इंजिनिअरींग इंडिया : मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी इंजि. पदवी+ गेट २०२४ परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी,
एकूण पदसंख्या – ४३
शाखेनुसार पदविभागणी –
*शाखा – केमिकल, पदसंख्या – ७
*शाखा – सिव्हिल, पदसंख्या – १५
*शाखा – मेकॅनिकल, पदसंख्या – २१
पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह बी.ई/बी.टेक/बी.एस्सी इंजिनिअरींग उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार संबंधित शाखेमधून गेट २०२४ परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०१ जुलै २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २५ वर्षापर्यंत असावे. ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे, अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षापर्यंत सवलत. अपंग ओपन १० वर्षे, ओबीसी १३ वर्षे, अजा/अज उमेदवारांना १५ वर्षापर्यंत वयात सवलत.
विधावेतन – उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये ₹६०,०००/- असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना ₹६०,०००- १,८०,०००/- अशा नियमित वेतनश्रेणीत सामावून घेतले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) फक्त २०२३ आणि २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र
निवड पद्धत – उमेदवारांची निवड गेट परीक्षा २०२४ मध्ये मिळालेले गुण व मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची गेट २०२४ मध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. उमेदवारांनी www.engineersindia.com या वेबसाईट वरून दि. ०५ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) गेट २०२४ स्कोअर कार्ड २) गेट फॉर्म मध्ये अपलोड केल्याप्रमाणे फोटो व सही ३) सर्व शैक्षणिक / व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) वयाचा दाखला ५) जातीचा दाखला ६) अपंग असल्यास तसा दाखला उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटं सोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.engineersindia.com ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०५ मार्च २०२४