CSIR : इंडियन इन्स्टीट्युट ऑफ टॉक्सीकॉलॉजी रिसर्च : टेक्निकल असिस्टंट्स, टेक्निशिअन्स पदांकरीता पदवी/डिप्लोमा/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३१ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
१) पदाचे नाव – टेक्निकल असिस्टंट
एकूण पदसंख्या – ८ (ओपन ३, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १, अपंग १)
* पात्रतेनुसार पदविभागणी *
• पोस्ट कोड – TA-1, (केमिकल सायन्सेस)
पदसंख्या – ओपन १
उमेदवार – ६० % गुणांनी बी.एस्सी (केमिकल सायन्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-2, (इलेक्ट्रीकल इंजि.)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-3, (सिव्हील इंजि.)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि. डिप्लोमा (सिव्हील इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-4, (अॅनिमल हाऊस अॅण्ड जीएलपी फॅसीलीटी),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी (बायोलॉजीकल) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार बी.एस्सी (बायोलॉजीकल) उत्तीर्ण असावा तसेच ६० % गुणांनी डिप्लोमा (मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा ६० % गुणांनी बी.एस्सी (मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-5, (बायोलॉजीकल सायन्सेस)
पदसंख्या – कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी (बायोलॉजीकल सायन्सेस) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-6, (एन्व्हॉयर्नमेंटल मॉनिटरींग/इम्पॅक्ट असेस्टमेंट)
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि डिप्लोमा (एन्व्हॉयर्नमेंटल/ मेकॅनिकल/सिव्हील/केमिकल इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-7, (ईपीडोमोलॉजी)
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी (बायोमेडीकल) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TA-8, (इंडस्ट्रीअल रिसर्च/ह्युमन रिसोर्स/आऊट्रेच ॲण्ड पब्लीक/सोशल/कम्युनिकेशन)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी बी.एस्सी (लाईफ/बायोलॉजीकल/ बायोमेडीकल) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – टेक्निशिअन,
एकूण पदसंख्या – ११ (ओपन ३, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, माजीसैनिक १, अपंग १)
पात्रतेनुसार पदविभागणी –
• पोस्ट कोड – TEC-1, (केमिकल सायन्स)
पदसंख्या – ३ (ओपन १, अजा १, माजी सैनिक १)
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (लॅबोरेटरी असिस्टंट-केमिकल प्लांट्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TEC-2, (सेंन्सर ॲण्ड डिव्हाईस डेव्हलपमेंट)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (इलेक्ट्रीकल्स/मेडीकल इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TEC-3, (प्लंबर),
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (प्लंबर) उत्तीर्ण असावा.
• पोस्ट कोड – TEC-4, (इलेक्ट्रीशिअन),
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (इलेक्ट्रीशिअन) उत्तीर्ण असावा.
• पोस्ट कोड – TEC-5, (रेफ्रिजरेशन/एसी टेक्नीशिअन)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (रेफ्रिजरेशन/एसी टेक्नीशिअन) उत्तीर्ण असावा.
• पोस्ट कोड – TEC-6, (कॉम्प्युटर सायन्स)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटेनन्स/इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TEC-7, (कॉम्प्युटर सायन्स)
पदसंख्या – कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटेनन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
• पोस्ट कोड – TEC-8, (बायोलॉजीकल सायन्स)
पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्यूएस १)
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार आय.टी.आय (बायोलॉजीकल सायन्स) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे, ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. विधवा/ घटस्फोटित/कायदेशिररित्या विभक्त परंतू पुर्नविवाह न केलेल्या ओपन महिला उमेदवारांना ३५ पर्यंत, ओबीसी ३८ पर्यंत तर अजा/अज उमेदवारांना ४० वर्षांपर्यंत सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी ₹९३००-३४८०० + ग्रेड पे ₹४२००/- तर पद क्रमांक २ साठी ₹५२००- २०२०० + ग्रेड पे ₹ १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०१ मार्च २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड स्कील/ट्रेड टेस्ट आणि ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची स्कील/ट्रेड टेस्ट घेण्यात येईल. स्कील / ट्रेड टेस्टमधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० गुणांची व ३ तास कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये तीन पेपर असतील. पेपर १ – १०० गुणांचा व १ तास कालावधीचा असून यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, प्रोब्लेम सॉलव्हींग इ. विषयांवर आधारित ५० प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केला जाणार नाही. पेपर २ – १५० गुणांचा व ३० मिनिटे कालावधीचा असून यामध्ये सामान्यज्ञान (२५ प्रश्न – ७५ गुण) आणि इंग्रजी भाषा (२५ प्रश्न -७५ गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. तर पेपर ३ – १०० प्रश्न, ३०० गुणांचा व ९० मिनिटे कालावधीचा असून यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई- मेल/एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) यापैकी एक प्रमाणपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना ₹५००/- अशी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. महिला / अजा/अज / दिव्यांग (अपंग)/विभागीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://iitr.res.in/ या वेबसाईटवरून दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) परीक्षा फी ई-रिसीट उमेदवारांनी निवडीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, परीक्षा फी ई-रिसीट, वयाचा / / दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. अधिक माहितीसाठी https:// iitr.res.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ३१ मार्च२०२४ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत,
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.