आर्मी शॉर्ट सव्र्हींस कमिशन : NCC’C’ पात्रतेच्या पदांसाठी पदवी उत्तीर्ण/अंतिम वर्षास बसलेल्या अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून दि. ०८ मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
अभ्यासक्रमाचे नाव – NCC SPECIAL ENTRY SCHEME 56 COURSE – OCT 2024.
अभ्यासक्रमाची सुरुवात – ऑक्टोबर २०२४.
एकूण पदसंख्या – ५५
● पुरुष – ५० (४५ जनरल कैटेगरी आणि ५ सैन्यदलातील (फक्त आर्मी) युध्दात जखमी/हरवलेल्या/मरण पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांसाठी),
● महिला – ५ (४ जनरल कॅटेगरी आणि १ जागा सैन्यदलातील (फक्त आर्मी) युध्दात जखमी/हरवलेल्या/मरण पावलेल्या सैनिकांच्या पाल्यांसाठी)
शैक्षणिक पात्रता – NCC – सी प्रमाणपत्रधारकांसाठी उमेदवार सरासरी ५०% गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. ‘NCC – C’ चे किमान ‘बी’ श्रेणी प्रमाणपत्र असणे आवश्यक. तसेच NCC च्या सिनिअर विभागातील ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र परंतु त्यांना पदवीच्या पहिल्या दोन वर्षास/ पहिल्या तीन वर्षास मिळून सरासरी ५०% गुण असणे आवश्यक. अशा उमेदवारांनी दि. ०१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी पदवी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक.
● युध्दात जखमी/हरवलेल्या/मरण पावलेल्यांच्या सैनिकांच्या पाल्यांसाठी – उमेदवार सरासरी ५०% गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा, अशा उमेदवारांना NCC प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. मात्र, त्यांनी युध्दात जखमी / हरवलेल्या /मरण पावलेल्यांच्या सैनिकांचे पाल्य असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
शारीरिक पात्रता – पुरूष – इंची किमान १५७.५ सें.मी., वजन इंचीच्या प्रमाणात असावे. महिला – इंची १५२ सेंमी. वजन इंचीच्या प्रमाणात असावे. छाती किमान ५ सेमी फुगविता येणे आवश्यक. दृष्टी – ६/६०, ६/६०, कलर व्हीजन – CP-III वय – दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय १९ ते २५ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००५ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹ ५४०० + मिलिटरी सर्व्हिस पे ₹१५,५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारास राहण्यासाठी जागा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा, ६० दिवसांची वार्षिक रजा, २० दिवसांची किरकोळ रजा, कॅन्टीन सुविधा, रेशन, हवाई प्रवासासाठी ५० टक्के प्रवासभाड्यात सवलत, ७५ लाखांचे आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे विमा संरक्षण इ. सेवा, सुविधा व भत्ते अदा केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड SSB मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्याचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रचाचणी आणि समूहचर्चा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पहिल्या चाचणीत अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुपटास्क चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. यामधील उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. वैद्यकिय चाचणीमधील अपात्र उमेदवार ४२ दिवसांच्या आत पुन्हा वैद्यकिय चाचणीसाठी मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांकडे अर्ज करु शकतात. वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. सदरच्या मुलाखती पाच दिवस चालतील. जे उमेदवार पहिल्यांदाच SSB चाचण्यांसाठी हजर राहतील त्यांना जाता – येताचा प्रवासखर्च दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी DG भरती कार्यालय तसेच www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
SSB मुलाखत केंद्रे – अलाहाबाद, भोपाळ, बेंगलोर, कपुरथाळा.
प्रशिक्षण – निवड झालेल्या उमेदवारांना ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना विवाह करता येणार नाही.
सेवाकाळातील नियम व अटी – अ) प्रोबेशन : ऑफिसर पदावर नेमणूक झाल्यानंतर प्रथम ६ महिने प्रोबेशन कालावधी असेल. ब) नेमणूक : उमेदवारांची निवड १० वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी केली जाईल. ही सेवा पुढे १४ वर्षापर्यंत वाढविता येईल. १० वर्षांनंतर उपरोक्त पुरुष अधिकाऱ्यांना सैन्यदलातील आपला सेवेचा कालावधी वाढवायचा असेल व पुढील नियुक्तीसाठी जागा उपलब्ध असल्यास व त्यांची पात्रता असेल, अशांना परमनंट कमिशन दिले जाईल.
बढतीच्या संधी – उमेदवाराचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यास लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. यानंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल अशा पदांबर बढत्या मिळू शकतात.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक निवड्यासाठी ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. ज्या उमेदवारांना ई-मेल प्राप्त झाला आहे, अशा उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल लॉग-इन करून मुलाखतीचा दिनांक निवडावा व प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पासपोर्ट/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरून दि. ०८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही स्कॅन करुन अपलोड करावी. अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. उमेदवारांना दि. ०८ मार्च २०२४ रोजी दुपारी ०३.३० नंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट डाऊनलोड करता येईल. उमेदवारांनी अर्जाची दोन प्रतीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड ४) NCC प्रमाणपत्र उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत सर्व शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे (सेमिस्टरवाईज), NCC प्रमाणपत्र, पदवीच्या अंतिम वर्षास बसलेल्या उमेदवारांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलचे प्रमाणपत्र आणि पदवी ०१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी पूर्ण करण्याबाबतचे हमीपत्र, युध्दात जखमी/हरवलेल्या/मरण पावलेले सैनिक असल्याचे प्रमाणपत्र, युध्दात जखमी/हरवलेल्या/मरण पावलेले सैनिकांचे पाल्य असल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड इ. प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी www.joinindianarmy.nic.in ही वेबसाईट पाहणे आवश्यक.
महत्वाचे दिनांक –
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. ०८ मार्च २०२४, दुपारी ०३.०० वाजेपर्यंत
ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट डाऊनलोड करण्याचा दिनांक दि. ०८ मार्च २०२४, दुपारी ०३.३० नंतर
–