DRDO, हैद्राबाद : अप्रांटिस पदांकरीता आयटीआय/डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक २ एप्रिल २०२४ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
१) पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रांटीस
पदसंख्या – १५
शाखेनुसार पदविभागणी – कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. – २, इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजि.- ४, मेकॅनिकल इंजिनिअरींग – ९
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधून बी. ई / बी. टेक उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹९,००० /- द. म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
२) पदाचे नाव – टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रांटीस
पदसंख्या – १०
शाखेनुसार पदविभागणी – मेकॅनिकल इंजि. – ५, इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजि. – ५
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधून इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹८,००० /- द. म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
३) पदाचे नाव – आयटीआय (ट्रेड) अप्रांटीस
पदसंख्या – ६५
शाखेनुसार पदविभागणी – फिटर – ३३, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ६, इलेक्ट्रीशिअन – १२, कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट – ५, टर्नर – ५, मशिनिस्ट – ४
पात्रता – उमेदवार संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹७,००० /- द. म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) फक्त २०२१,२०२२,२०२३ या शैक्षणिक वर्षामधील उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र ३) यापूर्वी अप्रांटिस ट्रेनिंग पूर्ण केलेले व १ वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारे उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकिय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करून अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी निवडीचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
परीक्षा फी – उमेदवारांसाठी कोणतीही परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त रजिस्टर/स्पीड पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक गुणपत्रे प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला ४) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ५) पॅनकार्ड ६) आधारकार्ड ७) चारित्र्याचा दाखला ८) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र ९) एनसीसी प्रमाणपत्रधारक असल्यास तसे प्रमाणपत्र १०) माजीसैनिक/ सैनिक/नावल डॉकयार्डमधील कर्मचाऱ्याचे पाल्य असल्यास तसा दाखला ११) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी गॅझेटेड ऑफीसरने किंवा आयटीआय प्राचार्यांनी साक्षांकित केलेला एक फोटो चिकटवावा असेच आणखी ४ फोटो अर्जासोबत जोडावेत. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर __________”APPLICATION FOR_________APPRENTICESHIP TRAINING AT ASL” असे लिहिणे आवश्यक. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – The Director, Advanced Sys tems Laboratory (ASL), Kanchanbagh PO, Hyderabad-500058
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *