बॉम्बे इंजिनिअरींग ग्रु, पुणे : ट्रेड इन्स्ट्रक्स २०२४

बॉम्बे इंजिनिअरींग ग्रु, पुणे : ट्रेड इन्स्ट्रक्स २०२४

omkar
3 Min Read

बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप ॲण्ड सेंटर, खडकी, पुणे : सिव्हीलीअन ट्रेड इन्स्ट्रक्टर इ. पदांसाठी १०वी/१२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २४ मे २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव –  सिव्हीलीअन ट्रेड इन्स्ट्रक्टर – प्रिंटींग कोम्पोजिंग रीडींग (ऑफसेट प्रिंटर), आर्टीसन (वूड वर्क)

पदसंख्या – ईडब्ल्यूएस २ पैकी अपंग १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित ट्रेडमधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दि. २४ मे २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे ₹ १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत व आरक्षणात बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. स्कील टेस्ट मधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा केंद्र – पुणे

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. लेखी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र /ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र ७) आधारकार्ड ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो. चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो अर्जासोबत जोडावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वतःचा पत्ता लिहिलेला आणि रु २२ चे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठवणार त्या लिफाफ्यावर “ Application for the post of …………. Category : (EWS) (PWD)………….” असे लिहिणे आवश्यक. शासकीय निम- शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत तसेच अर्जासोबत ना हरकत प्रमाणपत्र जोडावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसांक्षाकित प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.

अर्ज करण्याचा पत्ता – The Commandant, Bombay Engineer Group and Centre, Khadki, Pune- 411003

 

अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- दि. २४ मे २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *