मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई : सहाय्यक, बांधणी सहाय्यकारी इ. पदांसाठी १० वी/१२ वी/ पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)
पदसंख्या – ५ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. मुद्रण तंत्रज्ञान पदविका/ अक्षर मुद्रण (मुद्रण) प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक,
वेतनश्रेणी – ₹२९२००-१२३००/- अशी अदा वेतनश्रेणी केली जाईल.
२) पदाचे नाव – वरिष्ठ मुद्रित शोधक (गट क)
पदसंख्या – ३ (ओपन १, अजा १, विजाअ १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹२९२००-९२३००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
३) पदाचे नाव – मुद्रित शोधक (गट क)
पदसंख्या – १० (ओपन २ पैकी महिला १, इतर १, ईडब्ल्युस १, ओबीसी २ पैकी महिला १, इतर १, अजा २ पैकी महिला १, इतर १, अज १, विजाअ १, भजक १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
४) पदाचे नाव – दुरध्वनी चालक (गट क)
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹२१७००-६९१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
५) पदाचे नाव – मूळप्रतवाचक (गट क)
पदसंख्या – २ (ओबीसी १, विजाअ १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹१९९००-६३२००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
६) पदाचे नाव – बांधणी सहाय्यकारी (गट क)
पदसंख्या – ३३ (ओपन ७ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, ईडब्ल्युस २ पैकी माजीसैनिक १, इतर १, ओबीसी ४ पैकी माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, अजा ५ पैकी महिला २, माजीसैनिक १, इतर २, अंज ३ पैकी महिला १, इतर २, विजाअ १, भजब १, भजक २ पैकी महिला १, इतर १, भजड १, विमाप्र १)
पात्रता – उमेदवार ९ वी उत्तीर्ण असावा. उमेदवार शारीरीकदृष्ट्या तंदरुस्त असावा संबंधित कामाचे ज्ञान आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹१८०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
वयोमर्यादा – दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारांना वयात ४३ वर्षापर्यंत सवलत. अपंग /अपंग माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य/सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. अंशकालीन उमेदवारांना वयात ५५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत.
सर्व पदांसाठी संगणक अर्हता – उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीचे CCC किंवा O/A/B/C स्तरापैकी कोणत्याही एका परीक्षेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक नसल्यास असे प्रमाणपत्र नियुदिनांकापासून २ वर्षाच्या आत सादर करणे आवश्यक
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषय घेतला नसल्यास, नियुक्तीनंतर संबंधित नियमानुसार एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ३) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. २७ फेब्रुवारी २०१४ रोजीचे धरले जाईल. ४) खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांची क्रिडा प्रमाणपत्रे अर्ज सादर करण्यापूर्वीच क्रिडा संचालनालयाकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक. ५) फक्त दृष्ठीहीन, अल्पदृष्ठी व किमान ४० % कायमसुरूपी उमेदवारांना, ते लिहिण्यास सक्षम नसल्यास, लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory Time) देण्यात येईल, मात्र, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात तसे नमुद करणे आवश्यक. तसेच लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांना स्वतःच करावी लागेल. ५) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि व्यवसायिक चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ६० प्रश्न, १२० गुणांची आणि ६० मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये मराठी (१५ प्रश्न-३० गुण), इंग्रजी (१५ प्रश्न- ३० गुण), सामान्य ज्ञान (१५ प्रश्न-३० गुण), बुद्धीमत्ता (१५ प्रश्न- ३० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची व्यवसायिक चाचणी घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले एक मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा केंद्रे – ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात तीन परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम नमूद करणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी ₹१०००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹९००/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड /डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://dgps.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरून दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकदाच अर्ज करावा. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईव अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक ४) जातीचा दाखला ५) डोमेसाईल प्रमाणपत्र ६) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजीसैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) अंशकालीन असल्यास तसे प्रमाणपत्र, ९) अपंग असल्यास तसा दाखला १०) प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, अंशकालीन उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी https:// dgps.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- दि. २९ फेब्रुवारी २०२४