मध्य रेल्वे, मुंबई : खेळाडू भरतीसाठी १२ वी/पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदसंख्या – ६२,
वेतनश्रेणी, क्रिडा प्रकार व पदविभागणी वेतनश्रेणीनुसार पदसंख्या – रु. ५२००-२०२०० ग्रेड पे रु. २४००/२८००,
• एकुण पदसंख्या – ५
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
१) अँथलेटीक्स (पुरुष) : ४०० मी/४०० मी. हर्डल्स/८०० मी, पदसंख्या – १
२) अँथलेटीक्स (महिला) : १०० मी. हर्डल्स / २०० मी. / ४०० मी./८०० मी./ लांब उडी / ट्रीपल जम्प/पोल हॉल्ट, पदसंख्या – १
३) बॅडमिंटन (महिला) : सिंगल्स अँण्ड डबल्स, पदसंख्या – २
४) टेबल टेनिस (महिला) – सिंगल्स अँण्ड डबल्स, पदसंख्या – १
वेतनश्रेणीनुसार पदसंख्या – रु.१५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/ २०००
• एकूण पदसंख्या – १६
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
१) अँथलेटीक्स (महिला) : १०० मी. हर्डल्स/२०० मी./ ४०० मी./८०० मी. लॉग जम्प / ट्रीयल जम्प / पोल हॉल्ट, पदसंख्या – २
२) बास्केटबॉल (पुरुष) : पीव्होट / आल राऊंडर/पॉईंट गार्ड, पदसंख्या – २
३) बॉक्सींग (पुरुष) : ४८ किग्रॅ /६३.५ किग्रॅ /८० किग्रॅ / ८६ किग्रॅ/९२ किग्रॅ, पदसंख्या – १
४) बॉक्सींग (महिला) : ५० किग्रॅ / ५७ किग्रॅ /६० किग्रॅ, पदसंख्या – १
५) कब्बडी (पुरुष) : ऑल राऊंडर/लेफ्ट कॉर्नर/राईट कव्हर / राईट-लेफ्ट कॉर्नर, पदसंख्या – २
६) खो-खो (पुरुष) : ऑल राऊंडर/अँटॅकर, पदसंख्या – २
७) टेबल टेनिस (महिला) : सिंगल्स/डबल्स, पदसंख्या – १
८) हॉलीबॉल (महिला) : ब्लॉकर/अटॅकर/सेटर/लिबेरो/ युनिव्हर्सिटी/ऑल राऊंडर, पदसंख्या – १
९) वेट लिफ्टींग (महिला) : ५५ किग्रॅ /५९ किग्रॅ /६४ किग्रॅ /७१ किग्रॅ/७६ किग्रॅ, पदसंख्या – १
१०) हॅण्डबॉल (महिला) : ऑलराऊंडर/फॉरवर्ड/गोल किपर, पदसंख्या – ३
वेतनश्रेणीनुसार पदसंख्या – रु.१५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००
• एकुण पदसंख्या – ४१,
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
१) अँथलेटीक्स (पुरुष) : ट्रीपल जम्प/पोल हॉल्ट, पदसंख्या – २
२) बास्केटबॉल (पुरुष) : पीव्होट / आल राऊंडर/पॉईंट गार्ड, पदसंख्या – २
३) बास्केटबॉल (महिला) : पीव्होट/आल राऊंडर/पॉईंट गार्ड, पदसंख्या – ३
४) बॉडी बिल्डींग (पुरुष) : ७० किग्रॅ /९० किग्रॅ / १०० किग्रॅ / १००+ किग्रॅ, पदसंख्या – ३
५) बॉक्सींग (पुरुष) : ४८ किग्रॅ /६३.५ किग्रॅ /८० किग्रॅ / ८६ किग्रॅ / ९२ किग्रॅ, पदसंख्या – १
६) सायकलिंग ट्रॅक (पुरुष) : १ किमी टाईम ट्रायल / ४ किमी इंडीव्हीज्युअल परस्युट, पदसंख्या – २
७) सायकलिंग रोड (पुरुष) : ४० किमी टाईम ट्रायल, पदसंख्या – २
८) कम्बडी (पुरुष) : लेफ्ट कव्हर / राईट कव्हर / राईट लेफ्ट कॉर्नर ऑल राऊंडर, पदसंख्या – २
९) कब्बडी (महिला) : लेफ्ट कव्हर / राईट कव्हर / राईट-लेफ्ट कॉर्नर ऑल राऊंडर, पदसंख्या – ३
१०) खो-खो (पुरुष) : ऑल राऊंडर/अँटॅकर, पदसंख्या – २
११) हॉलीबॉल (महिला) : ब्लॉकर/अटॅकर/सेटर/लिबेरो/ युनिव्हर्सिटी, पदसंख्या – ३
१२) वेट लिफ्टींग (पुरुष) : ६० किग्रॅ /७३ किग्रॅ / ८१ किग्रॅ / ८९ किग्रॅ / १०९ किग्रॅ. पदसंख्या – २
१३) वेट लिफ्टींग (महिला) : ५५ किग्रॅ /५९ किग्रॅ/६४ किग्रॅ/७१ किग्रॅ/७६ किग्रॅ, पदसंख्या – ३
१४) रेसलिंग (ब्रिको रोमन) (पुरुष) : ७२ किग्रॅ / ७७ किग्रॅ / ८२ किग्रॅ / ८७ किग्रॅ, पदसंख्या – ३
१५) रेसलिंग (फ्रि स्टाईल) (पुरुष) : ७० किग्रॅ /८७ किग्रॅ / ९२ किग्रॅ /९७ किग्रॅ / १२५ किग्रॅ, पदसंख्या – ३
१६) हॅण्डबॉल (महिला) : ऑलराऊंडर/फॉरवर्ड/गोल किपर, पदसंख्या – ५
वेतनश्रेणीनुसार शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
क्रिडा पात्रता – वर्ल्ड कप (ज्युनिअर / सिनिअर)/ वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर)/ एशियन गेम्स (सिनिअर)/ कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये किमान ३ रे स्थान पटकाविलेले असावे. किंवा ऑलंपिक गेम (सिनिअर) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२०००
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा १० वी अंप्राटिस कोर्स पूर्ण केलेला असावा. किंवा उमेदवार १० आणि आयटीआय उत्तीर्ण असावा. रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
क्रिडा पात्रता – फेडरेशन कप सिनिअर गटात राज्यस्तरावर प्रथम स्थान पटकाविलेले असावे. किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा सिनिअर / युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करुन किमान ३ रे स्थान पटकावलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर)/एशियन चॅम्पियनशीप / एशियन कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त झालेले असावे किंवा वर्ल्डकप (ज्युनिअर / सिनिअर), वर्ल्ड चॅम्पियनशिप (ज्युनिअर / सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर) किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २५ या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००० आणि १ जानेवारी २००७ (दोन्ही दिवस धरुन) झालेला असावा.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) १ एप्रिल २०१९ नंतर क्रिडा पात्रता पात्र झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड खेळाचे कौशल्य, शारीरीक तंदुरुस्ती, प्रशिक्षक चाचण्या यावर असेल (यामध्ये ४० गुणांपैकी किमान २५ गुण मिळविणे आवश्यक) यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीच्यावेळी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या २-२ स्वःसाक्षांकित प्रती तसेच मुळ प्रतींसह उपस्थित राहणे आवश्यक. येताना स्वतः चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक. पात्र उमेदवारांनाच कॉल लेटर्स पाठविले जातील. परीक्षेच्या ठिकाणी २-३ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. तसेच परीक्षेसाठी उमेदवारांनी स्व:खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक. अजा/अज उमेदवारांना नियमानुसार प्रवासखर्च दिला जाईल.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी रु.५००/तर अल्पसंख्याक / आर्थिकदृष्ट्या मागास / अजा/अज / माजी सैनिक/महिला उमेदवारांना परीक्षा फी रु.२५०/- अशी असून ती नेटबँकींग / क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे भरणे आवश्यक.
महत्वाची सुचना – निवडीसाठी उपस्थित राहणाऱ्या ओपन / ओबीसी उमेदवारांना रु.४००/- तर अजा/अज / महिला /मा.सैनिक/ अल्पसंख्याक /आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना रु.२५०/- परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत करण्यात येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी www.rrc-cr.com या वेबसाईटवरून दि. २१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करणेपूर्वी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असणे आवश्यक. नसेल तर नवीन वैध ईमेल आयडी प्राप्त करावा. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चा तपशील भरावा तसेच फोटो व सही तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचुन सबमिट करावा. त्यानंतर नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्ड द्वारे परीक्षा फी भरावी. प्राप्त होणारा रजि.नंबर लिहून ठेवावा. त्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रे ३) जातीचे प्रमाणपत्र ४) खेळाचे प्रमाणपत्र ५) आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक ६) मा.सैनिक/ अल्पसंख्याक /आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास तसे प्रमाणपत्र ७) बँक पासबुक उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट व प्रवेशपत्र, फोटो असलेले ओळखपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्व-साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. तसेच २ पासपोर्ट आकाराचे फोटो (फोटोच्या पाठीमागे सही करावी) सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय-निमशासकीय मंडळामधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्या वेळेस ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.rrc-cr.com ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – २१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या साक्षांकित केलेल्या व मूळ प्रती निवडीच्यावेळी सादर कराव्यात.