DRDO, पुणे : ज्यु. रिसर्च फेलो पदासाठी बी.ई/बी.टेक +नेट/गेट/एम.ई एम.टेक उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३१ मे २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो JRF (इलेक्ट्रॉनिक्स),
पदसंख्या – ५
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/ बी. टेक/एम.एस्सी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/ सिग्नल प्रोसेसिंग/मायक्रोवेव्ह/मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह इंजि./ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल्स) उत्तीर्ण असावा आणि नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक./ एम.ई. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/ सिग्नल प्रोसेसिंग/मायक्रोवेव्ह / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह इंजि./पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल्स) उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो JRF (कॉम्प्युटर सायन्स),
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी. टेक / एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड आयटी/कॉम्प्युटर ॲप्लीकेशन/इन्फर्मेशन सायन्स/इन्फर्मेटीक्स ॲण्ड नेटवर्कींग/डाटा सायन्स/सॉफ्टवेअर इंजि./ सायबर सिक्युरीटी / एआय ॲण्ड एमएल/बिग डाटा ॲनालिसीस) उत्तीर्ण असावा आणि नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) उत्तीर्ण असावा आणि नेट परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो JRF (मेकॅनिकल),
पदसंख्या – ९
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/ बी. टेक (मेकॅनिकल/मेटॅलर्जी/मेटॅलर्जीकल इंजि./मटेरीअल इंजि./मटेरीअल सायन्स/ मॅन्युफॅक्चरींग इंजि./प्रोडक्शन इंजि.) उत्तीर्ण असावा आणि नेट/ गेट परीक्षा उतीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक./ एम.ई. (मेकॅनिकल/मेटॅलर्जी/मेटॅलर्जीकल इंजि./मटेरीअल इंजि./ मटेरीअल सायन्स/मॅन्युफॅक्चरींग इंजि./प्रोडक्शन इंजि.) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो JRF (एरोस्पेस इंजि.),
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/ बी. टेक (एरोस्पेस इंजि.) उत्तीर्ण असावा आणि नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक./एम.ई. (एरोस्पेस इंजि.) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो JRF (पॉलिमर इंजि.),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी. टेक (पॉलिमर इंजि.) उत्तीर्ण असावा आणि नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीमध्ये एम.टेक./एम.ई. (पॉलिमर इंजि.) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ३१ मे २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २८ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹३७,०००/- दम असे विद्यावेतन अदा केले जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखीपरीक्षा/मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील शैक्षणिक पात्रतेमधील गुण आणि गेट स्कोर यांच्या अधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखीपरीक्षा/ मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
लेखी परीक्षा दिनांक – १४ जून २०२४
फेलोशिप कालावधी – २ वर्षे असून नियमानूसार वाढू शकतो.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत आणि एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ व साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (सेमीस्टरवाईज) ३) नेट किंवा गेट प्रमाणपत्र ४) वयाचा दाखला ५) जातीचे प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ६) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ७) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच पासपोर्ट साईज दोन फोटो निवडीवेळी सोबत घेऊन जाणे आवश्यक.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of …………….”. असे लिहिणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – Director, Armament Research Development Establishment (ARDE), & Armament Post, Pashan, Pune – 411021
अर्ज स्वीकारण्याचा व अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ३१ मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *