Agricultural Science Centre, Aurangabad : असिस्टंट्स पदांसाठी १० वी/ पदवी/ उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २२ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (लाईव्हस्टॉक प्रोडक्शन),
पदसंख्या – १,
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (अँनिमल सायन्स) उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – असिस्टंट,
पदसंख्या – १,
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – ट्रॅक्टर ड्रायव्हर,
पदसंख्या – १,
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. ट्रॅक्टर ड्रायव्हींगचे विहित परवाना आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १ साठी ३५ वर्षांपर्यंत तर उर्वरीत पदांसाठी ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु.१५,६०० – ३९,१०० + ग्रेड पे रु.५४००/-, पद क्रमांक २ साठी रु.९,३०० – ३४,८०० + ग्रेड पे रु.४२००/- तर पद क्रमांक ३ साठी रु.५,२०० – २०,२०० + ग्रेड पे रु.२०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. निवडीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड / पासपोर्ट / पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी रु.५००/- अशी परीक्षा फी असून ती MGM,KVK, Gandheli, Aurangabad यांच्या नावे Payable at Aurangabd अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँंकेच्या डी.डी. स्वरूपात अर्जासोबत जोडावी, अजा/ अज / महिला व उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही,
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक, उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) डी.डी. २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला, औबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसा दाखला ६) पद क्र. साठी वैध वाहन चालवण्याचा परवाना ७) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ८) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकारणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवाबा, उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोड़ाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Appication for the post of_______” असे लिहिणे आवश्यक, शासकीय /निमशासकीय / विभागीय कर्मचार्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोड़ावे, उमेदवारांनी निवडीच्या वेळी वरील सर्व प्रमाणपत्राच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – “Hon. Secretary, Mahatma Gandhi Mission, N6, CIDCO, Chh.Sambajinagar (Aurangabad), Maharashtra, 431003”
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २२ डिसेंबर २०२४.
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *