सीएसआयआर : असिस्टंट्स पदांसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १९ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर स्टेनोग्राफर ( पोस्ट कोड – JST 241/JST 242/JST 243)
पदसंख्या – ०५ (ओपन ३, ईडब्ल्यूएस १, अज १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. लघुलेखनगती इंग्रजी / हिंदी ८० शप्रभी आवश्यक. स्टेनोग्राफीचे ज्ञान आवश्यक,
२) पदाचे नाव – ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (फायनान्स अँण्ड अकौंट) (पोस्ट कोड – JSF 241/JSF 242)
पदसंख्या – ३ (ओपन २, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. टायपिंग गती इंग्रजी ३५ शप्रमी किंवा हिंदी ३० शप्रमी आवश्यक.
३) पदाचे नाव – ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (स्टोअर अँण्ड पर्चेस) (पोस्ट कोड – JSP 241 ),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. टायपिंग गती इंग्रजी ३५ शप्रमी किंवा हिंदी ३० शप्रमी आवश्यक
वयोमर्यादा – दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवारांचे वय पद क्रमांक २ व ३ साठी २८ वर्षापर्यंत तर पद क्रमांक १ साठी २७ वर्षापर्यंत असावे. ओबीसी / अजा/अज / अपंग उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक २ व ३ साठी रु.१९९००६३२०० /- तर तर पद क्रमांक १ साठी रु.२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अंदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदाने केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता इ. दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. पदांनुसार पुढील प्रमाणे पद क्रमांक २ व ३ साठी लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेमध्ये २ पेपर असतील. पेपर ११०० प्रश्न २०० गुणांचा असून यामध्ये सामान्य बुद्धीमत्ता, अंकगणित, प्रोब्लेम सॉल्वींग इ. विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. पेपर २१०० प्रश्न ३०० गुणांचा असून यामध्ये सामान्य ज्ञान (५० प्रश्न १५० गुण), इंग्रजी भाषा (५० प्रश्न १५० गुण) विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा केले जातील. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करन अंतिम निवड केली जाईल. तर पद क्रमांक १ साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० प्रश्न आणि २०० गुणांची असेल. लेखी परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता (५० प्रश्न, ५० गुण), सामान्य ज्ञान (५० प्रश्न, ५० गुण), इंग्रजी भाषा (१०० प्रश्न, १०० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना रु.१००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग/ क्रेडीटकार्ड/डेबीटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/महिला/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.nio.res.in या वेबसाईटवरून दि. १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वतःजवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या पत्यावर पोस्टाने पाठविणे आवश्यक.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) परीक्षा फी ई-रिसीट
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, परीक्षा फी ई-रिसीट, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF________ (Post Code _____) असे लिहिणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.nio.res.in ही वेबसाईट पहावी.
अर्जाची प्रिंटाऊट पाठविण्याचा पत्ता – The Controller of Administration, CSIR-National Institute of Oceanography, Dona Paula, Goa – 403004
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १९ सप्टेंबर २०२४, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत,
ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ३० सप्टेंबर २०२४, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत,
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.