Army Recruitment : Nursing Assistant : 12th 2024 - govtjobsu.com

Army Recruitment : Nursing Assistant : 12th 2024

omkar
8 Min Read

सैन्य दलातील : टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी पदांसाठी पुरुष उमेदवारांकडून भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २२ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी

पात्रता – उमेदवार कमीत कमी ५०% गुणांनी १२ वी विज्ञान (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्रजीविषयासह) उत्तीर्ण असावा. मात्र प्रत्येक विषयात ४०% गुण आवश्यक.

शारीरिक पात्रता – उंची १६७ – सें.मी. छाती न फुगवता ७७ सें.मी (५ सेंमी फुगवता येणे आवश्यक) . वजन ५० किग्रॅ वय १७ १/२ ते २३ या दरम्यान, म्हणजेच उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर २००१ ते ०१ एप्रिल २००७ (दोन्ही दिवस धरुन) दरम्यान झालेला असावा.

सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवार शारिरीकदृष्ट्या तंदुरूस्त असावा. सपाट तळवे, रंगांधळेपणा, रातांधळेपणा असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत. २) सैनिकांचे पाल्य / माजी सैनिकांचे पाल्य / युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकाचे पाल्य / माजी सैनिकाची विधवा पत्नी/ युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकाच्या विधंवा पत्नीचे दत्तक मूल किंवा जावाई / सैनिकाचे दत्तक मूल / माजी सैनिकाचे दत्तक घेतलेले मूल यांना उंचीमध्ये २ सें.मी. छातीमध्ये १ सें.मी., तर वजनामध्ये २ कि. ग्रॅ पर्यंत सवलत. ३) ॲथलेटीक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सींग, क्रिकेट, इक्वीस्टेरीअन, फूटबॉल, फेन्सींग, जिमनेस्टीक्स, गोल्फ, हॉकी, हॅण्डबॉल, ज्युदो, कब्बडी, कायाकिंग ॲण्ड कॅनोईंग, कराटे, रोईंग, रग्बी, स्विमिंग, डायव्हींग ॲण्ड वॉटर पोलो, स्क्रॅश, शुटींग, सेलिंग, तायक्वोंदो, ट्रायथलॉन, हॉलीबॉल, वेटलिफ्टिींग, रेसलिंग, विंटर गेम्स (आईस हॉकी, आयईस स्केटींग इ.). वुशु इ. क्रिडाप्रकारामधील पात्र खेळाडू उमेदवारांना (आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/ राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय खेळांमध्ये मागील २ वर्षांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान प्राप्त केलेले) उंचीमध्ये २ सें. मी., छातीमध्ये ३ सें. मी. तर वजनामध्ये ५ कियें पर्यंत सवलत. ४) आदिवासी भागातील उमेदवारांची उंची किमान १६२ सें.मी, छाती किमान ७७ सें.मी (५ सें.मी पुगवता येणे आवश्यक) व वजन किमान ४८ कि.ग्रॅ असावे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकिय चाचणीद्वारे जि केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची, १ तास कालावधीची, ५० प्रश्न आणि १०० गुणांची असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान (१० प्रश्न २० गुण), गणित (५ प्रश्न, १० गुण), फिजिक्स (५ अ प्रश्न १० गुण), बायोलॉजी (१५ प्रश्न, ३० गुण), केमिस्ट्री (१५ क प्रश्न ३० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर अ उत्तरांसाठी २ गुण दिले जातील तर चुकीच्या उत्तरांसाठी ०.५० गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. कागदपत्रे तपासणीमधील पात्र उमेदवारांची १०० गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये १.६ कि.मी. धाव ५ मिनिट ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे (६० गुण). १० बीम पुल अप्स (४० गुण), ९ फूट रुंद खड्डा पार करणे (उत्तीर्ण होणे आवश्यक) आणि झीग झॅग बॅलन्स (उत्तीर्ण होणे आवश्यक) अशा चाचण्या घेण्यात येतील. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल. वैद्यकिय चाचणीमध्ये तात्पुरते नाकारलेले उमेदवार ०५ दिवसांच्या आत MH/BH/CH यांचेकडून पुर्नचाचणी करून घेऊ शकतात. वैद्यकिय चाचणी मधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल.

ऑनलाईन परीक्षा दिनांक – २२ एप्रिल २०२४

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येइल. उमेदवारांनी प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घ्यावे. १) ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची रंगीत प्रत काढणे आवश्यक प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक. २) शारिरिक मोजमाप चाचणी आणि शारीरिक क्षमताचाचणी रॅलीसाठी जाताना (रॅली साठी उमेदवारांनी रॅली वेळेस स्वतंत्र प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक उमेदवारांनी खालील प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट व प्रमाणपत्रांच्या मूळ तसे गॅझेटेड ऑफिसरने साक्षांकित केलेल्या किंवा कॉलेज/शाळेचे प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी साक्षांकित ज्या उमेदवारांना उपलब्ध झाले नसेल त्या उमेदवारांनी आर्मी रिकूटींग ऑफीस कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

 

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे – १) १० वी/१२ वी/डिप्लोमा/ दाखला. पदवी गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र ३) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे तहसिलदार/ जिल्हाधिकारी किंवा राज्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला रहिवासी दाखला. (डोमेसाईल) ४) जातीचे प्रमाणपत्र ५) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी स्वत:चे, आई, वडिल यांचे नाव, उमेदवाराचे चारित्र्य, सध्याचा व कायमचा पत्ता असलेले नगर सेवक/सरपंच यांनी साक्षांकित केलेले जातीचे प्रमाणपत्र ६) संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस पाटील यांचेकडील (०६ महिन्यांच्या आतील तारखेचा) वडिलांचे व आईचे नाव, कायम व राहत्या घराचा पत्ता आणि पोलीस रेकॉर्ड/ गुन्हाचा रेकॉर्ड/ गुन्हा • सिद्ध न झाल्याचा चारित्र्याचा दाखला. ७) सरपंच / नगरसेवक यांनी साक्षांकित केलेला (०६ महिन्याच्या आतील तारखेचा ) चारित्र्याचा ८) शाळाचे हेडमास्टर/कॉलेजचे प्रिन्सिपल यांनी साक्षांकित केलेला चारित्र्याचा दाखला ९) असल्यास आय.टी.आय प्रमाणपत्र / एन.सी.सी प्रमाणपत्र/क्रिडा प्रमाणपत्रे/कॉम्प्युटर प्रमाणपत्र /वाहन चालविण्याचा वैध परवाना १०) पासपोर्ट आकाराचे पांढरी बॅकराऊंड असलेले २० रंगीत फोटो (गॉगल/टोपी न घातलेले) ११) सैनिकांचे पाल्य/माजी सैनिकांचे पाल्य/ युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकाचे पाल्य/माजी सैनिकाची विधवा पत्नी/ युद्धामध्ये मरण पावलेल्या सैनिकाच्या विधवा पत्नीचे पाल्य असल्यास रिलेशन सर्टिफिकेट, डिस्चार्ज बुक आणि रु.१०/- च्या स्टॅम्प पेपरवर आजी/माजी सैनिक/सैनिकाची विधवा पत्नी यांनी तयार केलले अॅफिडेव्हिट सादर करणे आवश्यक. सदरचे अॅफिडेव्हिट प्रथम श्रेणी अधिकारी यांनी साक्षांकित केलेले (सही व शिक्का) असणे आवश्यक. १२) पॅनकार्ड १३) आधारकार्ड १४) बँक पासबुक १५) १८ वर्षाखालील उमेदवारांनी खालील प्रमाणपत्र पालकांच्या सहीने सादर करणे आवश्यक. “There is No Objection from Parents/Guardian of the Child on his joining the Army. They are sending their child with their consent(s) to join the army.” १६) २१ वर्षापेक्षा कमी वय असल्यास अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र (सरपंच/ जिल्हाधिकारीद्वारे प्रमाणीत) १७) रु.१० च्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यातील नोटरी कडून साक्षांकित केलेले ॲफीडेव्हीट

परीक्षा फी – उमेदवारांना ₹२५०/- अशी परीक्षा फी असून ती नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी फक्त एकाच पदासाठी अर्ज करावा एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास उमेदवार अपात्र ठरविला जाईल. प्रथम उमेदवारांनी https://www.digilocker.gov.in/ या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक तसेच आपले सर्व प्रमाणपत्रे सदर वेबसाईटवर सेव्ह (save) करणे आवश्यक त्यानंतर www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरून दि. २२ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. पांढरी बॅकराऊंड असलेला रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर अर्जाची प्रिंटाऊट काढावी.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो व सही २) दहावीचे प्रमाणपत्र ३) आधार कार्ड ४) इतर सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) असल्यास एन.सी.सी प्रमाणपत्र ६) माजी सैनिक/सैनिकाचे पाल्य/भाऊ असल्यास रिलेशन सर्टिफिकेट

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. २२ मार्च २०२४

इतर सूचना – १) ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ज्या उमेदवारांना ॲडमीट कार्ड मिळाले असेल त्यांनाच या प्रक्रियेत सहभाग घेता येईल. २) भरतीला येताना त्यांनी ॲडमिट कार्डची प्रत सादर करणे आवश्यक. ॲडमीट कार्ड वरील सूचनेनुसार इच्छुकांनी भरतीस उपस्थित रहावयाचे आहे.

 

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *