DRDO. हैद्राबाद : अप्रांटिस पदांकरीता डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक ३० मे २०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रांटीस,
पदसंख्या – १०
शाखेनुसार पदविभागणी –
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. – २, इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स – ३, मेकॅनिकल इंजिनिअरींग – ३, केमिकल इंजि. – २
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधून बी. ई / बी. टेक उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹९,००० /- द. म. असे – विद्यावेतन अदा केले जाईल.
२) पदाचे नाव – टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रांटीस,
पदसंख्या – १५
शाखेनुसार पदविभागणी –
मेकॅनिकल इंजि./मॅन्युफॅक्चरींग / प्रोडक्शन इंजि. – ५, इलेक्ट्रॉनिक्स/टेली-कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन – ४, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – ५, केमिकल – १,
पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधून इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹८,००० /- द. म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) फक्त २०२१,२०२२, २०२३ या शैक्षणिक वर्षामधील उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र ३) यापूर्वी अप्रांटिस ट्रेनिंग पूर्ण केलेले व १ वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारे उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकिय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करून अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी निवडीचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन व ई-मेलद्वारे अर्ज करावेत. प्रथम इंजि डिप्लोमा/ इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांनी nats.education.gov.in या वेबसाईट वरुन नोंदणी करावी. अशी नोंदणी न केलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द होईल. यानंतर उमेदवारांनी दिनांक ३० मे २०२४ पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज प्रत hrd.chess@gov.in या ई-मेल आयडीवर पाठविणे आवश्यक. ईमेलच्या विषयामध्ये “Application for Appreticeship………..” असे लिहिणे आवश्यक.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचे प्रमाणपत्र व असल्यास जातवैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसस्नस इ. ) ६) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी काही फोटो मुलाखतीच्यावेळी सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात आणि मूळ व साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे.
ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक – ३० मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *