CDAC pune project engineer recruitment 2024 apply online | CDAC पुणे २४० इंजिनिअर्स भर्ती - govtjobsu.com

CDAC pune project engineer recruitment 2024 apply online | CDAC पुणे २४० इंजिनिअर्स भर्ती

omkar
5 Min Read

CDAC पुणे २४० इंजिनिअर्स भर्ती | CDAC pune project engineer recruitment 2024 apply online

CDAC, पुणे : २४७ इंजिनिअर्स इ. पदांसाठी पदवी/इंजि. पदवी/उच्चपदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – प्रोजेक्ट असोशिएट्स (फ्रंटएंड डेव्हलपर/ बॅकएंड डेव्हलपर / डाटाबेस डेव्हलपर),

पदसंख्या – २०,

विभागानुसार पदविभागणी – दिल्ली – २०

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक किंवा एमई/एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी/एमसीए उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – प्रोजेक्ट असोशिएट्स (सर्व्हर सिस्टीम अँडमिनिस्ट्रेटर, टेक्निकल हेल्प डेस्क, नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर).

पदसंख्या – १९,

विभागानुसार पदविभागणी – बेंगलोर, दिल्ली 

पात्रता – उमेदवार बीई / बीटेक किंवा एमई/एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी/एमसीए उत्तीर्ण असावा.

 

३) पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रंटएंड डेव्हलपर / बॅकएंड डेव्हलपर / क्लाऊड अँडमिनिस्ट्रेटर/डाटाबेस डेव्हलपर),

पदसंख्या – ४०,

विभागानुसार पदविभागणी – दिल्ली

पात्रता – उमेदवार बीई / बीटेक किंवा एमई/ एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी/एमसीए उत्तीर्ण असावा.

 

४) पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर (जीआयएस एक्सपर्ट / हायड्रॉलॉजी),

पदसंख्या – ४,

विभागानुसार पदविभागणी – पुणे

पात्रता – उमेदवार बीई / बीटेक किंवा एमई/एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी / एमसीए उत्तीर्ण असावा.

 

५) पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर (नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर / एनओसी / एसअसि सर्व्हर/स्टोरेज स्टीम अँडमिनिस्ट्रेटर),

पदसंख्या – ८,

विभागानुसार पदविभागणी – पुणे

पात्रता – उमेदवार बीई / बीटेक किंवा एमई/ एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी/एमसीए उत्तीर्ण असावा.

 

६) पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर (सॉफ्टवेअर डेव्हलपर).

पदसंख्या – १०,

विभागानुसार पदविभागणी – पुणे

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक किंवा एमई/एमटेक किंवा ६० % गुणांनी एमएस्सी/एमसीए उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग (दिव्यांग)/माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. शासकीय / विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षापर्यंत सवलत.

वेतन – उमेदवारांना रु.४ लाख /- प्रति वर्ष असे एकूण वेतन अदा केले जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे शैक्षणिक वय, अनुभव इ. दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजीची धरली जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / स्कील टेस्ट/ मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार लेखी परीक्षा / स्कील टेस्ट/मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल / एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. निवडीच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.cdac.in या वेबसाईटवरून दि. ०५ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटा व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी आणि अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १ ) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ४) अपंग (दिव्यांग) असल्यास तसे प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) संदर्भासाठी दोन प्रतिष्ठित व्यक्तींची (नातेवाईक, इ.) नावे, हुद्दा, पत्ता व फोन नंबर

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊसोबत, वरील सर्व प्रमाणपत्रे, फोटो असलेले प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व मुलाखती वेळी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.cdac.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०२४, सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत. 

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *