डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) बेंगलोर : १५० अप्रांटीस ट्रेनी पदांसाठी आयटीआय/इंजि. डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटीस ट्रेनी,
एकूण पदसंख्या – १५०
पात्रतेनुसार पदविभागणी –
१) ग्रॅज्युएट अप्रांटीस ट्रेनी (इंजिनिअरींग),
पदसंख्या – ७५,
शाखेनुसार पदविभागणी –
• मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रीअल प्रोडक्शन – ३० • एरोनॉटीकल/एरोस्पेस इंजि – १५ • इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/ टेलीकॉम – १० • कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजि/इन्फरमेशन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी – १५ मेटलर्जी / मटेरीअल सायन्स ४ • सिव्हील – १.
पात्रता – उमेदवार संबंधीत शाखेमधुन इंजि पदवी उत्तीर्ण असावा.
२) ग्रॅज्युएट अप्रांटीस ट्रेनी (नॉन-इंजिनिअरींग),
पदसंख्या – ३०,
शाखेनुसार पदविभागणी –
• बी.कॉम – १० • बी.एस्सी (केमिस्ट्री/फिजिक्स / मॅथ्स / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर) – ५० बी.ए (इंग्रजी / इतिहास / फायनांन्स/बँकींग इ.) – ५ बीसीए – ५ • बीबीए – ५
पात्रता – उमेदवार संबंधीत शाखेमधुन पदवी उत्तीर्ण असावा.
३) डिप्लोमा अप्रांटीस ट्रेनी,
पदसंख्या – २०.
शाखेनुसार पदविभागणी –
• मेकॅनिकल/प्रोडक्शन/टूल ॲण्ड डाय डिझाईन – १० • इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन – ७ • कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि/इन्फरमेशन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी – ३
पात्रता – उमेदवार संबंधीत शाखेमधुन इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
४) आयटीआय अप्रांटीस ट्रेनी,
पदसंख्या – २५
ट्रेडनुसार पदविभागणी –
• मशिनिस्ट – ३, • फिटर – ४, • टर्नर – ३• इलेक्ट्रीशियन – ३• वेल्डर – २ • शिटमेटल वर्कर – ८ असिस्टंट – २. • कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग
पात्रता – उमेदवार संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत तर अपंग उमेदवारांना वयामध्ये १० वर्षे सवलत.
विद्यावेतन – पद क्रं. १ साठी ₹९०००/- द.म. असे पद क्रं २ साठी ₹८०००/- द.म. असे तर पद क्रमांक ३ साठी ₹७०००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. ०९ एप्रिल २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) फक्त २०२१/२०२२/२०२३ या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा/मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा/मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीबाबत उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.
परीक्षा केंद्र – बेंगलोर
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्रा सोबत मूळ प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक.
प्रथम आय.टी.आय/ग्रॅज्युएट अप्रांटीस (नॉन इंजिनिअरींग) साठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org वेबसाईटवरुन तर इंजि. डिप्लोमा/ इंजि. पदवीधारक उमेदवारांनी nats.education.gov.in या वेबसाईटवरून नोंदणी करावी. त्यानंतर उमेदवारांनी rac.gov.in या वेबसाईटवरून दि.०९ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पदभरतीच्या ठिकाणांसाठीचे प्राधान्यक्रम द्यावेत. पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई- रिसीट व अर्जाची प्रिंटांऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो, सही, २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) अपंग असल्यास तसा दाखला ५) फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र, /ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे ७ फोटा सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.drdo.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि.०९ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *