संरक्षण सेवा, डिफेन्स सव्र्हस स्टाफ कॉलेज: एमटीएस पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३० मार्च २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ (ऑफीस ॲण्ड ट्रेनिंग)
पदसंख्या – ६ (ओपन ३, ओबीसी १, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
वयोमर्यादा – दि. ३० मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता, अंकगणित, सामान्य इंग्रजी, सामान्य ज्ञान यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र ७) आधारकार्ड ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो अर्जासोबत जोडावेत. उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वत:चा पत्ता लिहिलेला १० x २२ सेमी आकाराचा आणि रु २६ चे पोस्टाचे तिकीट लावलेले दोन लिफाफे जोडणे आवश्यक. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठवणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF ” MULTITASKING STAFF-OFFICE AND TRAINING” असे लिहिणे आवश्यक. शासकीय निम-शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत तसेच अर्जासोबत ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसांक्षाकित प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – The Commandant, Defence Services Staff College, Wellington (Nilgiris)- 643231.Tamil Nadu
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- दि. ३० मार्च २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *