DRDO : ज्युनिअर रिसर्च फेलोज् २०२४ - govtjobsu.com

DRDO : ज्युनिअर रिसर्च फेलोज् २०२४

omkar
4 Min Read

DRDO ज्यु. रिसर्च फेलो पदासाठी बीई/बीटेक+नेट/गेट / एम.ई/एमटेक उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ जून २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) (मेकॅनिकल),

पदसंख्या – १३

पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी. टेक (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (मेकॅनिकल) उतीर्ण असावा मात्र बी.ई / बी. टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

२) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजि.),

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/ बी. टेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) उतीर्ण असावा मात्र बी.ई/ बी. टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

३) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) (इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स),

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/बी.टेक (इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उतीर्ण असावा मात्र बी.ई/ बी. टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

४) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (JRF) (कॉम्प्युटर सायन्स इंजि.),

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स इंजि.) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (कॉम्प्युटर सायन्स इंजि.) उतीर्ण असावा मात्र बी.ई / बी. टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. २९ जून २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २८ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.

विद्यावेतन – उमेदवारांना ₹३७,०००/- द.म असे विद्यावेतन अदा केले जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेले गुण/गेट परीक्षेमध्ये मिळालेले गुण यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

फेलोशिप कालावधी – २ वर्षे

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (सेमीस्टरवाईज) २) वयाचा दाखला ३) जातीचे प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो अर्जासोबत जोडावेत. उमेदवारांनी अर्जासोबत वरील वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR JRF RECRUITMENT-2024” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.

अर्ज करण्याचा पत्ता – The Director, Combat Vehicles Research & Development Establishment (CVRDE) Ministry of Defence, DRDO Avadi, Chennai – 600054

 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक –  २९ जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *