सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ३००० अप्रांटीस २०२४ - govtjobsu.com

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ३००० अप्रांटीस २०२४

omkar
5 Min Read

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई : ३००० अप्रांटीस पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १७ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – अप्रांटीस ट्रेनी

एकूण पदसंख्या – ३००० (ओपन २५७७, आर्थिकदृष्ट्या दुर्बल ६०४, ओबीसी १३७५, अजा ९७७, अज ५६७) पैकी अस्थिव्यंग ७७, अल्पदृष्टी ६३, कर्णबधीर ५७, बहुविध अपंगत्व ५१

विभागानुसार पदविभागणी –

* पदभरतीचा विभाग – महाराष्ट्र

पदसंख्या – ३२० (ओपन १४२, ईडब्ल्यूएस ३२, ओबीसी ८६, अजा ३२, अज २८) पैकी अस्थिव्यंग ३, अल्पदृष्टी ४, कर्णबधीर ३, बहुविध अपंगत्व ३

जिल्ह्यानुसार पदविभागणी –

एनएमआरओ – २२, पणजी – ७, एसएमआरओ – २२, ठाणे – २३, अहमदनगर – २८, अकोला – ३०, अमरावती – ३६, औरंगाबाद – २३, जळगाव – २३, नागपूर – २७, नाशिक – ३३, पुणे – २६, सोलापूर – २० ,

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. (फक्त ३१ मार्च २०२० नंतर उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र)

 

वयोमर्यादा – दि. ३१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षापर्यंत असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म ०१ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००४ (दोन्ही दिवस धरुन) दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत.

विद्यावेतन – उमेदवारांना पहिल्यावर्षी रू.१५०००/- द.म. असे विद्यावेतन अदाकेले जाईल.

प्रशिक्षण कालावधी – ३ वर्ष

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. ३१ मार्च २०२४ रोजीची धरली जाईल. ३) १ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेले किंवा यापूर्वी अप्रांटीस ट्रेनिंग पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि कागदपत्रे तपासणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची व १ तास कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये सामान्य / फायनान्शीअल ज्ञान (२५ प्रश्न – २५ गुण, कालावधी १५ मिनिटे), सामान्य इंग्रजी (२५ प्रश्न – २५ गुण, कालावधी १५ मिनिटे) अंकगणित ( २५ प्रश्न २५ गुण, कालावधी १५ मिनिटे), बुद्धीमत्ता आणि संगणकाचे ज्ञान (२५ प्रश्न – २५ गुण, कालावधी १५ मिनिटे) यावर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्थानिक भाषेवर आधारीत ऑनलाईन परीक्षाघेण्यात येईल. (ज्या उमेदवारांनी १० वी / १२ वी मध्ये स्थानिक भाषा अभ्यासलेली आहे अशा उमेदवारांची ही चाचणी होणार नाही) त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

ऑनलाईन परीक्षा दिनांक – २३ जून २०२४

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन व ओबीसी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी रु.८००/- + जीएसटी महिला/ईडब्ल्युएस/ अजा/अज उमेदवारांना रु. ६००/- + जीएसटी, अपंग रु. ४००/- + जीएसटी अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग / क्रेडीटकार्ड/ डेबीटकार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https:// www.centralbankofindia.co.in/ या वेबसाईट वरुन दिनांक १७ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वतःजवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे  – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक (असल्यास) ४) पॅन कार्ड क्रमांक (असल्यास) उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई- रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास तसे प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित प्रतींसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ही https://www.centralbankofindia.co.in/ वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १७ जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *