आर्मी इंजि. : १०+२ टेक्निकल एन्ट्री २०२४ - govtjobsu.com

आर्मी इंजि. : १०+२ टेक्निकल एन्ट्री २०२४

omkar
5 Min Read

इंडियन आर्मी : १०+२ टेक्नीकल एन्ट्री स्कीम कोर्स जानेवारी २०२५ साठी १२ वी विज्ञान (पीसीएम) उत्तीर्ण अविवाहित पुरुष उमेदवारांकडून दि. १३ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

• कोर्सचे नाव – १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स ५२

• कोर्सची सुरुवात – जानेवारी 000 २०२५

कमिशन प्रकार – परमनंट कमिशन

पदसंख्या – ९०

पात्रता – उमेदवार १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा. मात्र फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांमध्ये सरासरी ६० % असणे आवश्यक. + जेईई मेन्स २०२३ परीक्षेस बसलेला गुण असावा.

शारीरिक पात्रता – उंची – १५७ सें. मी, दृष्टी – दूरदृष्टी चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९, कलर व्हीजन CP III

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते १९ वर्षे या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२ जुलै २००५ ते १ जुलै २००८ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – प्रथम जेईई मेन्स २०२४ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची SSB मुलाखत घेण्यात येईल. त्याचे दोन टप्पे असून पहिल्या टप्प्यात बुध्दिमत्ता चाचणी, चित्रचाचणी आणि समूहचर्चा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पहिल्या चाचणीत अयशस्वी होतील त्यांना त्याच दिवशी परत पाठविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, ग्रुपटास्क चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. यातील उत्तीर्ण वैद्यकिय उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. चाचणीमधील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. सदरच्या मुलाखती पाच दिवस चालतील. जे उमेदवार पहिल्यांदाच एसएसबी चाचण्यांसाठी हजर राहतील त्यांना जाता येताचा प्रवासखर्च दिला जाईल.

मुलाखत केंद्रे – अलाहाबाद, भोपाळ, बेंगलोर, कपुरथाळा

प्रशिक्षण – निवड झालेल्या उमेदवारांना एकूण ५ वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. प्रथम उमेदवारास ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी गया येथे १ वर्षाचे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग दिले जाईल. यानंतर उमेदवारास अभियांत्रिकी प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये फेज १ मध्ये ३ वर्षांचे ट्रेनिंग दिले जाईल व यानंतर फेज २ मध्ये १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. हे ट्रेनिंग सीएमई, पुणे किंवा एमसीइएमई सिकंदराबाद किंवा एमसीटीई महू येथे देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारास इंजिनिअरींग पदवी बहाल करण्यात येईल. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाईल. पुस्तके इत्यादी साहित्यही विनामूल्य देण्यात येईल. शिवाय गणवेश, निवास व भोजन मोफत असेल.

वेतनश्रेणी – ३ वर्षे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना ₹ ५६,१००/- असे विद्यावेतन अदा केले जाईल. ४ वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना ₹१५६००-३९१००/- + ग्रेड पे ₹ ५४००/- + मिलिटरी सर्व्हिस पे ₹१५,५००/- अशा नियमित वेतनश्रेणीत लेफ्टनंट पदावर सामावून घेतले जाईल.

बढत्या – यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट पदावर नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. त्यानंतर उमेदवारास कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडीयर, मेजर जनरल अशा बढत्या दिल्या जातील.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवरून दि. १३ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी प्रथम या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची माहिती भरावी. फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट दि. दि. १३ जून २०२४ रोजी दुपारी १२.३० पासून प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) १० वी १२ वीची गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जेईई मेन्स २०२४ अॅडमिट कार्ड ४) NCC प्रमाणपत्र (असल्यास) ५) आधार कार्ड. एसएसबी मुलाखतीच्यावेळी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत १० वी व १२ वीची गुणपत्रे व प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र इत्यादी प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती असलेले दोन संच व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे २० फोटो इ. सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १३ जून २०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *