ECHS कोल्हापूर : ड्रायव्हर, क्लार्क इ. २०२४  - govtjobsu.com

ECHS कोल्हापूर : ड्रायव्हर, क्लार्क इ. २०२४ 

omkar
6 Min Read

ECHS कोल्हापूर : ड्रायव्हर, क्लार्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी ८ वी, डिप्लोमा, पदवी, उच्च पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ११ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर,

पदसंख्या – ०३

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर/सातारा/कराड

पात्रता – उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. किंवा आर्मीमधील क्लास बन क्लेरिकल ट्रेड उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक

वेतन – उमेदवारांना १६,८००/- दम. असे वेतन अदा केले जाईल.

 

२) पदाचे नाव – क्लार्क,

पदसंख्या – ०१

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर

पात्रता – उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. किंवा आर्मीमधील क्लास वन क्लेरिकल ट्रेड उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना १६,८००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

३) पदाचे नाव – ड्रायव्हर (Driver),

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर

पात्रता – उमेदवार ८ वी उत्तीर्ण असावा. तसेच आर्मीमधील एम.टी. ड्रायव्हरचा क्लास वन कोर्स उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना १९,७००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

४) पदाचे नाव – डेंटल हायजेनिस्ट (Dental Hygienist)

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर – २/सांगली/सातारा /कराड / चिपळून

पात्रता – उमेदवार डिप्लोमा (डिप्लोमा डेंटल हयजेनिस्ट) किंवा आर्मीमधील प्रथम श्रेणीत (डीएच / डीओ आरए) कोर्स उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना २८,१००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

५) पदाचे नाव – फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर

पात्रता – उमेदवार डिप्लोमा (फिजिओथेरपी) किंवा आर्मीमधील फिजिओथेरपीचा क्लास वन कोर्स उत्तीर्ण असावा,

वेतन – उमेदवारांना २८,१००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

६) पदाचे नाव – नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)

पदसंख्या – १,

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर

पात्रता – उमेदवार जीएनएम उत्तीर्ण असावा. नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक.

वेतन – उमेदवारांना २८,१००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

७) पदाचे नाव – लॅबोरेटरी टेक्निशियन,

पदसंख्या – ,

पदभरतीचे ठिकाण – चिपळून

पात्रता – उमेदवार बी. एस्सी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) किंवा १० वी / १२ वी सायन्स उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार डिप्लोमा (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.

वेतन – उमेदवारांना २८,१००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

८) पदाचे नाव – ऑफिसर-इन-चार्ज,

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर/सांगली/चिपळून

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी आणि ऑफिसर पदावरून निवृत्त झालेला असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक,

वेतन – उमेदवारांना ७५,०००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

९) पदाचे नाव – आय.टी नेटवर्क,

पदसंख्या – ०१,

पात्रता – उमेदवार डिप्लोमा / प्रमाणपत्र कोर्स (आय.टी नेटवर्किंग कॉम्प्युटर अॅप्लीकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना २८,१००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

१०) पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर,

पदसंख्या – ,

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर – २ / कराड – १

पात्रता – उमेदवार M.B.B.S उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना ७५,०००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

११) पदाचे नाव – मेडिकल स्पेशालिस्ट

पदसंख्या – ०१

पदभरतीचे ठिकाण – कोल्हापूर

पात्रता – उमेदवार एम. डी / एम.एस उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतन – उमेदवारांना १,००,०००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

वयोमर्यादा – ११ सप्टेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्र १ ते ९ साठी ५३ वर्ष तर पद क्र. १० व ११ साठी ६३ वर्षांपर्यंत असावे.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांनी निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

मुलाखत दिनांक व वेळ – १८, १९, २० आणि २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. तसेच पासपोर्ट आकाराचे २ फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) ७) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो अर्जासोबत जोडावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF____________ “ असे लिहिणे आवश्यक.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – SO ECHS, STATION HEADQUARTERS (ECHS) KOLHAPUR, TEMBLAI HILLS, SHIVAJI UNIVERSITY ROAD, KOLHAPUR-416004

 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ११ सप्टेंबर २०२४

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *