बँक ऑफ इंडिया : सिक्युरीटी ऑफीसर्स पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०३ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – मॅनेजर-सिक्युरीटी (MMGS-II),
पदसंख्या – (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ४, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट लागू नाही. आर्मी/नेव्ही/एअरफोर्स मधील कमिशन्ड ऑफीसर्स चा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. किंवा गॅझेटेड पोलिस/पॅरामिलिटरी/सेंट्रल पोलिस ऑर्गनाझेशन ऑफिसर फोर्स मधील असिस्टंट कमांडंट/डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलिस कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत, मात्र त्यांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असू नये.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४८१७०-६९८१०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०१ फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीवेळी उमेदवारांची वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये निबंधलेखन आणि पत्रलेखन यावर आधारित प्रश्न विचारले जातील. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी, माजीसैनिक उमेदवारांना ₹८५०/ – तर अजा/अज/अपंग उमेदवारांना ₹१७५/- अशी परीक्षा फी असून ती नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्वतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.bankofindia.co.in या वेबसाईटवरुन दि.०३ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) असल्यास आधारकार्ड
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई-रीसीट, सर्व शैक्षणिक, व्यवसायीक गुणपत्रे प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, वयाचा दाखला, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र अपंग असल्यास तसा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी उत्पन्नाचा आणि मालमत्तेचा दाखला, सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती सादर कराव्यात. शासकिय/निमशासकिय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्या वेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी वेळोवेळी www.bankofindia.co.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दि.०३ एप्रिल – २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *