इंडियन एअरफोर्स : अग्निवीर (वायु) (म्युझीशिअन) पदांसाठी १० वी उत्तीर्ण अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून दि. ०५ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नांव – एअरमन अग्निवीर (वायु) (म्युझीशिअन )
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
संगीताचे ज्ञान – कंन्सर्ट फ्ल्युट/ पीकोलो, ओबो, सनई, सॅक्सोफोन, फ्रेंच हॉर्न, ट्रम्पेट, ट्रॉम्बोन, बॅरीटोन, युफोनिअम, बास/ट्युबा, किबोर्ड, गिटार, व्हायोलिन, ड्रम किंवा भारतीय किंवा विदेशी मुळातील कोणतीही इतर वाहा उत्तम वाजविता येणे आवश्यक. याशिवाय उमेदवाराकडे संगीताचे पायाभूत ज्ञान, वाद्यांचे ज्ञान असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. ०२ जानेवारी २००४ ते ०२ जुलै २००७ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उंची पुरुष उमेदवार असणे आवश्यक. महिला उमेदवार पुरुष उमेदवार – १६२ सें.मी. १५२ सेमी, छाती – ७७ सेमी तसेच कमीत कमी ५ सें.मी. फुगणे आवश्यक., महिला उमेदवार – कमीत कमी ५ सें.मी. फुगणे आवश्यक. वजन – उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. उमेदवाराकडे रातांधळेपणा, रंगांधळेपणा नसावा तसेच उमेदवाराची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी. श्रवण क्षमता चांगली असावी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदरुस्त असावा.
वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना पहिल्यावर्षी ₹ ३०,०००/- द. म, दुसऱ्या वर्षी ₹३३,०००/- द. म, तिसऱ्यावर्षी ₹३६,५००/- द. म तर चौथ्या वर्षी ₹४०,०००/ – द. म असे वेतन अदा केले जाईल. वेतनश्रेणीशिवाय रेशन, कपडे, राहण्याची सोय, ३० दिवसांची वार्षिक रजा, स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी विनामृल्य वैद्यकिय सेवा, सवलतीच्या दरात प्रवास, ४८ लाखांचा विनामृल्य सोयी व सवलती दिल्या जातील. ४ वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना १०.४ लाख इतका सेवा निधी पॅकेज दिले जाईल.
सेवा कालावधी – उमेदवारांची नेमनुक ०४ वर्षांची असेल. ४ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केल्य. नतर उमेदवारास हवाई दलामार्फत स्कील प्रमाणपत्र अदा केले जाईल. ज्याच्या आधारावर उमेदवारास इतर नोकरी साठी प्रयत्न करताना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही स्थितीत उमेदवारास निवृत्त सैनिकाचा दर्जा दिला जाणार नाही.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड संगीताची चाचणी, कागदपत्रे तपासणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची संगीताची चाचणी घेतली ‘जाईल यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १.६ कि.मी धाव ०६ मि. ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे, निर्धारीत केलेल्या वेळेत १० पुशअप्स, १० उठक-बैठक, २० स्क्वॅट्स इ. चाचण्यांचा समावेश असेल. शारीरिक क्षमता चाचणीस येताना उमेदवारांनी खेळाचे बुट आणि कपडे आणणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची कल क्षमता चाचणी (ॲडॅप्टिबिलीटी टेस्ट) घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीच्यावेळी ४-५ दिवस राहण्याच्या तयारीने यावे. कोणत्याही उमेदवारास जाता-येताचा प्रवासखर्च तसेच राहण्या-जेवणाचा खर्च दिला जाणार नाही.
रॅली दिनांक – ०३ जुलै – १२ जुलै २०२४
परीक्षा केंद्रे – उमेदवारांना अर्ज भरताना योग्य त्या परीक्षा केंद्राची निवड करावी लागेल. एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना जुलै मध्ये प्रवेशपत्र ई-मेल तसेच वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक, परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रतीसह सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹१००/- + जीएसटी अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार ॲक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरू शकतात.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक. उमेदवारांनी होईपर्यंत वैध www.agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवरून दि. २२ मे २०२४ ते दि. ०५ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताचा अंगठा व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून ॲक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. उमेदवारांची अर्जाची रंगीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही..
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला अलीकडील काळात काढलेला १ एप्रिल २०२२ नंतर काढलेला फोटो (उमेदवारांनी फोटो काढताना काळ्या पाटीवर स्वतःचे नाव आणि फोटो काढलेला दिनांक कॅपीटल अक्षरात पांढऱ्या खडूने लिहिणे आवश्यक) २) सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ३) १० वी प्रमाणपत्र ४) १२ वी गुणपत्र ५) इंजि. डिप्लोमा गुणपत्रे ६) उमेदवार १८ वर्षाखालील असल्यास पालकांची सही ७) आधारकार्ड उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीवेळी ऑनलाईन अर्जाच्या रंगीत प्रिंटाऊट, फेज १ व फेज २ च्या प्रवेशपत्राची रंगीत प्रत, सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व प्रत्येकी ४-४ स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे ०८ फोटो, असल्यास एन.सी.सी. प्रमाणपत्राची मुळ प्रत व ४ स्वसाक्षांकित प्रती, अधीक पात्रता आणि इतर गुणवत्ता असल्यास तसे मुळ प्रमाणपत्र व ४ स्वक्षांकित प्रती, एअरफोर्समधील सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलांनी तसे प्रमाणपत्र / डिस्चार्ज बुक आणि त्याच्या ४ स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. याशिवाय एचबी पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, स्टॅपलर, गम ट्युब आणि ब्ल्यु/ब्लॅक बॉल पॉईंट पेन सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.agnipathvayu.cdac.in किंवा careerinindianairforce.cdac.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. २२ मे २०२४ ते दि. ०५ जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *