csir technical assistant recruitment | csir टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन्स भर्ती २०२४ - govtjobsu.com

csir technical assistant recruitment | csir टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन्स भर्ती २०२४

omkar
11 Min Read

csir टेक्निकल असिस्टंट टेक्निशियन्स भर्ती | csir technical assistant recruitment

CSIR : सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्युट, तामिळनाडू : टेक्निकल असि., टेक्निशियन पदांकरीता आय.टी.आय/इंजि. डिप्लोमा/बी.एस्सी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०६ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

 

पदाचे नाव – टेक्निकल, असिस्टंट

एकूण पदसंख्या – (ओपन ४, ओबीसी २, अजा १, अज १, कर्णबधीर १)

पात्रतेनुसार पदविभागणी –

१) पोस्ट कोड – TA01,

पदसंख्या – ओपन १ 

पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी बी.एस्सी (अँग्रीकल्चर / हॉर्टीकल्चर) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

२) पोस्ट कोड – TA02,

पदसंख्या – ओपन १ 

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी उत्तीर्ण असावा तसेच बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स उत्तीर्ण असावा.

 

३) पोस्ट कोड TA03,

पदसंख्या – (ओपन १, ओबीसी १)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी (मॅथेमॅटीक्स / स्टॅटेस्टीक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

४) पोस्ट कोड – TA04,

पदसंख्या – ओबीसी १,

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी. एस्सी (कॉम्प्युटर सायन्स / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्ष अनुभव आवश्यक.

 

५) पोस्ट कोड – TA05,

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

६) पोस्ट कोड – TAO6,

पदसंख्या – (अजा १, अज १, कर्णबधीर १),

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

पदाचे नाव – टेक्निशियन (१)

एकूण पदसंख्या – २८ (ओपन १०, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ९, अजा ३, कर्णबधीर १, बहुविध अपंगत्व १, माजीसैनिक २)

ट्रेडनुसार पदविभागणी –

१) इलेक्ट्रीशियन/वायरमन – पोस्ट कोड – TE01,

पदसंख्या – ०३ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १ ),

 

२) सिव्हील (ड्राफ्टसमन) – पोस्ट कोड – TE02,

पदसंख्या – (ओबीसी १, अजा १)

 

३) फिटर – पोस्ट कोड – TE03,

पदसंख्या – (ओबीसी १, अजा १ )

 

४) मशिनिस्ट – पोस्ट कोड – TE04,

पदसंख्या – ०२ (ओपन १, ओबीसी १ )

 

५) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – पोस्ट कोड – TE05,

पदसंख्या – (कर्णबधीर १, ओबीसी १)

 

६) लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) – पोस्ट कोड – TE06,

पदसंख्या – ओबीसी १ 

 

७) पेंटर – पोस्ट कोड – TE07,

पदसंख्या – ओपन १

 

८) ग्लास ब्लोअर – पोस्ट कोड – TE08,

पदसंख्या – ओबीसी १ 

 

९) कार्पेटर – पोस्ट कोड – TE09,

पदसंख्या – ओबीसी १ 

 

१०) रेफ्रिजरेशन अँण्ड एअर कंडीशनिंग मेकॅनिक – पोस्ट कोड – TE10,

पदसंख्या – (ओपन १, ओबीसी १)

 

११) टर्नर – पोस्ट कोड – TE11,

पदसंख्या – ओपन १

 

१२) वेल्डर – पोस्ट कोड – TE12,

पदसंख्या – ओपन १

 

१३) कॉम्प्युटर ऑपरेटर अँण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट / कॉम्प्युटर हार्डवेअर अँण्ड नेटवर्क मेंटेनन्स – पोस्ट कोड – TE13,

पदसंख्या  – (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, बहुविध अपंगत्व १)

 

१४) प्लंबर – पोस्ट कोड – TE14,

पदसंख्या – ओपन १

 

१५) डिजिटल फोटोग्राफर – पोस्ट कोड – TE15,

पदसंख्या – ओपन १

 

१६) फूड प्रोडक्शन / कॅटरींग अँण्ड हॉस्पेटॅलिटी असिस्टंट – पोस्ट कोड – TE16,

पदसंख्या – ओपन १

 

१७) मोटर मेकॅनिक – पोस्ट कोड – TE17,

पदसंख्या – ओपन माजीसैनिक २

 

टेक्निशियन (१) मधील सर्व पदांसाठी पात्रता – उमेदवार किमान ५५ % गुणांनी १० वी (विज्ञान विषयासह) आणि संबंधित ट्रेडमधून आय.टी.आय उत्तीर्ण असावा. किंवा संबंधित ट्रेडमधून नॅशनल / स्टेट ट्रेड प्रमाणपत्रधारक असावा. किंवा उमेदवाराने संबंधित ट्रेडमधून किमान २ वर्षे कालावधीचे अप्रांटिस ट्रेनिंग पूर्ण केलेले असावे.

वयोमर्यादा – दि. ०६ डिसेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विधवा/ घटस्फोटित / कायदेशिररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन महिला उमेदवारांना ३५ पर्यंत, ओबीसी ३८ पर्यंत तर अजा/ अज उमेदवारांना ४० वर्षांपर्यंत सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना टेक्निकल असिस्टंट पदांसाठी रु.९३००३४८००/- + ग्रेड पे रु.४२००/-, तर टेक्निशियन (१) पदांसाठी रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०६ डिसेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड स्कील/ट्रेड टेस्ट आणि ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची स्कील/ट्रेड टेस्ट घेण्यात येईल. स्कील / ट्रेड टेस्टमधील पात्र उमेदवारांची टेक्निकल असिस्टंट पदांसाठी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ५५० गुणांची व ३ तास कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये तीन पेपर असतील. पेपर १ – १०० गुणांचा व १ तास कालावधीचा असून यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित इ. विषयांवर आधारित ५० प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केला जाणार नाही. पेपर २ – १५० गुणांचा व ३० मिनिटे कालावधीचा असून यामध्ये सामान्यज्ञान (२५ प्रश्न ७५ गुण) आणि इंग्रजी भाषा (२५ प्रश्न -७५ गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. पेपर ३ – ३०० गुणांचा व ९० मिनिटे कालावधीचा असून यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. तर टेक्निशियन (१) पदांसाठी – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ४०० गुणांची व २ तास ३० मिनिटे कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल यामध्ये तीन पेपर असतील. पेपर १ – १०० गुणांचा व १ तास कालावधीचा असून यामध्ये यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित इ. विषयांवर आधारित ५० प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केला जाणार नाही. पेपर २ – ५० गुणांचा व ३० मिनिटे कालावधीचा असून यामध्ये सामान्यज्ञान (२५ प्रश्न – ७५ गुण) आणि इंग्रजी भाषा (२५ प्रश्न -७५ गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. पेपर ३ – १५० गुणांचा व १ तास कालावधीचा असून यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर – ३. आधारित ५० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल, निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. निवडीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना रु.५००/- अशी परीक्षा फी असून फक्त नेटबँकिंग द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. नेटबँकिंग ची सविस्तर माहिती खालील प्रमाणे – ती

• Name of Account Holder : Director, CSIR-CECRI, Karaikudi

• Account Number : 737253625

• Bank Name : Indian Bank, A. C. Campus Branch, Karaikudi

• IFSC Code : IDIB000A008

• MICR No : 630019203

• SWIFT Code : IDIBINBBMDN

अजा/अज /अपंग/ महिला / विभागीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

 

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.cecri.res.in या वेबसाईटवरून दि. ०६ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठविणे आवश्यक.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) परीक्षा फी ई-रिसीट

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, परीक्षा फी ई-रिसीट, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF__________  (Post Code ___ )” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.cecri.res.in ही वेबसाईट पहावी.

अर्जाची प्रिंटाऊट पाठविण्याचा पत्ता –  The Controller of Administration, CSIR-Central Electrochemical Research Institute, Karaikudi – 630003, Tamil Nadu

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०२४, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत,

ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १८ डिसेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *