बॉर्डर सिक्युरिटी फोर्स : १६२ सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल इ. पदांसाठी १० वी / १२ वी/पदवी इ. उमेदवारांकडून दि. ०१ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन अर्ज मागवित आहे. सविस्तर पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नांव – सब इन्सपेक्टर (मास्टर),
पदसंख्या – ७ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट ॲथोरेटी किंवा मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट द्वारे प्रमाणीत करण्यात आलेले सेंकड क्लास मास्टर प्रमाणपत्र धारक असावा.
२) पदाचे नांव – सब इन्सपेक्टर (इंजिन ड्रायव्हर),
पदसंख्या – ४ (ओबीसी १, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. इनलॅण्ड वॉटर ट्रान्सपोर्ट आणि ॲथोरेटी किंवा मर्कंटाईल मरीन डिपार्टमेंट द्वारे प्रमाणीत करण्यात आलेले फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र धारक असावा
३) पदाचे नांव – हेड कॉन्स्टेबल (मास्टर),
पदसंख्या – ३५ (ओपन १५, ईडब्ल्यूएस ११, ओबीसी १३, अजा २,अज ६) माजी सैनिक ४ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि सारंग चा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नांव – हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर)
पदसंख्या – ५७ (ओपन २५ ईडब्ल्यूएस ११, ओबीसी १३, अजा २, अज ६), माजी सैनिक ५ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि सेकंड क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्रधारक असावा.
६) पदाचे नांव – हेड कॉन्स्टेबल (वर्कशॉप)
शाखेनुसार पदविभागणी –
• मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन) – ३ (ओपन १, ओबीसी १, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• मशिनिस्ट – ओबीसी १
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• इलेक्ट्रीशिअन – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• एसी टेक्निशिअन – अजा १
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• कार्पेटर – ३ (ओपन २, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• इलेक्ट्रॉनिक्स – ओबीसी १
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
• प्लंबर – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
७) पदाचे नांव – कॉन्स्टेबल (क्यु),
पदसंख्या – ४६ (ओपन १६, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी १५, अजा ८, अज ४) माजी सैनिक ३ ( ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. २६५ एचपी किंवा त्यापेक्षा कमी एचपी च्या बोटवरील १ वर्षाचा अनुभव असावा. तसेच उमेदवारस पोहता येणे आवश्यक.
वयोमर्यादा – दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी पद क्रमांक १ व २ साठी २२ ते २८ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्व पदांसाठी २० ते २५ वर्षांपर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ ३,वर्षे, ओपन शासकीय कर्मचारी ५ वर्षे, ओबीसी शासकीय कर्मचारी ८ वर्षे, तर अजा/अज शासकीय कर्मचाऱ्यांना १० वर्षे सवलत तर माजी सैनिकांना दयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
शारिरीक पात्रता पुढीलप्रमाणे :
जातीचे नाव उंची छाती
न फुगवता फुगवून
इतर राज्यातील उमेदवार १६५ सेंमी. ७५ सेंमी ८० सेंमी
महाराष्ट्र / कर्नाटक / गोवा, १६२.५ सेंमी. ७५ सेंमी ८० सेंमी
अज उमेदवार १६० सेंमी. ७३ सेंमी ७८ सॅमी
उमेदवाराचे वजन उंचीच्या प्रमाणात असावे. दृष्टी दोन्ही डोळ्यांनी चष्म्याशिवाय ६/६ आणि ६/९ अशी असावी. उमेदवारांचे गुडधे एकमेकास टेकलेले नसावेत, सपाट तळवे, शिरा तटतटलेल्या, रातांधळेपणा, रंगांधळेपणा, तिरळेपणा इ. विकार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत. उमेदवार मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या काम करण्यास तंदरुस्त असावा.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ ते ३ साठी ₹ ९३००-३४८०० + ग्रेड पे २४२००/-, पद क्रमांक ४ ते ६ साठी ₹ ५२००-२०२०० + ग्रेड पे ₹२४००/- तर पद क्रमांक ७ साठी ₹५२००-२०२०० + ग्रेड पे ₹२०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. या शिवाय उमेदवारांना सर्व सोयी सुविधा व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत ३) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक ०१ जुलै २०२४ रोजीचे धरले जाईल ४) एकुण पदसंख्ये पैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रे – तपासणी, शारिरीक पात्रता चाचणी, शारीरीक क्षमता चाचणी, ट्रेड टेस्ट, वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न, १०० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. लेखी परीक्षेमध्ये सब इन्स्पेक्टर (मास्टर), सब इन्स्पेक्टर (इंजिन ह ड्रायव्हर), सब इन्स्पेक्टर (वर्कशॉप) पदांसाठी सामान्य ज्ञान (२५ प्रश्न, २५ गुण), बुद्धीमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), अंकगणित प (२५ प्रश्न, २५ गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (२५ प्रश्न, २५ स गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. तर उर्वरीत सर्व पदांसाठी सामान्य ज्ञान (३५ प्रश्न, ३५ गुण), बुद्धीमत्ता (३५ व प्रश्न, ३५ गुण), अंकगणित (३० प्रश्न, ३० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमध्ये ओपन / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांनी ३५ % गुण, अजा/अज ३३ % गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. कागदपत्रे तपासणीमधील पात्र उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १ मिल धाव ८ मिनिटामध्ये पूर्ण करणे, ३ फूट ६ इंच उंच उडी मारणे (३ संधी), ११ फूट लांब उडी मारणे (३ संधी) या चाचण्या घेतल्या जातील यामधील पात्र उमेदवारांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल. ट्रेड टेस्ट मधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. विभागीय कर्मचारी/माजी सैनिकांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार नाही. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आता पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल द्वारे/ वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना पद क्र. १ ते ३ साठी परीक्षा फी रु. २४७,२०/- तर पद क्र. ४ ते ७ साठी रु. १४७.२०/- अजा/अज/महिला/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना सर्वपदांसाठी रु.४७.२०/- असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https:// rectt.bsf.gov.in/ या वेबसाईटवरून दि. ०१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) जातीचा दाखला उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस असल्यास इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, वैद्यकीय दृष्ट्या तंदरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, उंची व छातीमध्ये सवलत घेत असल्यास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.bsf.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. ०१ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *