आर्मी : टेक्निकल ग्रॅज्यु. एन्ट्री : पदवी २०२४ - govtjobsu.com

आर्मी : टेक्निकल ग्रॅज्यु. एन्ट्री : पदवी २०२४

omkar
11 Min Read

इंडियन आर्मी, परमनंट कमिशन : टेक्नीकल ऑफिसर्स पदांसाठी इंजि. पदवी उत्तीर्ण/ अंतिम वर्षास बसलेल्या पुरुष उमेदवारांकडून दि. ०९ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

अभ्यासक्रमाचे नाव – Technical Graduate Course (TGC-140) (Jan 2025)

एकूण पदसंख्या – ३०

शाखेनुसार पदविभागणी पुढीलप्रमाणे –

१) सिव्हील- सिव्हील इंजि./सिव्हील (स्ट्रक्चरल इंजि) / स्ट्रक्चरल इंजि./ बिल्डींग इंजि. ॲण्ड कन्स्ट्रक्शन / बिल्डींग ॲण्ड कन्स्ट्रक्शन टेक्नॉ / सिव्हील ॲण्ड रूरल इंजि. / सिव्हील इंजि. ॲण्ड प्लॅनिंग/सिव्हील इंजि. (कन्स्ट्रक्शन टेक्नॉ.)/ सिव्हील ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर इंजि./सिव्हील टेक्नॉ/ कन्स्ट्रक्शन इंजि / कन्स्ट्रक्शन इंजि. ॲण्ड मॅनेजमेंट / कन्स्ट्रक्शन टेक्नॉ./कन्स्ट्रक्शन टेक्नॉ. ॲण्ड मॅनेजमेंट / जिओ इन्फर्मेटिक्स/ सिव्हील ॲण्ड एन्व्हार्मेटल इंजि./सिव्हील इंजि. (एन्व्हार्मेटल इंजि.)/सिव्हील इंजि. एन्व्हार्मेटल ॲण्ड पॉप्युलेशन कंट्रोल/एन्व्हायर्मेंट इंजि./एन्व्हायर्मेंटल इंजि./ एन्व्हायर्मेटल सायन्स ॲण्ड इंजि. / एन्व्हायर्मेंटल सायन्स ॲण्ड टेक्नॉ. /सिव्हील इंजि.(पब्लिक हेल्थ इंजि.) / एन्व्हायर्मेटल प्लॅनिंग, बिल्डींग कन्स्टर टेक्नॉलॉजी पदसंख्या – ०७

२) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग / कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) / इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी – कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर टेक्नॉ / कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग / कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग / ३-डी ॲनिमेशन ॲण्ड ग्राफिक्स / ॲडव्हान्सड कॉम्प्युटर ॲप्लीकेशन/कॉम्प्युटर ॲण्ड कम्युनिकेशन इंजि. / कॉम्प्युटर इंजि. ॲण्ड ॲप्लीकेशन / कॉम्प्युटर नेटवर्किंग/कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड टेक्नॉ / कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इन्फर्मेशन टेक्नॉ./कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड सिस्टीम इंजि./ कॉम्प्युटिंग इन कॉम्प्युटिंग/ कॉम्प्युटिंग इन मल्टीमिडीया/कॉम्प्युटिंग इन सॉफ्टवेअर/इलेक्ट्रीकल ॲण्ड कॉम्प्युटर इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कॉम्प्युटर इंजि./मॅथमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग/कॉम्प्युटिर इंजि. (सॉफ्टवेअर इंजि.) / कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. (नेटवर्कस)/नॅनो सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी/ आर्टिफिशल इन्टलिजन्स / मशिन लर्निंग / डाटा सायन्स प्रोग्राम / नॅनो टेक्नॉ/ रोबॉटिक्स ॲण्ड ऑटोमेशन / ऑटोमेशन ॲण्ड रोबोटिक्स/मेकॅट्रॉनिक्स इंजि. / इनफॉरमेशन टेक्नॉ./इनफॉरमेशन सायन्स ॲन्ड इंजि./सॉफ्टवेअर इंजि./ इनफॉरमेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नॉ / इनफॉरमेशन इंजि / इनफॉरमेशन सायन्स ॲन्ड टेक्नॉ/इनफॉरमेशन टेक्नॉ. ॲन्ड इंजि./एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स/एम.एस्सी कॉम्प्युटर इनफॉरमेशन टेक्नॉ./एम.एस्सी. ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स / 1 टेक्नॉ./एम.एस्सी इनफॉरमेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नों. पदसंख्या – ०७

३) इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल  इलक्ट्रॉनिक्स / इलक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्स्टुमेंटेशन / इन्स्टुमेंटेशन – इलेक्ट्रीकल इलेक्ट्रॉनिक्स इंजि. / इलेक्ट्रीकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर सिस्टीम) / इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल इंजि./ इलेक्ट्रीकल ॲण्ड पॉवर इंजि. / इलेक्ट्रीकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजि. / इलेक्ट्रीकल इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल इंजि./ इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड पॉवर / ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्स्टुमेटेशन इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टुमेटेशन ॲन्ड कंट्रोल इंजि./इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉ/ इन्स्ट्रमेशन ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्टुमेटेशन इंजि./ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन ॲन्ड इन्स्ट्रुमेंटेशन इंजि. पदसंख्या – ०३

 

४) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकॉम / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन/फायबर ऑप्टीक्स / टेलिकम्युनिकेशन/मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड मायक्रो वेव/ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स / सॅटॅलाईट कम्युनिकेशन – इलेक्ट्रॉनिक्स इंजि./पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड ड्राईव्हज् / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्स्टुमेंटेशन इंजि./ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड पॉवर इंजि. / डिजीटल टेकनिक्स फॉर डिझाईन ॲन्ड प्लॅनिंग / इलेक्ट्रॉनिक्स सायन्स ॲन्ड इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कंट्रोल सिस्टम/इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इलेक्ट्रीकल इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन टेक्नॉ/ इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम इंजि./इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉ./रेडिओ फिजीक्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड बायोमेडिकल इंजि./ऑपटिक्स ॲन्ड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिमॅट्रीक इंजि./इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिमॅटीक्स इंजि./ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजि. (टेक्नॉलॉजीशिअन इलेक्ट्रॉनिक रेडिओ) / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजि. (टेक्नॉलॉजी इन ‘इलेक्ट्रीक रेडिओ)/एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजि. / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजि./ कम्युनिकेशन इंजि./ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशनस / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन सिस्टीम इंजि.)/ इलेक्ट्रॉनिक्स (कम्युनिकेशन सिस्टीम ॲन्ड कम्युनिकेशन इंजि. (इंडस्ट्रीयल इंटीग्रेटेड) / इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजि. (मायक्रोवेव) / ॲडव्हान्सड कम्युनिकेशन ॲन्ड इनफॉरमेशन सिस्टीम / ॲडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड कम्युनिकेशन इंजि./एम.एस्सी कम्युनिकेशन / एम.एस्सी. मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड ॲडव्हान्सड कम्युनिकेशन / फ्रायबर ऑपटिक्स / टेलिकम्युनिकेशन इंजि. / मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड मायक्रोवेव इंजि./ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/ऑपटिक्स ॲन्ड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स इंजि./ सॅटॅलाईट कम्युनिकेशन पदसंख्या – ०४

५) मेकॅनिकल- मेकॅनिकल/प्रॉडक्शन /ॲटोमोबाईल/इंडस्ट्रियल / इंडस्ट्रियल / मॅन्युफॅक्चरींग / इंडस्ट्रियल इंजि. ॲन्ड एमजीटी / वर्कशॉप टेक्नॉलॉजी / एरोनॉटिकल / एरोस्पेस/एविओनिक्स – मेकॅनिकल इंजि. / मेकॅनिकल (मेकॅट्रॉनिक्स) इंजि./मेकॅनिकल ॲण्ड ॲटोमेशन इंजि./ ॲडव्हान्स मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड इन्डस्ट्रीअल ऑटोमेशन इंजि./ प्रोडक्शन इंजि./प्रॉडक्ट डिझाइन ॲन्ड डेव्हलपमेंट / प्रोडक्शन इंजि. ॲन्ड मॅनेजमेंट/प्रोडक्शन ॲन्ड इंडस्ट्रिअल इंजि./ ॲटोमोबाईल इंजि./ॲटोमोबाईल मेंटेनन्स इंजि. / ॲटोमोटीव टेक्नॉलॉजी/ मेकॅनिकल इंजि. (इंडस्ट्रि इंटिग्रेटड) इंजि. (ॲटोमोबाईल)/मेकॅनिकल मेकॅनिकल इंजि. (मॅन्युफॅक्चर मेकॅनिकल इंजि.) मेकॅनिकल इंजि. (प्रोडक्शन)/मेकॅनिकल इंजि. (वेल्डिंग टेक्नॉलॉजी)/मेकॅनिकल इंजि. ॲटोमोबाईल/मेकॅनिकल इंजि. डिझाईन / इंडिस्ट्रीयल इंजि./ इंडिस्ट्रीयल इंजि. ॲन्ड मॅनेजमेंट इंजि./ इंडिस्ट्रियल ॲन्ड प्रोडक्शन इंजि. / इंडिस्ट्रीयल इंजि. ॲन्ड मॅनेजमेंट इंजि./मॅन्युफॅक्चरींग इंजि./मॅन्युफॅक्चरींग इंजि. ॲन्ड टेक्नॉलॉजी/ मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस ॲन्ड ॲटोमेशन इंजि./ मॅन्युफॅक्चरींग सायन्स ॲन्ड इंजि. / मॅन्युफॅक्चरींग टेक्नॉलॉजी / वर्कशॉप टेक्नॉलॉजी ऍरोनॉटिकल इंजि./ऍरोस्पेस इंजि./ऍरो स्पेस इंजि./ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजि./एविओनिक्स इंजि./ एविशन इंजि.) पदसंख्या – ०७

 

६) मिस्क इंजि स्ट्रीम्स- आर्किटेक्चर/प्लास्टीक टेक/रिमोट सेन्सिंग/बालास्टीक्स/बायो मेडिकल इंजि./ फुड टेक/ अग्रिक्लचर/मेटलर्जीकल / मेटलर्जी ॲन्ड एक्सप्लोसिव्ह / लेझर टेक/बायो टेक/रबर टेक्नॉलॉजी/केमिकल इंजि./ ट्रान्सपोटेशन इंजि. / मायनिंग/न्युक्लिअर टेक्नॉलॉजी/टेक्सटाईल – आर्किटेक्चर टेक्नॉलॉजी / इंजि./आर्किटेक्चरल इंजि. / आर्किटेक्चरल असिस्टंटशिप/आर्किटेक्चर ॲन्ड इंटेरिअर डेकोरेशन/आर्किटेक्चर असिस्टंटशिप/प्लास्टिक टेक्नॉलॉजी/ रिमोट सेन्सिंग / बालीस्टिक्स इंजि./बायो मेडिकल इंजि./ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स/ फुड टेक्नॉलॉजी/ अॅग्रीकल्चर इंजि./ मेटलर्जीकल इंजि./मेटलर्जी ॲन्ड मटेरियल टेक्नॉलॉजी/ मेटलर्जी ॲन्ड मटेरियल इंजि. / मेटलर्जीकल ॲन्ड इंजि. ॲन्ड मटेरियल सायन्स/मेटलर्जी ॲन्ड एक्सप्लोसिव्हस इंजि./ लेझर टेक्नॉलॉजी/ बायो टेक्निकल/रबर टेक्नॉलॉजी/केमिकल इंजि./ ट्रान्सर्पोटेशन इंजि./मायनिंग/न्युक्लिअर टेक्नॉलॉजी/ टेक्सटाईल इंजि. पदसंख्या – २

 

पात्रता – उमेदवार संबंधित शाखेमधून इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण असावा. किंवा अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र अशा उमेदवारांनी दि. ०१ जानेवारी २०२५ पूर्वी पदवी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक.

शारिरीक पात्रता – उमेदवारांची उंची किमान १५७.५ सें.मी असणे आवश्यक. वजन उंचीच्या प्रमाणात असावे. दृष्टी – चष्म्याशिवाय ६/६० आणि ६/६०

वयोमर्यादा – दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२ जानेवारी १९९८ आणि १ जानेवारी २००५ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी – प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना ₹५६,१००/ – असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ₹१५६००-३९१०० /- + ग्रेड पे ₹ ५४०० + मिलिटरी सर्व्हिस पे ₹१५५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारास राहण्यासाठी जागा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा, ६० दिवसांची वार्षिक रजा, २० दिवसांची किरकोळ रजा, कॅन्टीन सुविधा, रेशन, ७५ लाखांचे आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे विमा संरक्षण इ. सेवा, सुविधा व भत्ते अदा केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड SSB मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्याचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात उमेदवारांची बुध्दिमत्ता चाचणी, चित्रचाचणी आणि समूहचर्चा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पहिल्या चाचणीत अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुपटास्क चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. यातील उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. वैद्यकिय चाचणीमधील अपात्र उमेदवार ४२ दिवसांच्या आत पुन्हा वैद्यकिय चाचणीसाठी मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांकडे अर्ज करु शकतात. वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. सदरच्या मुलाखती पाच दिवस चालतील. जे उमेदवार पहिल्यांदाच SSB चाचण्यांसाठी हजर 1 राहतील त्यांना जाता येताचा प्रवासखर्च दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी DG भरती कार्यालय तसेच www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

एसएसबी मुलाखत आणि प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना एसएसबी मुलाखतीचा दिनांक व वेळ निवडण्याबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. ई-मेल प्राप्त झालेल्या उमेदवारांना वेबसाईटवर लॉग-इन करून एसएसबी मुलाखतीचा दिनांक निवडावा लागेल. यानंतर उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. मुलाखतीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पासपोर्ट/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

प्रशिक्षण – TGC साठी निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे ४९ आठवड्यांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल आणि त्यांना सैन्यदलाचे नियमित वेतन दिले जाईल. टेक्नीकल इंजिनिअरींग पदवीधरांना (TGC) परमनंट कमिशन दिले जाईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना विवाह करता येणार नाही तसेच कुटुंबासोबत राहता येणार नाही. विवाह केल्यास उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल..

बढतीच्या संधी – प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारास लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. यानंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल या पदावर बढत्या मिळू शकतात.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरून दि. ०९ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. यानंतर ऑनलाईन अर्जात स्वत:ची माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कैन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. ऑनलाईन अर्जाची प्रिंट दोन प्रतीत काढावी.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (सेमिस्टरवाईज) ३) NCC प्रमाणपत्र (असल्यास) ४) आधार कार्ड.

निवडीच्यावेळी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या एका प्रिंटाऊटवर स्व-साक्षांकित केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन फोटो मुलाखतीच्यावेळी सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची एका प्रिंटाऊट सोबत १०वी, १२वी, बी.ई./बी.टेक ची सेमिस्टरवाईज आणि ईयरवाईज गुणपत्रे व प्रमाणपत्रे, पदवीच्या अंतिम वर्षास बसलेल्या उमेदवारांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलचे प्रमाणपत्र आणि पदवी १ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करण्याबाबतचे हमीपत्र, असल्यास एनसीसीचे प्रमाणपत्र/ क्रिडा प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. मुलाखतीच्यावेळी उमेदवारांनी वरील सर्व कागदपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहिती साठी www.joinindianarmy.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०९ मे २०२४ दुपारी ०३.०० वाजेपर्यंत

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *