Brihanmumbai Municipal Corporation : ६९० कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता पदांसाठी इंजि डिप्लोमा/इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १६ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या – २५० (ओपन ८४ पैकी महिला २५, माजीसैनिक १३, प्रग्रस्त ४, भूग्रस्त २, खेळाडू ४, अंशकालीन ८, इतर २८, एसईबीसी २५ पैकी महिला ८, माजी सैनिक ४, प्रास्त १, खेळाडू १, भूग्रस्त १, अंशकालीन ३, इतर ७, ईडब्ल्यूएस ८ पैकी महिला ७, माजीसैनिक ३, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन २, इतर ८, ओबीसी ३५ पैकी महिला ११, माजीसैनिक ५, प्रग्रस्त २, भूग्रस्त १, खेळाडू २, अंशकालीन ४, इतर १०, अजा २४ पैकी महिला ७, माजीसैनिक ४, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन २, इतर ९, अज ३७ पैकी महिला ११, माजीसैनिक ६, प्रग्रस्त २, खेळाडू २, भूग्रस्त १, अंशकालीन ४, इतर ११, विजाअ ८ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ४, भजब २ पैकी महिला १, इतर १, भजक ५ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर १, भजड ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, विमाप्र ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २) पैकी अनाथ ३, अपंग १०
पात्रता – उमेदवार इंजि डिप्लोमा (सिव्हील) उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
२) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
पदसंख्या – १३० (ओपन ४४ पैकी महिला १३, माजी सैनिक ७, प्रग्रस्त २, भूग्रस्त १, खेळाडू २, अंशकालीन ४, इतर १५, एसईबीसी १३ पैकी महिला ४, माजीसैनिक २ प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन १ इतर ४, ईडब्ल्यूएस १८ पैकी महिला ५, माजी सैनिक ३, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन २, इतर ६, ओबीसी २० पैकी महिला ६, माजी सैनिक ३, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन २, इतर ७, अजा १२ पैकी महिला ४, माजीसैनिक २, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन १, इतर ३, अज १० पैकी महिला ३, माजी सैनिक २, प्रग्रस्त १, खेळाडू १, अंशकालीन १, इतर २, विजाअ १, भजन ३ पैकी महिला १ इतर २, भजक ५ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर १, भजड २ पैकी महिला १, इतर १, विमाप्र २ पैकी महिला १, इतर १) पैकी अनाथ १, अपंग ४
पात्रता – उमेदवार इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल / ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन इंजि./इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
३) पदाचे नाव – दुय्यम अभियंता (स्थापत्य)
पदसंख्या – २३३ (ओपन ७७ पैकी महिला २३ खेळाडू ४, इतर ५०, एसईबीसी २३ पैकी महिला ७, खेळाडू १, इतर १५, ईडब्ल्यूएस २३ पैकी महिला ७, खेळाडू १, इतर १५, ओबीसी ४७ पैकी महिला १४, खेळाडू २, इतर ३१, अजा २२ पैकी महिला ७, खेळाडू १, इतर १४, अज १४ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ९, विजाअ ४ पैकी महिला १, इतर ३, भजब २ पैकी महिला १, इतर १, भजक ८ पैकी महिला २, इतर ६, भजड ६ पैकी महिला २, इतर ४, विमाप्र ७ पैकी महिला २, इतर ५) पैकी अनाथ २, अपंग ९
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
४) पदाचे नाव – दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
पदसंख्या – ७७ (ओपन २५ पैकी महिला ८, खेळाडू १, इतर १६, एसईबीसी ८ पैकी महिला २, इतर ६, ईडब्ल्यूएस ८ पैकी महिला २, इतर ६, ओबीसी १० पैकी महिला ३, खेळाडू १, इतर ६, अजा १६ पैकी महिला ५, खेळाडू १, इतर १०, अज ४ पैकी महिला १, इतर ३, विजाअ २ पैकी महिला १, इतर १, भजब २ पैकी महिला १, इतर १, भजक १, भजड १) पैकी अनाथ १, अपंग ३
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन इंजि. / इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
संगणक अर्हता – उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीचे CCC किंवा O/A/B/C स्तरापैकी कोणत्याही एका परीक्षेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक, नसल्यास असे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्णपर्यंत असावे मागासवर्गीय उमेदवाराचे वय ४३ पर्यंत असावे, खेळाडू उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षे सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत, विभागीय कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादा लागू नाही.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ व २ साठी १४१,८००१,३२,३००/- तर पद क्रमांक ३ व ४ साठी रु.४४,९००१,४२,४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.२) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ३) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ४) उमेदवाराकडे डोमेसाईल प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला सादर करण आवश्यक मात्र शाळा सोडल्याचा दाखल्यामध्ये उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचे नमुद असणे आवश्यक. ५) उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणत्र उपलब्ध नसल्यास निवडीनंतर ६ महिन्याच्या आत सदर प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक. ६) खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची क्रिडाविषयक प्रमाणपत्रे योग्य दर्जाची असल्याबाबत व ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरतात याबाबत अर्ज सादर करण्या पूर्वीच सक्षम अधीकाऱ्याने प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न – १०० गुगंधी व ९० मिनिटे कालावधीची असेल. यामध्ये सामान्य ज्ञान (२० प्रश्न २० गुण), बौद्धिक क्षमता (२० प्रश्न – २० गुण), तांत्रिक ज्ञान (६० प्रश्न – ६० गुण) या विषयांवर आधारित – प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी ५० % मिळविणे आवश्यक ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी करून आणि चारीत्र्य पडताळणी करून अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखचनि उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करून घेणे आवश्यक परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साशंकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक
परीक्षा फी – उमेदवारांसाठी रु.१०००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.९००/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरून दि. १६ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड असल्यास ४) असल्यास अनुभव प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, एसईबीसी, ओबीसी, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी पात्रतेचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, अशंकालीन उमेदवार असल्यासे तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विवाहीत महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केले असल्यास तसे प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या तसेच मुळ साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १६ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *