एअरपोर्ट सर्व्हिस, मुंबई : ४३०५  / airport vacancy 2024

एअरपोर्ट सर्व्हिस, मुंबई : ४३०५  / airport vacancy 2024

omkar
4 Min Read

airport service mumbai job vacancy : ४३०५ एक्झीक्युटीव्ह, हॅण्डीमन इ. पदांसाठी १० वी/१२ वी / डिप्लोमा इ. उत्तीर्ण उमेदवारानां दिनांक १४ ते १६ जुलै २०२४ दरम्यान विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीसाठी बोलावीत आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव –  रॅम्प सर्व्हिस एजंट,

पदसंख्या – ४०६

पात्रता – उमेदवार इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक / अँटोमोबाईल) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार आयटीआय (मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रीकल/एअर कंडीशनिंग / डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) उत्तीर्ण असावा आणि संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. हिंदी/इंग्रजी / स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक तसेच जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.

 

२) पदाचे नाव – युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर,

पदसंख्या – २६३

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा तसेच जड वाहन चालवण्याचा वैध परवाना आवश्यक.

 

३) पदाचे नाव –  हॅण्डीमन (मदतनीस) (पुरुष),

पदसंख्या – २२१६

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. स्थानीक भाषेचे व हिंदी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य. संबंधीत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 

४) पदाचे नाव – युटीलीटी एजंट्स (पुरुष),

पदसंख्या – २२

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. स्थानीक भाषेचे व हिंदी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य. संबंधीत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 

टिप – डेप्यु. टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर- रॅम्प, ड्युटी मॅनेजरपाक्स, ड्युटी ऑफिसर- पाक्स, ड्युटी ऑफिसर- कार्गो, ज्यु. एक्झीक्युटीव्ह – पाक्स, ज्यु. एक्झीक्युटीव्ह – टेक्नीकल, एसआर. रॅम्प सर्व्हिस एजंट इ. पदांच्या सविस्तर माहितीसाठी aiasl.in ही वेबसाईट पहावी.

वयोमर्यादा – दिनांक ०१ जुलै २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २८ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा/ अज उमेदवारांना ५ वर्षे सवलत.

वेतन – उमेदवारांना पद क्र. १ साठी रु.२७,४५०/- द.म. पद क्र. २ साठी रु.२४,९६०/- द.म. पद क्र. ३ व ४ साठी रु.२२,५३०/- द.म. असे वेतन अदा केले जाईल

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय पात्रता इ. ०१ जुलै २०२४ रोजीचे धरले जाईल.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखत/स्कील टेस्ट/ शारीरिक क्षमता चाचणी द्वारे केली जाईल. उमेदवारांनी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार निवडीसाठी उपस्थित रहावे. पदांसनुसार निवडपद्धत पुढील प्रमाणे रॅम्प सव्र्हस एजंट/ युटीलीटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर पदांसाठी उमेदवारांची निवड स्कीलटेस्टद्वारे केली जाईल तर हॅण्डीमन पदांसाठी उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणीद्वारे केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

पदानुसार निवड दिनांक – १) पद क्रमांक १ व २ साठी १४ व १५ जुलै २०२४,२) पद क्रमांक ३ व ४ साठी १६ जुलै २०२४

निवडीचा पत्ता – GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2 Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.

परीक्षा फी – उमेदवारांना रू.५०० अशी परीक्षा फी असून ती AI AIRPORT SERVICES LIMITED यांच्या नावे पेयेबल अँट Mumbai अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी स्वरूपात अर्जासोबत जोडावे. डी.डी च्या पाठीमागे उमेदवारांनी स्वतःचे नाव व मोबाईल नं. लिहावे. अजा/अज/माजी सैनक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातील अर्जासह निवडसाठी उपस्थित रहावे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) डोमेसाईल प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) आधार कार्ड ९) परीक्षा फी डी.डी १०) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवावा.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठावावेत व अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.

निवडीचा पत्ता – GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2 Gate No. 5, Sahar, Andheri-East, Mumbai-400099.

 

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *