कॉटन कार्पोरेशन लि., नवी मुंबई : २१४ असिस्टंट्स इ. पदांसाठी पदवी/उच्चपदवी/एम.बी.ए. इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (लिगल), पोस्ट कोड – १०१,
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी कायदा पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
२) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (ऑफिशिअल लँग्वेज), पोस्ट कोड – १०२,
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी उच्चपदवी (हिंदी) उत्तीर्ण असावा. मात्र पदवीस इंग्रजी विषय अभ्यासलेला असणे आवश्यक. तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. उमेदवारास हिंदी मधुन इंग्रजी किंवा इंग्रजी मधून हिंदीमध्ये भाषांतराचे ज्ञान असल्यास प्राधान्य उमेदवार एम.बी.ए. उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
३) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग), पोस्ट कोड – १०३,
पदसंख्या – ११ (ओपन ४. ईडब्ल्यूएस १. ओबीसी ३.अजा २. अज १)
पात्रता – उमेदवार एम.बी.ए (अँग्री बिझनेस मॅनेजमेंट/अँग्रीकल्चर) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकौंटंट्स), पोस्ट कोड – १०४,
पदसंख्या – २० (ओपन ११, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ३, अजा २. अज २),
पात्रता – उमेदवार सीए / सीएमए उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – ज्युनिअर कर्मशिअल एक्झिक्युटीव्ह, पोस्ट कोड – १०५,
पदसंख्या – १२० (ओपन ४२, ईडब्ल्यूएस १२, ओबीसी ३९, अजा १८, अज ९ पैकी अपंग ४, माजी सैनिक ११
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी (अजा/अज/अपंग ४५% गुणांनी) बी.एस्सी (अँग्रीकल्चर) उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (जनरल), पोस्ट कोड – १०६,
पदसंख्या – २० (ओपन ३, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ८,अजा ४, अज ३) पैकी माजी सैनिक १
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी (अजा/अज / अपंग ४५% गुणांनी बी.एस्सी अँग्रीकल्चर) उत्तीर्ण असावा.
७) पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकौंट्स), पोस्ट कोड – १०७,
पदसंख्या – ४० (ओपन ११, ईडब्ल्युएस ४, ओबीसी १३, अजा ६, अज ६)
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी (अजा/अज/अपंग ४५% गुणांनी) बी.कॉम उत्तीर्ण असावा.
८) पदाचे नाव – हिंदी ट्रान्सलेटर, पोस्ट कोड – १०८,
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार हिंदी विषयासह पदवी उत्तीर्ण असावा, मात्र पदवीस इंग्रजी हा विषय अनिवार्य असणे आवश्यक प्राधान्य उमेदवार हिंदी विषयासह उच्चपदवी उत्तीर्ण असावा, मात्र पदवीस इंग्रजी हा विषय अभ्यासलेला असणे आवश्यक किंवा उमेदवार इंग्रजी विषयासह उच्चपदवी उत्तीर्ण असावा. मात्र पदवीस हिंदी हा विषय अभ्यासलेला असणे आवश्यक उमेदवारास हिंदी मधुन इंग्रजी किंवा इंग्रजी मधून हिंदी मध्ये भाषांतराचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा – दि. १२ जून २०२४ रोजी पद क्र. १ ते २ साठी उमेदवाराचे वय १८ ते ३२ वर्षापर्यंत असावे तर पद क्र. ३ ते ८ साठी १८ ते ३० वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/ अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिक/विभागीय कर्मचाऱ्यांना वयात नियमाप्रमाणे सवलत. मात्र सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय ४७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी – पद क्र. १ व २ साठी उमेदवारांना रु. ४०,००० १,४०,०००/-, पद क्र. ३ व ४ साठी उमेदवारांना रु. ३०,००० १,२०,०००/-, तर पद क्र. ५ ते ८ साठी उमेदवारांना रु. २२,०००-९०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केले जाईल. याशिवाय इतर सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. १२ जून २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) एकूण पदसंख्येपैकी अपंगासाठी पदे नियमाप्रमाणे राखीव आहेत.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १२० गुणांची व १२० मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये इंग्रजी (१५ प्रश्न), बुद्धिमत्ता (१५ प्रश्न), अंकगणित (१५ प्रश्न), सामान्य ज्ञान (१५ प्रश्न) आणि संबंधित विषयाचे ज्ञान (६० प्रश्न) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण दिला जाईल, तर चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमध्ये ओपन / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ४०% तर अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांनी ३५% गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा केंद्रे – मुंबई/नवी मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकत्ता, बेंगलोर, अहमदाबाद, पटना.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती, फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र इ.) व त्याची आवश्यक छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी रु. १५००/-, तर अजा/अज / अपंग/माजी सैनिक उमेदवारांसाठी ५००/- अशी परीक्षा फी असून ती नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी www.cotcorp.org.in या वेबसाईटवरून दि. ०२ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा. ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिकट रंगाचा फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट व ई-रिसीट प्राप्त होईल, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट रंगाचा फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) व सही २) सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रे व प्रमाणस्त्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र (पेमेंट स्लीपसह) ४) वयाचा दाखला ५) जातीचा दाखला ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र ८) अंग असल्यास तसे प्रमाणपत्र ९) माजी सैनिक असल्यास डिस्चार्च प्रमाणपत्र १०) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीवेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटस्ट सोबत परीक्षा की ई-रिसिट वरील सर्व प्रमाणपत्रे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या साक्षांकित प्रती सादर कराव्यात. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणे मार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी वेळोवेळी www.cotcorp.org.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०२ जुलै २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *