BSF सशस्त्र सीमा बल २७५ कॉन्स्टेबल (जीडी) भर्ती | bsf constable recruitment 2024
bsf : २७५ कॉन्स्टेबल (जीडी) पदांसाठी १० वी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दि. ३० डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी) खेळाडू,
पदसंख्या – २७५
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
• आर्चरी : रिकर्व्ह २ (पुरुष १, महिला १), कंपाऊंड – २ (पुरुष १, महिला १) इंडियन – २ (पुरुष १, महिला १)
• अँथलेटिक्स : १०० मीटर २ (पुरुष १, महिला १), २०० मीटर २ (पुरुष १, महिला १), ८०० मीटर २ (पुरुष १, महिला १), ४०० मीटर (महिला १), १५०० मीटर २ (पुरुष १, महिला १), ११० मीटर हर्डल्स (पुरुष १), १०० मीटर हर्डल्स (महिला १), ४०० मीटर २ (पुरुष १, महिला १), ३००० मीटर (स्टीपल चेस) २ (पुरुष १, महिला १), लांब उडी २ (पुरुष, महिला १), उंच उडी २ (पुरुष १, महिला १), ट्रीपल जम्प २ (पुरुष १, महिला १) शॉटपुट २ (पुरुष १, महिला १), पोल हॉल्ट (महिला १). हॅमर थ्रो २ (पुरुष १, महिला १), जॅवलीन थ्रो २ (पुरुष १, महिला १) डिस्क थ्रो (महिला १),
• बॅडमिंटन : प्लेअर्स ८ (पुरुष ४ महिला ४)
• स्विमिंग : ५० मीटर फ्रि स्टाईल २ (पुरुष १, महिला १), ५० मीटर बॅक स्ट्रोक २ (पुरुष १, महिला १), ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक २ (पुरुष १, महिला १) ५० बटररलाय २ (पुरुष १, महिला १), १०० मीटर फ्रिस्टाईल २ (पुरुष १, महिला १), १०० मीटर बैंक स्ट्रोक २ (पुरुष १, महिला १), १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक २ (पुरुष १, महिला १), १०० बटरफ्लाय २ (पुरुष १, महिला १), २०० मीटर फ्रि स्टाईल २ (पुरुष १, महिला १), २०० मीटर बॅक स्ट्रोक २ (पुरुष १, महिला १), २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक २ (पुरुष १, म महिला १), २०० बटरफ्लाय २ (पुरुष १, महिला १), २००इंडीव्हीज्युअल मिडले २ (पुरुष १, महिला १), ४०० मीटर फ्रि स्टाईल २ (पुरुष १, महिला १) ८०० मीटर फ्रिस्टाईल २ (पुरुष १, महिला १), १५०० मीटर फ्रि स्टाईल २ (पुरुष १, महिला १), ४०० इंडीव्हीज्युअल मिडले २ (पुरुष १, महिला १),
• डायव्हींग : स्प्रिंग बोर्ड १ मीटर २ (पुरुष १, महिला १), स्प्रिंग बोर्ड ३ मीटर २ (पुरुष १, महिला १), हायबोर्ड २ (पुरुष १, महिला १),
• वॉटर पोलो : प्लेअर २ (पुरुष १, महिला १),
• बास्केटबॉल : प्लेअर १४ (पुरुष ४, महिला १०),
• बॉक्सिंग : पुरुष ७ (४८ किग्रॅ २, ५१ किग्रॅ १, ५७ किग्रॅ १, ६० किग्रॅ १, ६३.५ किग्रॅ १, ६१ किलों १, ७१ किग्रॅ १), महिला ५ (४८ किग्रॅ १, ५२ किग्रॅ १, ५४ किग्रॅ १, ६० किग्रॅ १, ६३ किग्रॅ १)
• सायकलिंग : रोड इव्हेंट ४ (पुरुष २, महिला २), ट्रॅक इव्हेंट ४२, महिला २),
• क्रॉस कंट्री : १०,००० मीटर रन २ (पुरुष १, महिला १),
• इक्वेस्टिरिअन : इव्हेंटींग २ (पुरुष १, महिला १), ड्रेसेज २ (पुरुष १, महिला १), शो जम्पींग २ (पुरुष १, महिला १), टेंट पेग ४ (पुरुष २ महिला २),
• फुटबॉल : प्लेअर – ४ (पुरुष ४),
• जिम्नॅस्टिक्स : ऑल राऊंड/फ्लोअर/ पोमल हॉर्स / रिंग्स / होल्ट / पॅरेलल बार्स / हॉरीझाँटल बार – ६ (पुरुष ६), ऑल राऊंड फ्लोअर / होल्ट / बीम / अनईव्हन बार्स ६ (महिला ६)
• हॅण्डबॉल : प्लेअर १४ (पुरुष २, महिला १२),
• हॉकी : प्लेअर ११ (पुरुष ४, महिला ७),
• आईस-स्कीनिंग : अँल्पीन ३ (पुरुष ३), नॉरडीक ३ (पुरुष ३)
• ज्युदो : पुरुष २ (६० किग्रॅ १, ७३ किग्रॅ १), महिला ४ (५२ कि १, ५० १, ६३ किग्रॅ १, ७० किग्रॅ १)
• कराटे : पुरुष ३ (६० किग्रॅ १, ६७ किलों १, ७५ किग्रॅ १), महिला ४ (५० किग्रॅ १, ५५ किग्रॅ ९, ६१ किग्रॅ १, ६८ किग्रॅ १)
• हॉलीबॉल : प्लेअर १४ (पुरुष ४, महिला १०),
• वेटलिफ्टींग : पुरुष ५ (५५ किग्रॅ १, ६१ किग्रॅ १, ६७ किग्रॅ १,७३ किग्रॅ २), महिला ३ (४५ किग्रॅ १, ४९ किग्रॅ १, ५५ किग्रॅ १)
• वॉटर स्पोर्ट्स : कयाक ४ (पुरुष २, महिला २), कॅनोईंग ४ (पुरुष २, महिला २), रोईंग ४ (पुरुष २, महिला २),
• रेसलिंग (ग्रीको रोमन) : पुरुष ४ (५५ किग्रॅ १, ६३ किग्रॅ १, ६७ किग्रॅ १, ७२ किग्रॅ १),
• रेसलिंग (फ्रि स्टाईल) : पुरुष ५ (५७ किग्रॅ १, ६१ किग्रॅ १, ६५ किग्रॅ १, ७० किग्रॅ १, ७४ किग्रॅ १), महिला ५ (५५ किग्रॅ १, ५७ किग्रॅ १, ५९ किग्रॅ १, ६२ किग्रॅ, ६५ किग्रॅ)
• शुटींग (स्पोर्ट्स) : २२ रायफल थ्री पोजीशन (पुरुष १), एअर रायफल २ (पुरुष १, महिला १) एअर पिस्तुल २ (पुरुष १, महिला १), स्टॅण्डर्ड/सेंटर फायर पिस्तुल – (पुरुष १), फ्रि पिस्तुल (पुरुष १), स्पोर्टस् पिस्तुल (महिला १)
• तायकोदो : पुरष ५ ( अंडर ५४ / ५८ /६३/६८/७४ किग्रॅ प्रत्येकी १) महिला ६ (४६/४९/५३/५०/६२/६७ किग्रॅ प्रत्येकी १)
• वुशु : पुरुष ४ (४८ किग्रॅ १, ५६ किग्रॅ १, ६० किग्रॅ १, ७५ किग्रॅ १), महिला ७ (४५ किग्रॅ १, ४८ किग्रॅ १, ५२ किग्रॅ १, ५६ किग्रॅ १. ६० किग्रॅ १, ६५ किग्रॅ १, ७० किग्रॅ १)
• फेन्सींग : महिला (फॉईल २, ईपी २, सब्रे २)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
क्रिडा पात्रता – आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू किंवा ऑलम्पिक गेम्स, वर्ल्ड कप आणि एशियन गेम्समध्ये भाग घेतलले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केलेले खेळाडू.
शारीरिक पात्रता |
|||
पुरूष उमेदवारांसाठी |
|||
जातीचे नाव |
उंची |
छाती |
|
|
न फुगवता |
फुगवून |
|
जनरल, ओबीसी, अजा |
१७० सेंमी. | ८० सेंमी |
८५ सेंमी |
मराठा, डोग्राज इ. |
१६५ सेंमी. | ७८ सेंमी |
८३ सेंमी |
अज उमेदवार |
१६२.५ सेंमी. | ७६ सेंमी |
८१ सेंमी |
महिला उमेदवारांसाठी |
||
जातीचे नाव |
उंची |
|
ओपन, ओबीसी, अजा |
१५७ सेंमी. |
|
मराठा, डोग्राज इ. |
१५५ सेंमी. |
|
अज उमेदवार |
१५० सेंमी. |
वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात असावे. पुरुष, महिला – उमेदवारांचे गुडघे एकमेकास टेकलेले नसावे. सपाट तळवे, तिरळेपणा, रातांधळेपणा व रंगांधळेपणा असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२१,७००-६९,१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
वयोमर्यादा – दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्षापर्यंत असावे, ओपन उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी ८ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सलवत.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दि. ३० डिसेंबर २०२४ रोजीची धरली जाईल. ३) उमेदवारांची क्रिडा पात्रता दि. ०१ जानेवारी २०२२ नंतरची ग्राह्य धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड कागदपत्रे तपासणी, क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची क्रिडा प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामध्ये ५० गुण क्रिडा प्रमाणपत्रांसाठी तर ५० गुण क्रिडा चाचणीसाठी असतील. क्रिडा चाचणीमध्ये किमान ६० % गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. शारीरिक मोजमाप चाचणीमधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेवारांनी निवडीसाठी स्वखचनि उपस्थित रहावे व ७ ते ८ दिवस राहण्याच्या तयारीने यावे.
वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आता पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल द्वारे/ वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स *इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना परीक्षा फी रु. १४७.२० तर अजा/ अज/महिला/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना सर्वपदांसाठी रु.४७.२०/- असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.bsf.gov.in या वेबसाईटवरून दि. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही,अंगठ्याचा ठसा २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) जातीचा दाखला
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस असल्यास इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, वैद्यकीय दृष्ट्या तंदरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘नां हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.bsf.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ३० डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *