कोचिन शिपयार्ड ७१ सेमी स्कील्ड भर्ती | Cochin Shipyard 71 cm Skilled Recruitment
कोचिन शिपयार्ड लिमिटेड : ७१ सेमी स्कील्ड रिगर, स्कॅफोल्डर इ. पदांसाठी ४ थी/१० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – स्कॅफोल्डर,
पदसंख्या – २१ (ओपन ९, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ०९, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – सेमी स्कील्ड रिगर,
पदसंख्या – ५० (ओपन २४, ईडब्ल्यूएस ५, ओबीसी १५, अजा ५, अज १)
पात्रता – उमेदवार ४ थी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवारचे वय ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतन – उमेदवारांना प्रथम वर्षासाठी रु.२२,१००/-, द्वितीय वर्षासाठी रु.२२,८००/- तर तृतीय वर्षासाठी रु.२३,४००/असे वेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.२) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि कागदपत्रे तपासणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची १०० गुणांची व ९० मिनिटे कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये सामान्यज्ञान (५ गुण), इंग्रजी (१० गुण), बुद्धिमत्ता (५ गुण), अंकगणित (१० गुण) आणि संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न (६० गुण) या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील तसेच २० गुणांचे इंग्रजी भाषेवर आधारीत वर्णनात्मक स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन गुणवत्तायादीनुसार वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.२००/- अशी असून ती नेट बँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज / अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.cochinshipyard.in या वेबसाईटवरून दि. २९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज आधारकार्ड प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसा दाखला ७) उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, फोटो असलेले ओळखपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.cochinshipyard.com ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – २९ नोव्हेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सदरची भरती ३ वर्षे कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपाची आहे.