गेल (इंडिया) २६१ इंजिनिअर्स भर्ती | GAIL (India) 261 Engineers Recruitment
gail india pvt ltd : २६१ इंजिनिअर्स, ऑफीसर्स इ. पदांसाठी पदवी/इंजि पदवी/एमबीए/उच्च पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ११ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (रिन्युएबल एनर्जी) ग्रेड – E-2
पदसंख्या – ६ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (केमिकल / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड पॉवर / इलेक्ट्रीकल अँण्ड पॉवर/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रीकल अँण्ड इन्स्टुमेंटेशन / इन्स्टुमेंटेशन अँण्ड कंट्रोल/मेकॅनिकल / प्रोडक्शन / प्रोडक्शन अँण्ड इंडस्ट्रीअल / मॅन्युफॅक्चरींग) उत्तीर्ण असावा, संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (बॉयलर ऑपरेशन्स) ग्रेड- E-2
पदसंख्या – ३ (ओपन २, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (केमिकल / मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. बॉयलर ऑपरेशन्स प्रोफेशिअन्सीचा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) ग्रेड-E-2
पदसंख्या – ३० (ओपन १२, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ७, अजा ५, अज ३)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (मेकॅनिकल/ प्रोडक्शन / प्रोडक्शन अँण्ड इंडस्ट्रीअल/मॅन्युफॅक्चरींग/मेकॅनिकल अँण्ड अँटोमोबाईल ) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा, अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) ग्रेड-E-2
पदसंख्या – ६ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा २)
पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह इंजि पदवी (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (इन्स्टुमेंटेशन) ग्रेड-E-2
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन अँण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीकल अँण्ड इन्स्टुमेंटेशन / इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (केमिकल) ग्रेड-E-2
पदसंख्या – ३६ (ओपन १५, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ९, अजा ६, अज ३)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक
७) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (टेलीकॉम/टेलीमेट्री) ग्रेड- E-2
पदसंख्या – ५ (ओपन ३, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड E टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रीकल अँण्ड टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
८) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (F&S) ग्रेड-E-2
पदसंख्या – २० (ओपन ७, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ४, अजा ५, अज २)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह इंजि पदवी (फायर / फायर अँण्ड सेफ्टी) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. इंडस्ट्रीअल सेफ्टीचा डिप्लोमा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
९) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (C&P) ग्रेड-E-2
पदसंख्या – २२ (ओपन १३, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ४, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह इंजि पदवी (केमिकल / मेकॅनिकल/ इलेक्ट्रीकल / इनस्ट्रुमेंटेशन / आयटी /कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/मेटलर्जी/सिव्हील/टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. एमबीए (मटेरिअल मॅनेजमेंट) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
१०) पदाचे नाव – सिनिअर इंजिनिअर (सिव्हील) ग्रेड-E-2
पदसंख्या – ११ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी (सिव्हील) ६५% उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
११) पदाचे नाव – सिनिअर ऑफीसर (मार्केटींग) ग्रेड-E-2
पदसंख्या – २२ (ओपन १३. ईडब्ल्यूएस २, ओबीसी ३, अजा ३, अज १)
पात्रता – उमेदवार ६५ % गुणांसह इंजि पदवी आणि ६५ % गुणांसह एमबीए (मार्केटींग/ऑईल अँण्ड गॅस/पेट्रोलिअम अँण्ड एनर्जी/एनर्जी अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर/इंटरनॅशनल बीझनेस) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१२) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (F&A) ग्रेड-E-2
पदसंख्या – ३६ (ओपन १८, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ८, अजा ५, अज २)
पात्रता – उमेदवार सीए / आयसीडबल्युए परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा ६० % गुणांसह बी.कॉम आणि ६५ % गुणांसह एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा. किंवा ६० % गुणांसह बीए हॉनर्स (इकॉनॉमिक्स) आणि ६५% गुणांसह एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा किंवा ६० % गुणांसह बीए/बी.एस्सी हॉनर्स (मॅथ्स) आणि ६५ % गुणांसह एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा. किंवा ६० % गुणांसह बीए/बी.एस्सी हॉनर्स (स्टॅटेस्टीक्स) आणि ६५ % गुणांसह एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा. किंवा ६०% गुणांसह बीई/ बीटेक आणि ६५ % गुणांसह एमबीए (फायनान्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
१३) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (HR) ग्रेड-E-2
पदसंख्या – २३ (ओपन १५, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ३, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी आणि ६५ % गुणांसह एमबीए / एमएसडब्ल्यु (पर्सोनेल मॅनेजमेंट अँण्ड इंडस्ट्रीअल रिलेशन्स / ह्युमन रिसोर्स) उत्तीर्ण असावा. किंवा ६० % गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी आणि ६५ % गुणांसह उच्चपदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (पर्सोनेल मॅनेजमेंट अँण्ड इंडस्ट्रीअल रिलेशन्स/ह्युमन रिसोर्स) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. कायदा पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
१४) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (लॉ) ग्रेड-E-2
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १),
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी आणि ६० % गुणांसह कायदा पदवी उत्तीर्ण असावा किंवा ६० % गुणांसह ५ वर्षांची इंटीग्रेटेड कायदा पदवी उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. एलएलएम उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
१५) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (मेडीकल सव्र्हस) ग्रेड- E-2
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि डिप्लोमा (DGO/DCH etc) उत्तीर्ण असावा. मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक. संबंधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. एमडी/एमएस उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
१६) पदाचे नाव – सिनिअर ऑफिसर (को ऑपरेट कम्युनिकेशन) ग्रेड-E-2
पदसंख्या – ४ (ओपन २, ओबीसी १, अजा १ )
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह पदवी आणि ६५ % गुणांसह उच्च पदवी / डिप्लोमा (कम्युनिकेशन / अँडव्हटायमिंग अँण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट/पब्लीक रिलेशन्स/मास कम्युनिकेशन/जर्नालिझम) उत्तीर्ण असावा. संबधीत कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१७) पदाचे नाव – ऑफीसर (लॅबोरेटरी) ग्रेड E-1
पदसंख्या – १६ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ४, अजा ३, अज १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह एमएस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा. संबंधीत कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१८) पदाचे नाव – ऑफीसर (ऑफिशिअल लँग्वेज) ग्रेड – E-1,
पदसंख्या – १३ (ओपन ६, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह उच्चपदवी (हिंदी लिटरेचर) उत्तीर्ण असावा. पदवीस इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा संबंधीत कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक. हिंदी/इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/ पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा – दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवारांचे वय पदक्रं १ ते १६ साठी २८ वर्षांपर्यंत, पद क्रं १७ साठी ३२ वर्षापर्यंत, पदक्रं १९ साठी ३५ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अज/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना E-2 साठी रु.६०,०००-१,८०,०००/तर E-1 साठी रु.५०,०००-१,६०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) अजा/अज/अपंग उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेमध्ये ५ % सवलत.
निवड पद्धत – पद क्रमांक १ ते १७ साठी उमेदवारांची निवड ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. तर पद क्रमांक १८ साठी उमेदवारांची निवड स्कील टेस्ट (इंग्रजी ते हिंदी आणि हिंदी ते इंग्रजी ट्रान्सलेशन स्कील) आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.२००/ – अशी असून ती नेटबँकींग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.gailonline.com या वेबसाईटवरून दि. ११ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. स्वसाक्षांकीत केलेला पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) स्वसाक्षांकीत केलेला पांढरी बॅकग्राऊंड असलेला पासपोर्ट आकाराचा फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक/ व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४ ) आधारकार्ड
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, संबंधीत कौन्सीलकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.gailonline.com ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ११ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *