East Central Railway Player Recruitment 12th | पूर्व मध्य रेल्वे खेळाडू भरती १२ वी - govtjobsu.com

East Central Railway Player Recruitment 12th | पूर्व मध्य रेल्वे खेळाडू भरती १२ वी

omkar
9 Min Read

पूर्व मध्य रेल्वे खेळाडू भरती १२ वी | East Central Railway Player Recruitment 12th

East Central Railway Player Recruitment १२ वी/पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक १६ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

क्रिडा प्रकार व पदविभागणी –

एकुण पदसंख्या – ३१

 

वेतनश्रेणी नुसार पदविभागणी – 

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००,

पदसंख्या –

खेळानुसार पदविभागणी –

१) रेसलिंग (पुरुष), पदसंख्या – (७९ किग्रॅ फ्रि स्टाईल, ९७ किग्रॅ ग्रीको रोमन स्टाईल) – प्रत्येकी १,

२) कब्बडी (पुरुष), पदसंख्या – (लेफ्ट कॉर्नर / राईट कार्नर) – प्रत्येकी १,

३) कब्बडी (महिला), पदसंख्या – राईट कॉर्नर – १

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२०००

 

पदसंख्या – १६,

खेळानुसार पदविभागणी –

१) बास्केटबॉल (पुरुष), पदसंख्या – पीव्होट (उंची ६ फूट २ इंच) – १,

२) बास्केटबॉल (महिला), पदसंख्या – २ (पीव्होट (उंची ५ फूट १० इंच), पॉईंट गार्ड) – प्रत्येकी १, 

३) कब्बडी (महिला), पदसंख्या – ऑल राऊंडर १

४) फुटबॉल (पुरुष), पदसंख्या – २ ( गोलकिपर, स्ट्रायकर) – प्रत्येकी १,

५) फुटबॉल (महिला), पदसंख्या – ३ (गोलकिपर, सेंटर मिडफिल्डर, लेफ्ट मिडफिल्डर) – प्रत्येकी १,

६) बॅडमिंटन (पुरुष), पदसंख्या – सिंगल्स अँण्ड डबल्स – १,

७) बॅडमिंटन (महिला), पदसंख्या – सिंगल्स अँण्ड डबल्स – १,

८) हॉलीबॉल (पुरुष), पदसंख्या – २ (सेंटर ब्लॉकर सेंटर अटॅकर) – प्रत्येकी १,

९) अँथलेटीक्स (महिला), पदसंख्या – २० किमी / ३५ किमी चालणे – १

१०) अँथलेटीक्स (पुरुष), पदसंख्या – २ (१००,२०० अँण्ड ५०० मीटर/८००/१५०० मीटर) – प्रत्येकी १,

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००/-,

 

हेडक्वॉर्टर विभाग –

पदसंख्या – १०,

खेळानुसार पदविभागणी –

१) बास्केटबॉल (पुरुष), पदसंख्या – पीव्होट (उंची ६ फूट २ इंच) – २,

२) बास्केटबॉल (महिला), पदसंख्या – २ (पीव्होट (उंची ५ फूट १० इंच), ऑलराऊंडर) – प्रत्येकी १,

३) कब्बडी (पुरुष), पदसंख्या – २ ( राईट कव्हर, रायडर ) – प्रत्येकी १,

४) कम्बडी (महिला), पदसंख्या  – २ ( राईट कव्हर, रायडर ) – प्रत्येकी १,

५) बॅडमिंटन (महिला), पदसंख्या – १ (सिंगल्स) – प्रत्येकी १,

६) हॉलीबॉल (पुरुष), पदसंख्या – १  (युनिव्हर्सल) – प्रत्येकी १,

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००/-,

 

डिव्हीजन्स विभाग –

पदसंख्या – २५,

खेळानुसार पदविभागणी –

१) क्रिकेट (पुरुष), पदसंख्या – पेस बॉलर + बॅट्समन (ऑलराऊंडर) – १/फास्ट बॉलर – ३/लेफ्ट आर्म स्पिनर – १/ पेस बॉलर – १ / स्पिनर – १/ ऑलराऊंडर – २ / स्पिन बॉलर – १/विकेट २/स्पिन बॉलर १ / स्पिनर – १/ ऑलराऊंडर – किडर बॅट्समन- ३ / बॅट्समन- ६

२) फुटबॉल (पुरुष), पदसंख्या – २ (स्ट्रायकर, मिड फिल्डर) – प्रत्येकी १,

३) बॅडमिंटन (पुरुष), पदसंख्या – १,

४) बास्केटबॉल (पुरुष), पदसंख्या – १ (ऑल राऊंडर (पिव्होट, शुटर, बॉल हॅण्डलर) ६ फूट) – प्रत्येकी १, 

५) हॉलीबॉल (पुरुष), पदसंख्या – १ (अटॅकर) – प्रत्येकी १,

६) हॉकी (महिला), पदसंख्या – १ (स्ट्रायकर) – प्रत्येकी १,

शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता –

क्रिडा पात्रता – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००

पात्रता – उमेदवार १० वी किंवा आय.टी.आय किंवा अँप्रेंटेशिप सर्टिफिकेट (NAC) धारक असावा.

क्रिडा पात्रता – कॉमन वेल्थ चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर)/ एशियन चॅम्पियनशीप/एशिया कप (ज्युनिअर/ सिनिअर)/साऊथ एशियन फेडरेशन (SAF) गेम्स (सिनिअर)/USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर)/वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा फेडरेशन कप चॅम्पियनशिप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा सिनिअर / युध / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा राज्यस्तरीय खेळामध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे.

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२०००

पात्रता – उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा.

क्रिडा पात्रता – वर्ल्ड कप (ज्युनिअर / सिनिअर)/वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर ) / एशियन गेम्स (सिनिअर ) / कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चैम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर ) / एशियन चॅम्पियनशीप / एशिया कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे. किंवा सिनिअर/युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान प्राप्त केलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात प्रथम स्थान प्राप्त केलेले असावे.

वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४०० / २८००

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

क्रिडा पात्रता – ऑलंपिक गेम्स (सिनिअर) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा वर्ल्ड कप (ज्युनिअर / सिनिअर ) / वर्ल्ड चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन गेम्स (सिनिअर)/ कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त केलेले असावे.

टीप – उमेदवारांची क्रिडा पात्रता दि. १ एप्रिल २०२२ नंतरची धरली जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षापर्यंत असावे.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड संबंधीत क्रिडा चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा चाचणी मधील गुण, क्रिडा प्रमाणपत्रे, आणि शैक्षणिक पात्रेमध्ये मिळालेले गुण यांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी स्वत:चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक. निवडीच्या ठिकाणी ३-५ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. तसेच परीक्षेसाठी उमेदवारांनी स्वःखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्या येतील. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना परीक्षा फी रु.५००/- तर अजा/अज / महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना परीक्षा फी रु.२५०/- अशी असून ती ‘FA&CAO, East Central Railway’ च्या नावे पेयेबल अँट ‘Hajipur’ अशी पोस्टल ऑर्डर स्वरूपात अर्जासोबत जोडावी.

महत्वाची सुचना – निवडीसाठी उपस्थित राहणाऱ्या ओपन / ओबीसी उमेदवारांना रु.४००/- तर अजा /अज / महिला / अल्पसंख्याक /आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना रु.२५०/परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत करण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी अर्जासोबत RTGS फॉर्म जोडणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त साध्या पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी पोस्टल ऑर्डर २) क्रिडा प्रमाणपत्रे ३) वयाचा पुरावा ४) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) जात प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्टया मागास उमेदवारांनी उत्पन्नाचा दाखला ७) अल्पसंख्यांक उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी सध्याच्या काळातील पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा. असेच आणखी २ फोटो अर्जासोबत जोडावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती व RTGS फॉर्म जोडावा व मुळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application against Sports Quota (Open Advt.)”, “Employment Notice No.ECR/HRD/Rectt / Sports Quota (Open Advt.)/ 2024-25”, “Pay Level/Basic Pay “ असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठावावेत व अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे.

अर्ज करण्याचा पत्ता – General manager (Personnel), Recruitment Section, E.C. Railway Headquarter Office, Hajipur, Distt.- Vaishali, Bihar. PIN-844101

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – १६ डिसेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

टीप – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात. वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती मुलाखतीवेळी सादर कराव्यात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *