gic of India : ११० असि मॅनेजर पदांसाठी पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक १९ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित असून सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नांव – असिस्टंट मॅनेजर,
पदसंख्या – ११० (ओपन ४३, ईडब्ल्यूएस ७, ओबीसी ३४, अजा १५, अज ११) पैकी अपंग ५ (कर्णबधीर ४, बहुविध अपंगत्व १)
शाखानिहाय पदविभागणी – ८
• जनरल – २४
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. उच्च पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
• लिगल – ९
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) कायदा पदवी उत्तीर्ण असावा. बार कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक.
• ह्युमन रिसोर्स – ६
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. उच्च पदवी (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/पर्सोनेल मॅनेजमेंट) उत्तीर्ण असावा.
• इंजिनिअरींग – ५ ( मरीन १, एरोनॉटीकल १, मेकॅनिकल १, सिव्हील १, इलेक्ट्रीकल १)
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) संबंधित विषयामधुन इंजि पदवी उत्तीर्ण असावा.
• आयटी – २२
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा किंवा ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा आणि ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ४४% गुणासह) उच्चपदवी (कॉम्प्युटर अँप्लीकेशन) उत्तीर्ण असावा.
• इन्श्युरन्स – २०
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (जनरल इन्श्युरन्स / रिस्क मॅनेजमेंट/ लाईफ इन्श्युरन्स) उत्तीर्ण असावा.
• फायनान्स – १८
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) बी.कॉम उत्तीर्ण असावा.
• मेडीकल (एमबीबीएस) – २
पात्रता – ओपन व ओबीसी उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५% गुणासह) एमबीबीएस उत्तीर्ण असावा. मेडीकल कौन्सीलकडे नोंदणी असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय व २१ ते ३० या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२ नोव्हेंबर १९९४ ते ०१ नोव्हेंबर २००३ दोन्ही दिवस धरुन झालेला असावा. अनु. जाती/जमाती ५ वर्षे, ओबीसी ३ वर्षे, अपंग १० वर्षे सवलत. विधवा/घटस्फोटित परंतु पुर्नविवाह न केलेल्या महिलांना ९ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५०९२५-९६७६५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. उमेदवारास सुरुवातीचे एकूण वेतन दरमहा रु.८५०००/- इतके असेल. याशिवाय उमेदवारास जनरल इन्शुरन्सच्या सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांची पात्रता दि. १९ डिसेंबर २०२४ रोजीची धरली जाईल. ३) अपंग उमेदवारांबाबत अपंग उमेदवारांसाठी लेखनिकाची आवश्यकता असल्यास उमेदवारांना स्वतःच स्वःखर्चाने लेखनिकाची सोय करावी लागेल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १५० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. वस्तुनिष्ठ परीक्षेत जनरल पदांसाठी रिझनिंग (६० गुण), इंग्रजी भाषा (२० गुण), जनरल अवेअरनेस (२० गुण), न्युमरीकल अँबीलीटी क्वांटीटीव अँप्टीट्यूड (२० गुण) असतील तसेच उमेदवारांना ३० गुणांची वर्णनात्मक पध्दतीची कम्प्युटर परीक्षा द्यावी लागेल यामध्ये इंग्रजी निबंध, कॉम्प्रीएंन्शन यावर अधारीत प्रश्न विचारले जातील. तर उर्वरीत सर्व पदांसाठी संबंधित टेक्नि/व्यावसायिक ज्ञान (४० गुण) रिझनिंग (२० गुण), इंग्रजी भाषा (२० गुण), जनरल अवेअरनेस (२० गुण), न्युमरीकल अँबीलीटी क्वांटीटीव अँप्टीट्युड (२० गुण) असतील तसेच उमेदवारांना ३० गुणांची वर्णनात्मक पध्दतीची कम्प्युटर परीक्षा द्यावी लागेल यामध्ये इंग्रजी निबंध, कॉम्प्रीएशन यावर अधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी असेल. तसेच एका चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. परीक्षेमध्ये ओपन/ओबीसी उमेदवारांना ६० % तर अजा/अज उमेदवारांना ५० % गुण मिळणे आवश्यक. लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांची २० गुणांची ग्रुप डिस्कशन आणि ३० गुणांची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी कॉललेटर, ओळख पत्र (पॅनकार्ड/ रेशनकार्ड/आधारकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसन्स/ पासबुक/ निवडणूक कार्ड / कॉलेज आयडेंटीटीकार्ड) यांच्या साक्षांकीत प्रती सोबत नेणे आवश्यक. लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.
लेखी परीक्षा केंद्रे आणि सेंटर कोड – पुणे, मुंबई/नवीमुंबई/ ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, हैद्राबाद इ.
परीक्षा पूर्व प्रशिक्षण – अजा/अज /अल्पसंख्याक उमेदवारांना परीक्षापूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. अशी संधी घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही. संबंधीत प्रशिक्षण केंद्रे ऑनलाईन अर्जामध्ये उपलब्ध आहेत.
परीक्षा फी – ओपन/ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी १००० + GST १८% (एकुण रु. ११८०/-) अशी असून ती नेटबँकींग / क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे भरणे आवश्यक. अजा/अज / विभागीय कर्मचारी/अपंगांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
प्रोबेशन कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्रा बाबत – उमेदवारांनी परीक्षेची प्रवेशपत्र वेबसाईट वरुन डाऊनलोड करून घ्यावीत. प्रवेशपत्रा सोबत मूळ प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.gicre.in या वेबसाईटवरून दि. १९ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिकट बॅकग्राऊंड असलेला नुकताच काढलेला पासपार्ट आकाराचा फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड), काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट केलेल्या तीन प्रती स्वतःजवळ ठेवणे आवश्यक. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकगाऊंड असलेला) रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) विहित नमुन्यातील डिक्लरेशन ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) वयाचा दाखला ५) जातीचा दाखला व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ६) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र ७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) अपंग असल्यास तसा दाखला १०) असल्यास अनुभव प्रमाणपत्र ११) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड)
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.gicre.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १९ डिसेंबर २०२४
परीक्षा दिनांक – ०५ जानेवारी २०२५
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *