बँक ऑफ बडोदा : ६०७ ऑफीसर्स इ. २०२४ - govtjobsu.com

बँक ऑफ बडोदा : ६०७ ऑफीसर्स इ. २०२४

omkar
6 Min Read

बँक ऑफ बडोदा : ६२७ सिनि. रिलेशनशिप मॅनेजर इ. पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

कॉन्ट्रॅक्ट बेसीस

१) पदाचे नाव – क्वालीटी अँश्युरन्स इंजिनिअर, पदसंख्या –

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय – २५ ते ३५ वर्षापर्यंत

 

२) पदाचे नाव – डेव्हलपर-फूल स्टॅक जावा, पदसंख्या

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय – २५ ते ३५ वर्षापर्यंत

 

३) पदाचे नाव – डेव्हलपर-फूल स्टॅक नेट अँण्ड जावा पदसंख्या –

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय – २५ ते ३५ वर्षापर्यंत

 

४) पदाचे नाव – डेव्हलपर मोबाईल अँप्लीकेशन डेव्हलपमेंट पदसंख्या – ५,

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २५ ते ३५ वर्षापर्यंत

 

५) पदाचे नाव – मॅनेजर एमएसएमई-सेल्स पदसंख्या – ११ (ओपन २, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ३, अजा २, अज २),

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २२ ते ३५ वर्षापर्यंत

 

६) पदाचे नाव – सिनिअर रीलेशनशिप मॅनेजर

पदसंख्या – २३४ (ओपन ६१, ईडब्ल्यूएस ४०, ओबीसी ७१, अजा ३३, अज २९) पैकी अपंग १६ (अस्थिव्यंग ४, अल्पदृष्टी ४. कर्णबधीर ४, अस्थिव्यंग ४)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २४ ते ३५ वर्षापर्यंत

 

७) पदाचे नाव – ईवेल्थ रिलेशनशिप मॅनेजर्स

पदसंख्या – २६ (ओपन १३, ईडब्ल्यूएस ४, ओबीसी ५, अजा ३, अज १) पैकी अपंग २ (अस्थिव्यंग १, अल्पदृष्टी १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वय – २३ ते ३५ वर्षापर्यंत

 

८) पदाचे नाव – असिस्टंट व्हाईस प्रसिडेंट एक्वेजिशन अँण्ड रिलेशनशिप मॅनेजर,

पदसंख्या – १९ (ओपन २, ईडब्ल्यूएस ५, ओबीसी ५, अजा ५, अज २),

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.,

वय – २३ ते ४० वर्षापर्यंत

 

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दि. ०१ जून २०२४ रोजीचे धरले जाईल. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन दिव्यांग (अपंग) १० वर्षे, ओबीसी दिव्यांग (अपंग) १३ वर्षे, तर अजा/अज दिव्यांग (अपंग) उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात ५ वर्षे सवलत.

वेतन – उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन अदा केले जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची वय, पात्रता, अनुभव दि. ०१ जून २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) वरील पदांशिवाय टेक्नॉलॉजी आर्कीटेक्ट, ग्रुप हेड, सेल्स मॅनेजर, सिनिअर मॅनेजर इ. पदांच्या सविस्तर माहितीसाठी वेबसाईट पहावी.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा/ ग्रुप डिस्कशन/मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या अजा/अज/दिव्यांग (अपंग) उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल / एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र) इ. सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु. ६००/-, तर महिला/अजा/अज/दिव्यांग(अपंग) उमेदवारांना होईपर्यंत वैध रु. १००/- अशी असून ती नेटबँकिंग /क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक. उमेदवारांनी www.bankofbaroda.co.in या वेबसाईटवरून दि. ०२ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फिकट बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फिकट बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) शेवटच्या महिन्यातील सॅलरी स्लीप ५) बायोडाटा उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, दिव्यांग(अपंग) असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.bankofbaroda.co.in ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०२ जुलै २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *