भारतीय वायूसेना : NCC स्पेशल एन्ट्री स्कीम : कमिशन्ड फ्लाईंग ऑफिसर पदांसाठी पदवी उत्तीर्ण/ बसलेल्या पुरुष व महिला उमेदवारांकडून दि. २८ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नांव – कमिशन्ड फ्लाईंग ऑफिसर
भरतीचा प्रकार – पर्मनंट कमिशन –पुरुष व महिला 918 स्पर्श उमेदवार (217/25F/PC/ M),
शॉर्ट सर्व्हिस कमिशन – पुरुष व महिला उमेदवार (217/ 25F/SSC/M & W)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा, मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार ६० % गुणांनी बी.ई/बी.टेक उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार ६० % गुणांनी असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टीट्युट इंजिनिअर्स किंवा एरॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र ३० मे २०२५ पूर्वी उत्तीर्ण होणे आवश्यक. तसेच उमेदवाराने एन.सी.सी एअर विंगचे सिनिअर डिव्हीजन ‘सी’ प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै २००१ ते ०१ जुलै २००५ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. कमर्शियल पायलट लायसन्स धारक उमेदवारांना वयात २६ वर्षांपर्यंत सवलत. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००५ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उंची – १६२.५ सें.मी. पायांची उंची – ९९ सें.मी ते १२० सें.मी, मांड्यांची उंची – ६४ सें.मी पर्यंत, बैठक उंची – ८१.५ ते ९६ सें.मी दृष्टी – चष्म्याशिवाय एक डोळा ६/६, दूसरा डोळा ६/९ करेक्टेबल टू ६/६ असावा. रंगज्ञान (Colour perception) : CP-I असे असणे आवश्यक. उमेदवारांचे गुडघे एकमेकास टेकलेले नसावे. सपाट तळवे, तिरळेपणा, रातांधळेपणा व रंगांधळेपणा असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत. अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१५६००-३९१०० + ग्रेड पे ₹ ५४००/- + मिलीटरी सर्व्हिस पे ₹१५५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय सेवेच्या काळात विनामूल्य वैद्यकीय सेवा, स्वतःसाठी तसेच अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी सवलतीच्या दरात प्रवास, ग्रुप हाऊसिंगचे फायदे, ७५ लाखांचा विमा इ. सोयी, सवलती देण्यात येतील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड AFSB मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखत एकूण ३ स्टेजमध्ये घेतली जाईल. पहिल्या स्टेजमध्ये ऑफिसर इंटेलिजन्स रेटींग टेस्ट तसेच पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि डिस्कशन टेस्ट यांचा समावेश असेल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईलयामधील अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठवले जाईल. कागदपपत्रे तपासणीमधील पात्र उमेदवारांची स्टेज २ मध्ये ग्रुप टेस्ट, सायकॉलॉजीकल टेस्ट व मुलाखत घेतली जाईल. स्टेज २ मधील पात्र उमेदवारांची कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम टेस्ट (CPSS)/ PABT टेस्ट घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. जे उमेदवार अशा मुलाखतींसाठी पहिल्यांदाच हजर राहणार आहेत त्यांना जाता-येताचा प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळख पत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हींग लायसन्स/मतदान ओळखपत्र) तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ आणि साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
मुलाखत ठिकाण – देहरादून, म्हैसूर, वाराणसी
प्रशिक्षण – प्रशिक्षण जुलै २०२५ पासून सुरु होईल. प्रशिक्षणाचा कालावधी ७४ आठवडे असेल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.afcat.cdac.in या वेबसाईटवरून दि. २८ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फोटो काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व अंगठ्याचा ठसा स्कॅन करुन अपलोड करावा आणि अर्ज / काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) एन.सी.सी प्रमाणपत्र २) रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, पुरुष उमेदवारांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, महिला उमेदवारांसाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) आधारकार्ड ५) गेट परीक्षा उत्तीर्ण असल्यास गेट स्कोअर कार्ड उमेदवारांनी मुलाखतीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, परीक्षा फी ई- रिसीट, वयाचा दाखला, असल्यास एनसीसी सी प्रमाणपत्र, पदवीच्या अंतिम वर्षास बसलेल्या उमेदवारांनी कॉलेज प्राचार्यांकडून प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती, त्यांच्या साक्षांकित प्रतींचे दोन संच तसेच फिकट रंगाचे कपडे घालून काढलेले आणि पांढरी बॅकराऊंड असलेले २० रंगीत फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. एअरमन आणि शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य यंत्रणेमार्फत भरावेत तसेच मुलाखतीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.afcat.cdac.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २८ जून २०२४
महत्त्वाच्या सूचना – २५ वर्षाच्या आतील उमेदवार अविवाहीत असावेत.
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *