Chemicals Fertilizers : Management Trainee - govtjobsu.com

Chemicals Fertilizers : Management Trainee

omkar
5 Min Read

रामागुंडम फर्टीलायझर्स ॲण्ड केमिकल लिमिटेड इंजिनिअर्स पदांसाठी पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १४ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) (E-1),

पदसंख्या – १० (ओपन ६, ईडब्ल्यूएस ४)

पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजि.) (केमिकल इंजि./केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल) (E-1),

पदसंख्या – ६ (ओपन ३, ईडब्ल्युएस १, ओबीसी १, अज १)

पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजि.) (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.

 

३) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रीकल) (E-1),

पदसंख्या – ३ (ओपन २, ईडब्ल्युएस १)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजि.) (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.

 

४) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) (E-1),

पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्यूएस १) –

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५०% गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजि.) (इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इंडस्ट्रीअल इन्स्ट्रुमेंटेशन/प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इलेक्ट्रीकल/ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कंट्रोल) उत्तीर्ण असावा.

 

५) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) (E-1),

पदसंख्या – ओपन ३

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) बीई/बीटेक/बी.एस्सी (इंजि.) (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युट टेक्नॉलॉजी/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) एमसीए उत्तीर्ण असावा.

 

६) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) (E-1)

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) कायदा पदवी उत्तीर्ण असावा.

 

७) पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्स) (E-1),

पदसंख्या – ३ (ओपन २, ओबीसी १)

पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज/अपंग ५० % गुणांनी) एमबीए/पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/पर्सोनेल मॅनेजमेंट/इंडस्ट्रीअल रिलेशन्स) उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २५ वर्षापर्यंत तर एमबीए/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २९ वर्षापर्यंत असावे. अनु.जाती/ जमातीसाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे तर माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४०,०००-१,४०,०००/- अशी वेतनश्रेणी दिली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा २) उमेदवारांची वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा १५० प्रश्न१५० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा, अंकगणित, बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान (५० प्रश्न-५० गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (१०० प्रश्न-१०० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी ₹७०० अशी असुन ती नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्डद्वारे भरणे आवश्यक. अजा/अज उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. उमेदवारांनी www.rfcl.co.in या वेबसाईटवरून दिनांक १४ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. ऑनलाईन अर्जामध्ये आवश्यक माहिती भरावी त्यानंतर फोटो व सही व आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्कॅन करुन ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करावी. त्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचुन सबमीट करावा. त्यानंतर नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/ डेबीटकार्डद्वारे परीक्षा फी भरावी. व अर्ज सबमीट करावा. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

 

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे प्रमाणपत्रे ३) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसा दाखला निवडीच्यावेळी उमेदवारांनी अर्जाच्या प्रिंटआऊट सोबत, परीक्षा फी ई-रिसीट वरील सर्व प्रमाणपत्रांच्या इ. प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती व त्यांच्या साक्षांकित प्रतींसह हजर राहणे आवश्यक. शासकीयनिमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावे आणि कागदपत्रे तपासणी वेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.rfcl.co.in ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक- १४ मार्च २०२४ सायंकाळी ०५ पर्यंत

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *