central excise : टॅक्स असिस्टंट, हवालदार इ. पदांसाठी १० वी/१२ वी/पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक २० डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – टॅक्स असिस्टंट
पदसंख्या – ०२
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. तसेच टायपिंग गती ८००० कि डिप्रेशन/तास असणे आवश्यक.
२) पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड – ||,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. लघुलेखन गती ८० शप्रमी आवश्यक. ट्रान्सक्रिपशन गती इंग्रजी ५० एमटीएस किंवा हिंदी ६५ एमटीएस आवश्यक.
३) पदाचे नाव – हवालदार,
पदसंख्या – ४
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – कॅन्टीन अटेंडंट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
क्रिडा प्रकार –
• आर्चरी • अँथलेटीक्स •आट्या-पट्या •बॅडमिंटन •बॉलबॅडमिंटन •बास्केट बॉल •बेस बॉल •बिलिअर्ड अँण्ड स्नुकर्स • बॉडी बिल्डींग •बॉस्कींग •ब्रीज •कॅरम •चेस •क्रिकेट •सायकलिंग •सायकलिंग पोलो •डिफ स्पोर्ट्स •इक्वेस्ट्रेन • फेनसिंग •फुटबॉल •गोल्फ •जिमनॅस्टीक •हॅण्ड बॉल •हॉकी • आईस हॉकी •आईसस्कींग •मल्लखांब •मोटर स्पोट्र्स •नेट बॉल •पॅरा स्पोर्ट्स •पेनकॅक सिलाट •पोलो •पॉवर लिफटींग • शुटींग •शुटींग बॉल •रोल बॉल •रोलर स्केटींग •रोईंग •रग्बी • सिपाक तक्राव •सॉफ्ट बॉल •सॉफ्ट टेनिस •स्क्वॅश •स्विमिंग • टेबल टेनिस • तायक्वांदो •टेनी-कोट •टेनिस •टेनपिन बावलिंग •ट्रायथलॉन •रस्सीखेच (Tug-of-War) •व्हॉलीबॉल •ज्युदो • कबड्डी •कराटे •कायकिंग अँण्ड कॅनोइंग •खो-खो •कुडो • वेटलिफ्टींग •वुशु •कुस्ती(Wresting) •याचिंग •टेनिस बॉल क्रिकेट •आईस स्केटींग
क्रिडा पात्रता – राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत देशाचे/राज्याचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा ऑल इंडिया स्कुल गेम फेडरेशनद्वारा आयोजित ऑल इंडिया स्कुल गेम्समध्ये शाळेचे/ विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा नॅशनल फिजिकल इफिशिएन्सीद्वारे फिजिकल इफिशिएन्सीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले उमेदवार.
वयोमर्यादा – दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी पद क्र. ४ साठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत, तर उर्वरीत सर्वपदांसाठी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. ओपन व ओबीसी खेळाडू ५ वर्षे, तर अजा/अज खेळाडू उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – पद क्र. ३ व ४ साठी रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१८००/-, तर पद क्र. १ व २ साठी रु.५२००-२०२००/ -+ ग्रेड पे रु.२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व त्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवारांची क्रिडा पात्रता २०२०,२०२१,२०२२ व २०२४ या वर्षांची धरण्यात येईल. २) पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखत आणि क्रिडा प्रात्यक्षिक चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी स्वत:चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी अर्जामध्ये पदांचे प्राधान्यक्रम नमूद करावेत व अर्ज काळ्या शाईच्या पेनने भरावा. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त रजिस्टर्ड पोस्टानेच पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) क्रिडा प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ५) आधार कार्ड ६) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती निवडीच्या वेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application of meritorious sports person in Central Tax and Customs Department 2024″ असे लिहिणे आवश्यक. शासकिय / निमशासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व अर्जासोबत ‘ ना हरकत प्रमाणपत्र ‘ जोडावे.
अर्ज करण्याचा पत्ता – The Additional commissioner (P&V) O/o The Principal Commissioner od Central Tax & Central Excise, Kochi Commissionerate, C. R Building, I.S Press Road, Kochi-682018
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २० डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *