DRDO हैद्राबाद : ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी बी.ई/बी.टेक + नेट/गेट उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ ऑक्टोबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन),
पदसंख्या – ५
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई./ बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
२) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स),
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी.टेक (इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार नेट / गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
३) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजि./ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी),
पदसंख्या – ४
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजि./ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजि. / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
४) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (केमिकल इंजि.),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी.टेक (केमिकल इंजि.) ‘उत्तीर्ण असावा, तसेच उमेदवार नेट / गेट परीक्षा उतीर्ण असावा, किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (केमिकल इंजि.) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
५) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (मेकॅनिकल इंजि.),
पदसंख्या – ५
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई/ बी.टेक (मेकॅनिकल इंजि.) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (मेकॅनिकल इंजि.) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
६) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलो (मेटलर्जी इंजि.),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत बी.ई / बी.टेक (मेटलर्जी इंजि.) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार नेट/गेट परीक्षा उतीर्ण असावा. किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एम.ई/एम. टेक (मेटलर्जी इंजि.) उतीर्ण असावा. मात्र बी.ई / बी.टेक ही प्रथमश्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २६ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ३
विद्यावेतन – उमेदवारांना रु.३१,०००/- द.म असे विद्यावेतन अदा केले जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा / मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
फेलोशिप कालावधी – २ वर्षे
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज स्पीड पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी इंडियन पोस्टल ऑर्डर २) सर्व शैक्षणिक, व्यावसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (सेमीस्टरवाईज) ३) वयाचा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र ७) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE VACANCY OF JUNIOR RESEARCH FELLOW” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – HEAD HRD, DR. APJ ABDUL KALAM MISSILE COMPLEX,RESEARCH CENTRE IMARAT (RCI), PO-VIGYANA KANCHA, HYDERABAD, TELANGANA-500069
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २६ ऑक्टोबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *