गेल इंडिया लिमिटेड ३९१ असिस्टंट्स २०२४  - govtjobsu.com

गेल इंडिया लिमिटेड ३९१ असिस्टंट्स २०२४ 

omkar
8 Min Read

गेल (इंडिया) लि. : ३९१ फोरमन्स, टेक्निशियन्स इ. पदांसाठी आयटीआय/डिप्लोमा/पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित असून सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – फोरमन (इन्स्टुमेंटेशन) ग्रेड-S-5,

पदसंख्या – १४ (अजा ५, अज ९)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह अजा/अज/अपंग उमेदवार ५५ % गुणांसह इंजि डिप्लोमा (इन्स्टुमेंटेशन / इन्स्टुमेंटेशन अँण्ड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

२) पदाचे नाव – फोरमन (इलेक्ट्रीकल) ग्रेड-S-5,

पदसंख्या – अज १

पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

३) पदाचे नाव – फोरमन (सिव्हील) ग्रेड -S-5,

पदसंख्या – (ओपन ३, ओबीसी ३)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह इंजि डिप्लोमा (सिव्हील) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

४) पदाचे नाव – ज्युनिअर सुप्रिटेंडंट (ऑफीशिल लँग्वेज) ग्रेड- S-5,

पदसंख्या – (ओपन १, ओबीसी १, अजा २, अज १)

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह पदवी (हिंदी लिटरेचर) उत्तीर्ण असावा. पदवीस इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा संबंधीत कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

५) पदाचे नाव – ज्युनिअर केमिस्ट ग्रेड-S-5,

पदसंख्या – (ओपन ३, ओबीसी ३, अजा २)

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी एम.एस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

६) पदाचे नाव – ज्युनिअर अकौंटंट ग्रेड-S-5,

पदसंख्या – १४ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी एम. कॉम उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक,

 

७) पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) ग्रेड-S-3

पदसंख्या – अजा ३.

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह बी.एसस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

८) पदाचे नाव – ऑपरेटर (केमिकल) ग्रेड-S-3,

पदसंख्या – ७३ (ओपन ३१, ईडब्ल्यूएस ६, ओबीसी १६, अजा १५. अज ५)

पात्रता – उमेदवार ५० % गुणांसह बी.एसस्सी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटीक्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

९) पदाचे नाव – टेक्निशियन (इलेक्ट्रीकल) ग्रेड-S-3,

पदसंख्या – ४४ ( ओपन २१, ईडब्ल्यूएस ४, ओबीसी ८, अजा ६, अज ५)

पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (इलेक्ट्रीकल / वायरमन) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

१०) पदाचे नाव – टेक्निशियन (इन्स्टुमेंटेशन) ग्रेड-S-3

पदसंख्या – ४५ (ओपन २१, ईडब्ल्यूएस ४, ओबीसी १२, अजा ५, अज ३)

पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (इन्स्टुमेंटेशन) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

११) पदाचे नाव – टेक्निशियन (मेकॅनिकल) ग्रेड-S-3,

पदसंख्या – ३९ (ओपन १९ ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ११, अजा ४, अज २)

पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (फिटर/डिझेल मेकॅनिक/मशिनिस्ट/टर्नर) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

१२) पदाचे नाव – टेक्निशियन (टेलीकॉम अँण्ड टेलीमेट्री) ग्रेड- S-3,

पदसंख्या – ११ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अज १),

पात्रता – उमेदवार १० वी आणि आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

१३) पदाचे नाव – ऑपरेटर (फायर) ग्रेड-S-3,

पदसंख्या – ३९ (ओपन २०, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ७, अजा ६. अज ३)

पात्रता – उमेदवार १२ वी आणि ६ महिने कालावधीचा फायरमनचा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा. जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

१४) पदाचे नाव – अकौंट्स असिस्टंट ग्रेड-S-3,

पदसंख्या – १३ (ओपन ६, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १)

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांसह बी.कॉम उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

१७) पदाचे नाव – बिझनेस असिस्टंट ग्रेड-S-3,

पदसंख्या – ६५ (ओपन ३०, ईडब्ल्यूएस ६, ओबीसी १८, अजा ७, अज ४)

पात्रता – उमेदवार ५५ % गुणांसह बीबीए/बीबीएस/बीबीएम उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवारांचे वय S-3 साठी २८ वर्षांपर्यंत तर S-5 साठी ३० वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अज/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना S-3 साठी रु.२४५००-९००००/- तर S-5 साठी रु.२९०००, १,२०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल, वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/स्कील टेस्ट/ शारीरिक क्षमता चाचणी/ मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडी बाबत उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.

परीक्षा केंद्रे – मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली, लखनऊ

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे परीक्षेपूर्वी १० दिवस आधी वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावीत. ऑनलाईन परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी कॉललेटर सोबत ओळखपत्र (पॅनकार्ड/ रेशनकार्ड/आधारकार्ड/पासपोर्ट) साक्षांकीत प्रत सोबत नेणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन/ ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.५०/- अशी असून ती नेटबँकींग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी www.gailonline.com या वेबसाईटवरून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक/ व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) आधारकार्ड

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, संबंधीत कौन्सीलकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.gailonline.com ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *