Bombay High Court: 75 Junior Advocates - govtjobsu.com

Bombay High Court: 75 Junior Advocates

omkar
3 Min Read

मुंबई उच्च न्यायालय : ७५ ज्युनिअर वकील पदांसाठी कायदा पंदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – ज्युनिअर लॉयर्स

एकुण पदसंख्या – ७५

 

विभागानुसार पदविभागणी –

१) भरती शाखा – हायकोर्ट

पदसंख्या – २५

पात्रता – उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असावा. बार कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक. उमेदवारास वकील व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. त्यापैकी किमान ७ केस हायकोर्ट मधील असणे आवश्यक.

 

२) भरती शाखा – सिटी सिव्हील कोर्टस, सेशन कोर्ट, स्मॉल कॉजेस, लेबर ॲण्ड इंडस्ट्रीअल कोर्ट इ.

पदसंख्या – २५

पात्रता – उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असावा. बार कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक. उमेदवारास वकील व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. त्यापैकी किमान ७ केस सिटी सिव्हील कोर्टस आणि इतर कोर्ट्स मधील असणे आवश्यक.

 

3) भरती शाखा – मेट्रोपोलीटन मॅजिस्ट्रेट कोर्टस (शिंदेवाडी, दादर ॲन्ड विले पार्ले)

पदसंख्या – २५

पात्रता – उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असावा. बार कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक. उमेदवारास वकील व्यवसायाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. त्यापैकी किमान ५ केस मेट्रोपोलीटन मॅजिस्ट्रेट कोर्ट मधील असणे आवश्यक.

 

वयोमर्यादा – दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी वय ५८ वर्षांहून अधिक नसावे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज समक्ष/पोस्टाने/कुरीअरने पाठविणे आवश्यक.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) बार कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र ३) अनुभव प्रमाणपत्र ४) वयाचा दाखला ५) आधारकार्ड ६) पॅनकार्ड ७) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी स्व साक्षांकीत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. असेच आणखी स्वसाक्षांकीत केलेले दोन फोटो अर्जासोबत जोडावेत.                      उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “ Expression of Interest (EOI) for empanelment of Junior Lawyers in BMC” असे लिहिणे आवश्यक. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज करण्याचा पत्ता – Law Officer, Legal Department, 3rd Floor, Brihanmumbai Municipal Corporation, Mahapalika Marg, Fort, मुंबई 400001

 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – दि.१६ फेब्रुवारी २०२४

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *