कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स, बेंगलोर : खेळाडू भरतीसाठी १० वी/१२वी/पदवी उत्तीर्ण पुरूष खेळाडू उमेदवारांकडून दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – टॅक्स असिस्टंट (फक्त पुरुष),
पदसंख्या – ०८
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. तसेच टायपिंग गती ८००० कि डीक्टेशन/तास असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
२) पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड ।। (फक्त पुरुष)
पदसंख्या – ०१
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. डीक्टेशन गती १० मिनिटामध्ये ८० शप्रमी आणि संगणकावर ट्रान्सक्रिपशन गती इंग्रजी ५० शप्रमी आणि हिंदी ६५ शप्रमी आवश्यक.
३) पदाचे नाव – हवालदार (फक्त पुरुष),
पदसंख्या – ७
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उंची – १५७.५ सेमी (अज उमेदवारांसाठी उंचीमध्ये ५ सेमी सवलत), छाती – न फुगविता ८१ सेमी (५ सेमी फूगविता येणे आवश्यक)
शारीरिक क्षमता चाचणी – १६०० मीटर अंतर १५ मिनिटामध्ये चालून पार करणे, ८ किमी अंतर ३० मिनिटामध्ये सायकलिंग करून पार करणे.
क्रिडा प्रकार –
• आर्चरी • अँथलेटीक्स • आट्या-पट्या • बॅडमिंटन • बॉलबॅडमिंटन • बेसबॉल • बास्केटबॉल • बिलार्ड्स/स्नूकर • बॉडीबिल्डींग • बॉक्सींग •ब्रीज • कॅरम • चेस • क्रिकेट • सायकलिंग • सायकल पोलो • डेफ स्पोर्ट्स • इक्वेस्टेरीअन फेन्सींग • फूटबॉल • गोल्फ जीमनॅस्टीक्स • हॅण्डबॉल • हॉकी • आईस हॉकी • आयईस स्केटींग ज्युदो • कब्बडी • कराटे • कायाकिंग अँण्ड कॅनोईंग • खो-खो • कुडो • मल्लखांब • मोटर स्पोट्र्स • नेट बॉल • पॅरा स्पोट्र्स • पिनाक सिलाट • पोलो • पॉवर लिफ्टींग • शुटींग शुटींग बॉल • रोल बॉल • रोलर स्केटींग • रोईंग • रग्बी • सेपाक टॅक्रो • सॉफ्ट बॉल • सॉफ्ट टेनिस • स्क्वॅश • स्विमींग • टेबल टेनिस • तायक्वोंदो • टेन्नी-कोईट • टेनिस • टेनपिन बॉलिंग • ट्रायथलॉन • टग ऑफ वॉर • हॉलीबॉल • वेटलिफ्टींग वुशु • रेसलिंग • यचिंग • टेनिस बॉल क्रिकेट • योगासना
क्रिडा पात्रता – आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा सिनिअर/ज्युनिअर स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू किंवा आंतर विद्यापिठ स्पर्धांमध्ये विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य स्तरावर शालेय क्रिडा संघाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू किंवा नॅशनल फिजिकल इफिशियन्स ड्राईव्ह द्वारा फिजिकल इफिशियन्सीमध्ये प्रमाणपत्र प्राप्त केलेले खेळाडू.
वयोमर्यादा – दि. ०९ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. ओपन खेळाडू ५ वर्षे, ओबीसी खेळाडू ८ वर्षे तर अजा/ अज खेळाडू उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी रु.२५,५०० – ८१,१००/- तर हवालदारसाठी रु.१८,००० – ५६,९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवारांची क्रिडा पात्रता २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२०२२, २०२२-२३, २०२३-२४ या वर्षांची धरण्यात येईल. २) पदसंख्येत बदल गृहित धरावा. ३) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, इ. दि. ०९ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड खेळाची प्रात्यक्षिक चाचणी, लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची खेळाची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धीमत्ता अंकगणित, सामान्य इंग्रजी यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर पदांसाठी स्कील टेस्ट तर हवालदार पदांसाठी शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची खेळाची प्रात्यक्षिक चाचणी आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीमधील व पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी स्वत:चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
निवडीचे ठिकाण – बेंगलोत
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत अथवा समक्ष सादर करावेत. उमेदवारांनी एकच अर्ज करावा. तसेच एकाच अर्जामध्ये पदांचा प्राधान्यक्रम द्यावा.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) क्रिडा प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला ५) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र ७) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा. उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती निवडीच्या वेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the Post of Tax Assistant/ Stenographer-Gr-II/Havaldar under Sports Quota Recruitment” असे लिहिणे आवश्यक. शासकिय / निमशासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व अर्जासोबत ना हरकत प्रमाणपत्र जोडावे.
अर्ज करण्याचा पत्ता – The Sports Officer, Office of the Commossopner of Central Tax, Bengaluru North Commissionerate, No. 59, Ground Floor, HMT Bhavan, Ganganagar, Begaluru-560032
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ०९ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *