इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन : ट्रेनी ऑफीसर २०२४ - govtjobsu.com

इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन : ट्रेनी ऑफीसर २०२४

omkar
3 Min Read

इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन : ट्रेनी ऑफीसर पदांसाठी सीए उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १३ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – ट्रेनी ऑफीसर (फायनान्स)

पदसंख्या – ७ (ओपन ३, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अज १)

पात्रता – उमेदवार सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दि. १३ एप्रिल २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज ५ वर्षे तर अपंग उमेदवारांना वयामध्ये १० वर्षे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४०,००० – १,४०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते अदा केली जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, इ. दि. १३ एप्रिल २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

लेखी परीक्षा केंद्रे – मुंबई/नागपूर, बेंगलोर, चेन्नई, हैद्राबाद इ

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन/ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी ₹१०००/ – अशी परीक्षा फी असून ती नेटबँकीग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक. अजा/अज / अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.ecil.co.in या वेबसाईटवरून दि. १३ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) आधार कार्ड ५) जातीचा दाखला ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.ecil.co.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १३ एप्रिल २०२४ दुपारी ०२.०० वाजेपर्यंत

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *