केंद्रीय शिक्षक पात्रता CTET २०२४ - govtjobsu.com

केंद्रीय शिक्षक पात्रता CTET २०२४

omkar
8 Min Read
ctet

केंद्रीय शिक्षक विद्यालय, नवोदय विद्यालय, CBSE इ. माध्यमिक शिक्षक भरतीच्या CTET-DEC २०२४ परीक्षे साठी डी.एड/बी.एड उत्तीर्ण उमेदवारां कडून दि. १६ ऑक्टोबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – माध्यमिक शिक्षक (सदरची शिक्षक भरती नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, CBSE इ. केंद्र सरकारच्या माध्यमिक शाळांसाठी)

परीक्षेचे नाव – Central Teacher Eligibility Test (CTET)-DECEMBER २०२४

पात्रता – वर्ग १ ली ते ५ वी – ५०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन इलेमेंटरी एज्युकेशन उत्तीर्ण/ शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार किंवा ४५% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि NCTE (National Council For Teacher Education) मान्यताप्राप्त डिप्लोमा इन इलेमेंटरी एज्युकेशन उत्तीर्ण/शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि ४ वर्ष कालावधीचे बॅचलर ऑफ इलेमेंटरी एज्युकेशन उत्तीर्ण/शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन एज्युकेशन (स्पेशल एज्युकेशन) उत्तीर्ण/शेवटच्या वर्षा सबसलेले उमेदवार किंवा ५० % गुणांनी पदवी उत्तीर्ण आणि B.Ed उत्तीर्ण उमेदवार वर्ग ६वी ते ८वी पदवी उत्तीर्ण आणि २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन इलेमेंटरी एज्युकेशन उत्तीर्ण/शेवटच्या वर्षास बसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी पदवी उत्तीर्ण आणि बी.एड उत्तीर्ण/ अंतिम वर्षा सबसलेले उमेदवार किंवा ४५% गुणानी पदवी आणि NCTE (National Council For Teacher Education) मान्यता प्राप्तबी.एड उत्तीर्ण/अंतिम वर्षास बसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि ४ वर्ष कालावधीचा बॅचलर ऑफ इलेमेंटरी एज्युकेशन (EI.Ed.) उत्तीर्ण/शेवटच्या वर्षा सबसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी १२ वी उत्तीर्ण आणि ४ वर्षे कालावधीचा बीए/बीएस्सी. एड किंवा बीए. एड/बीए स्सी.एड उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षास बसलेले उमेदवार किंवा ५०% गुणांनी पदवी आणि बी.एड (स्पेशल एज्यु.) उत्तीर्ण किंवा परीक्षेस बसलेले उमेदवार.

टिप – शैक्षणिक पात्रते मध्ये अजा/अज/ओबीसी/अपंग उमेदवारांना ५% सवलत.

परीक्षा पद्धत – CTET परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असून यामध्ये दोन पेपर असतील. १ ली ते ५ वीवर्गासाठी पेपर I असेल. पेपर I १५० गुणांचा असेल, या मध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट अँण्ड पेडालॉजी (३० प्रश्न, ३० गुण), भाषा । (३० प्रश्न, ३० गुण), भाषा ।। (३० प्रश्न, ३० गुण), गणित (३० प्रश्न, ३० गुण), पर्यावरण शास्त्र (३० प्रश्न, ३० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील आणि ६ वी ते ८ वी वर्गासाठी पेपर II असेल. पेपर II १५० गुणांचा असेल, यामध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट अँण्ड पेडालॉजी (३० प्रश्न, ३० गुण), भाषा । (३० प्रश्न, ३० गुण), भाषा ।। (३० प्रश्न, ३० गुण), गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी गणित आणि विज्ञान (६० प्रश्न, ६० गुण) किंवा सोशल स्टडीज/सोशल सायन्स शिक्षकांसाठी – सोशल स्टडीज/सोशल सायन्स (६० प्रश्न, ६० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. जर उमेदवार १ ली ते ८ वीसाठी अर्ज करणार असेल तर दोन्ही पेपर देणे आवश्यक. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. CTET परीक्षे मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६०% गुण मिळविणे आवश्यक.

परीक्षा दिनांक – ०१ डिसेंबर २०२४

परीक्षा वेळ – पेपर I (कालावधी २ तास ३० मि.) स. ९.३० ते १२.०० आणि पेपर II (कालावधी २ तास ३० मि.) त्याच दिवशी दु. २.३० ते ५.००.

प्रमाणपत्र प्रदान व मुदत – CTET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात Central Teachers Eligibility Test (CTET) प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. उमेदवारांना CTET मार्कशीट आणि प्रमाणपत्र डिजीटल फॉरमॅट मध्ये Digi Locker Account मध्ये देण्यात येईल. DigiLocker Account चा आयडी पासवर्ड उमदेवारांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल. उमेदवारांनी मार्कशीट आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेणे आवश्यक. हे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून ७ वर्षे वैध म्हणजेच Valid राहील. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भविष्यात गुणवत्ता पातळीत वाढकरण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा बसता येईल.

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रा मधील पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक ही परीक्षा केंद्रे असून इतर राज्यातील गोवा पणजी, बेंगलोर, मेंगलोर ही परीक्षा केंद्रे आहेत. या शिवाय इतर राज्यातील परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी. ऑनलाईन अर्जा मध्ये ४ परीक्षा केंद्रांचा प्राधान्य क्रम द्यावा लागेल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ईमेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्या पासून प्रवेशपत्र संबंधित वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रा सोबत ऑनलाईन अर्जात अपलोडकेलेला फोटो प्रमाणे फोटो तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स/बँक पासबुक इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – पेपर I किंवा पेपर II साठी उमेदवारांना रु. १०००/- + GST आणि अजा/अज/अपंग उमेदवारांना रु. ५००/- + GST  तर पेपर I आणि पेपर II साठी उमेदवारांना रु. १२००/- + GST आणि अजा/अज/अपंग उमेदवारांना रु. ६००/- + GST अशी परीक्षा फी असून ती क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंग द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. या साठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनीwww.ctet.nic.inया वेबसाईट वरून दि. १६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्या नंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून सिंडीकेट बँक / कॅनरा बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्या नंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) फोटो असलेले ओळखपत्र ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायीक गुणपत्रे, प्रमाण पत्रे ४) डी.एड/बी.एड ज्या महाविद्यालयातून उत्तीर्ण आहे त्या महाविद्यालयाचे नाव, पत्ता व पिनकोड अधिक माहिती साठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळो वेळी www.ctet.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दि. १६ ऑक्टोबर २०२४

परीक्षा दिनांक ०१ डिसेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

सूचना – १) ऑनलाईन अर्ज भरताना आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे. २) उमेदवारांनी ऑनलाईन अर्जा मध्ये स्वत:चे नाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, जन्म दिनांक १० वी प्रमाणपत्रा प्रमाणे नमुद करावे.३) ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत इतर कोणती ही कागद पत्रे जोडून येत. ४) शिक्षण क्षेत्रातील डिप्लोमा/डिग्री ही NCTE / RCI नोंदणीकृत असणे आवश्यक. ५) स्पेशल एज्यु. मधील डी.एड किंवा बी.एड असणाऱ्या उमेदवारांना निवडी नंतर NCTE च्या स्पेशल प्रोग्राम इन इलेमेंटरी एज्युकेशन हे ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. ६) CTET पात्रता धारक उमेदवारांना शासकीय/निम शासकीय / खाजगी शाळांतही अर्ज करता येईल. ७) लेखनिकाची सुविधा घेणाऱ्या अपंग उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी ५० मिनिटांची सवलत देण्यात येईल.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *