Delhi Subordinate : 567 MTS 2024 - govtjobsu.com

Delhi Subordinate : 567 MTS 2024

omkar
9 Min Read

दिल्ली सबऑर्डिनेट बोर्ड : ५६७ मल्टी टास्कींग स्टाफ पदांसाठी १० उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०८ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/२४,

पदभरतीचा विभाग – DEPARTMENT OF WOMEN AND CHILD

पदसंख्या – १९४ (ओपन ८७, ईडब्ल्यूएस २३, ओबीसी ६४, अजा ४,अज १६) पैकी अपंग १४, माजी सैनिक १९, खेळाडू १०

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना १८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

२) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – DEPARTMENT OF SOCIAL WELFARE,

पदसंख्या – ९९ (ओपन ४३, ईडब्ल्यूएस ९, ओबीसी ३४, अजा ५, अज ८) पैकी अपंग ४, माजी सैनिक १०, खेळाडू ५

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

३) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – DEPARTMENT OF TRAINING AND TECHNICAL EDUCATION,

पदसंख्या – ८६ (ओपन ३६, ईडब्ल्युएस ८, ओबीसी ३५, अज ७) पैकी अपंग ५, माजी सैनिक ९, खेळाडू ४

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

४) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – PRINCIPAL ACCOUNTS OFFICE,

पदसंख्या – ६४ (ओपन २५, ईडब्ल्युएस ८, ओबीसी १८, अजा १०, अज ३) पैकी अपंग २, माजी सैनिक ६, खेळाडू ३

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

५) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/२४,

पदभरतीचा विभाग – LEGISLATIVE ASSEMBLY SECRETARIAT,

पदसंख्या – ३२ (ओपन १५, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ८, अजा ४, अज २) पैकी अपंग १, माजी सैनिक ३

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

६) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – OFFICE OF THE CHIEF ELECTORAL OFFICER,

पदसंख्या – १६ (ओपन ८, ईडब्ल्युएस २, ओबीसी ४, अजा २) पैकी अपंग २, माजी सैनिक १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

७) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – DELHI SUBORDINATE SERVICES SELECTION BOARD,

पदसंख्या – १३ (ओपन ८, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १, अज १) पैकी अपंग १, माजी सैनिक १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

८) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – DIRECTORATE OF ECONOMICS AND STATISTICS,

पदसंख्या – १३ (ओपन ६, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १) पैकी माजी सैनिक १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

९) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – PLANNING DEPARTMENT

पदसंख्या – १३ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ४, अजा १) पैकी अपंग १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१०) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – DIRECTORATE OF TRAINING, UTCS

पदसंख्या – १२ (ओपन ५, ईडब्ल्युएस १, ओबीसी ३, अजा २, अज १) पैकी माजी सैनिक १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

११) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ, पोस्ट कोड – ८१२/ २४,

पदभरतीचा विभाग – LAND & BUILDING DEPARTMENT

पदसंख्या – ७ (ओपन ४, ओबीसी ३) पैकी अपंग

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,०००-५६९००/- अशी वेतनश्रेणीअदा केली जाईल.

 

वयोमर्यादा – दि. ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ०३ वर्षे तर अजा/ अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. ओपन खेळाडू ५ वर्षे, ओबीसी खेळाडू ८ वर्षे तर अजा/अज खेळाडू उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत, ओपन विधवा/घटस्फोटित/कायदेशिररीत्या विभक्त परंतु पुर्नविवाह न केलेल्या महिला उमेदवारांना ३५ पर्यंत, ओबीसी ३८ पर्यंत तर अजा/अजंना वयात ४० पर्यंत सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०८ मार्च २०२४ रोजीचे धरले जाईल २) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. ३) ओबीसी उमेदवारांसाठी असणारी वय, परीक्षा फी इ. साठींची सवलत फक्त दिल्ली राज्यातील ओबीसी उमेदवारांसाठी लागू असेल. इतर राज्यातील ओबीसी उमेदवारांनी ओपन प्रवर्गातून अर्ज करावेत. ४) वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड पूर्व लेखी परीक्षा आणि मुख् लेखी परीक्ष आणि स्कीलटेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ९० प्रश्न- ९० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धीमत्ता, इंग्रजी भाषा यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुख्य लेखी परीक्षा घेतली जाईल लेडी मुख्य लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरुपाची ७५ गुणांची असेल. यामध्ये इंग्रजी भाषेवर यावर आधारीत प्रश्न विचारले जातील.

लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी ४०%, ओबीसी ३५% तर अजा/अज/अपंग उमेदवारांनी ३०% गुण मिळविणे आवश्यक. माजी सैनिकांना टक्केवारीमध्ये ५% सवलत, मात्र किमान ३०% गुण असणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट घेण्यात येईल. स्कील टेस्टमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

परीक्षा केंद्र – दिल्ली

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक आणि वेळ ईमेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹१०० अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/महिला/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.dsssbonline.nic.in या वेबसाईटवरून दि. ०८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, अंगठ्याचे ठसे स्कॅन करुन अपलोड करावेत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र ४) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अॅण्ड अॅसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, आधारकार्ड इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकिय / विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.dsssbonline.nic.in ही वेबसाईट पहावी.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०८ मार्च २०२४

( वेबसाइट प्रत्येक सोमवारी अपडेटेड )

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *