DRDO हैद्राबाद (डिफेन्स मेटलर्जीकल रिसर्च लॅबोरेटरी) : १२७ अप्रांटीस ट्रेनी पदांसाठी आयटीआय/ इंजि. डिप्लोमा/इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३१ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटीस ट्रेनी,
एकूण पदसंख्या – १२७
आयटीआय अप्रांटीस ट्रेनीज्,
पदसंख्या – १२७
ट्रेडनुसार पदविभागिणी –
• फिटर – २०,
• टर्नर – ८,
• मशिनिस्ट – १६
• वेल्डर – ४,
• इलेक्ट्रीशिअन – १२,
• इलेक्ट्रॉनिक्स – ४,
• कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – ६०
• कार्पेटर – २,
• बुक बायंडर – १,
पात्रता – उमेदवार संबंधीत ट्रेडमधुन आय.टी.आय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ३१ मे २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग (दिव्यांग) उमेदवारांना वयामध्ये १० वर्षे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि.३१ मे २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा/मुलाखत घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकिय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करून अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा केंद्र – हैद्राबाद
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो पासपोर्ट/मतदान असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. प्रथम आय.टी.आय उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवरुन नोंदणी करावी. त्यानंतर उमेदवारांनी https://forms.gle/ xqRjBZ4U6NqgbvTDA या वेबसाईटवरून दि. ३१ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) अपंग असल्यास तसा दाखला ५) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) ६) बँक पासबुक ७) आधार कार्ड उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्युएस उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.drdo.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ३१ मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *