बृहन्मुंबई महानगरपालिका : समन्वयक पदांसाठी पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १५ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ (गट क)
पदसंख्या – ३८ (ओपन १५ पैकी महिला ५, माजी सैनिक २, अंशकालीन २, खेळाडू १, प्रग्रस्त १, इतर ५, ईडब्ल्युएस ४ पैकी महिला १, माजी सैनिक १, इतर २, ओबीसी ७ पैकी महिला २, माजी सैनिक १, इतर ३, अजा ५ पैकी महिला २, माजी सैनिक १, अंशकालीन १, इतर १, अज २ पैकी महिला १, इतर १, विजाअ १, भजब १, भजक १, भजड १, विमाप्र १) पैकी अपंग २ (कर्णबधीर १, बहुविध अपंगत्व १)
पात्रता – उमेदवार ४५% गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा किंवा ४५ % गुणांनी इंजि डिप्लोमा उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतनश्रेणी – ₹२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
वयोमर्यादा – दिनांक १५ मार्च २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारांना वयात ४३ वर्षापर्यंत सवलत. अपंग /अपंग माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य/ सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. अंशकालीन उमेदवारांना वयात ५५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत.
सर्व पदांसाठी संगणक अर्हता – उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीचे CCC किंवा O/A/B/C स्तरापैकी कोणत्याही एका परीक्षेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक. नसल्यास असे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषय घेतला नसल्यास, नियुक्तीनंतर संबंधित नियमानुसार एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ३) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दिनांक १५ मार्च २०२४ रोजीचे धरले जाईल. ४) खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांची क्रिडा प्रमाणपत्रे अर्ज सादर करण्यापूर्वीच क्रिडा संचालनालयाकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक. ५) फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी व किमान ४० % कायमस्वरुपी विकलांगत्व असलेल्या उमेदवारांना, ते लिहिण्यास सक्षम नसल्यास, लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory Time) देण्यात येईल. मात्र, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात तसे नमुद करणे आवश्यक. तसेच लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांना स्वत:च करावी लागेल. ५) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि व्यवसायिक चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न, २०० गुणांची आणि १०० मिनिटे कालावधीची असेल. मराठी (१० प्रश्न२० गुण), इंग्रजी (१० प्रश्न- २० गुण), सामान्य ज्ञान (१० प्रश्न२० गुण), बुद्धीमत्ता (१० प्रश्न- २० गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (६० प्रश्न-१२० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची व्यवसायिक चाचणी घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले एक मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी ₹१०००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹९००/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अशी परीक्षा फी भरण्याची सुविधा ‘नोकरी-संदर्भ’ कार्यालयामध्ये उपलब्ध.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://portal.mcgm.gov.in/ या वेबसाईटवरून दि. १५ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकदाच अर्ज करावा. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची * प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक ४) जातीचा दाखला ५) डोमेसाईल प्रमाणपत्र ६) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजीसैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) अंशकालीन असल्यास तसे प्रमाणपत्र, ९) अपंग असल्यास तसा दाखला १०) प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, अंशकालीन उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- दि. १५ मार्च २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *