २०२४ पर्यंत रजिस्ट्रेशन करावे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावेत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक/ व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) आधारकार्ड उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.hal-india.com ही वेबसाईट पाहावी.
मुलाखतीचे ठिकाण – Auditorium, Behind Depart- ment of Training & Development, Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad-500042
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *