एअरफोर्स – फ्लाईंग, टेक्निकल, ग्राऊंड ड्युटी ऑफिसर या पदांसाठी पदवी/उच्चपदवी उत्तीर्ण/ अंतिम वर्षास बसलेल्या पुरूष व महिला उमेदवारांकडून दि. २८ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
परीक्षेचे नाव – Air Force Common Admission Test S (AFCAT)- 02/2024
अभ्यासक्रमाची सुरुवात – जुलै २०२५
१) फ्लाईंग ब्रँच –
अभ्यासक्रमाचे नाव – Short Service Commission (218 SSC) Course No. : 218/25F/SSC/M & W
पदसंख्या – २९ (पुरूष – १८, महिला – ११)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा, मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात . प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार ६० % गुणांनी बी.ई./बी.टेक उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक किंवा उमेदवार ६० % गुणांनी असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टीट्युट इंजिनिअर्स किंवा एरॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण असावा.मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी उत्तीर्ण होणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै २००१ ते ०१ जुलै २००५ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. कमर्शियल पायलट लायसन्स धारक उमेदवारांना वयात २६ वर्षांपर्यंत सवलत. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जानेवारी २००५ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उंची : १६२.५ सें.मी. पायांची उंची – ९९ सें.मी ते १२० सें.मी. मांड्यांची उंची – ६४ सें. मी पर्यंत, बैठक उंची – ८१.५ ते ९६ सें.मी दृष्टी – चष्म्याशिवाय एक डोळा ६/६, दूसरा डोळा ६/९ करेक्टेबल टू ६/६ असावा. रंगज्ञान (Colour perception) : CP-I असे असणे आवश्यक. उमेदवारांचे गुडघे एकमेकास टेकलेले नसावे. सपाट तळवे, तिरळेपणा, रातांधळेपणा व रंगांधळेपणा असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत. अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
२) ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल बँच) –
अभ्यासक्रमाचे नांव – Short Service Commission (216 SSC), Course No. 217/25T/SSC/107AEC (M & W)
पदसंख्या – १११ एरॉनॉटीकल इंजिनिअर्स (इलेक्ट्रॉनिक्स) AE (L) – (पुरूष -८८, महिला-२३)
पदसंख्या – ४५ एरॉनॉटीकल इंजिनिअर (मेकॅनिकल) AE (M) – ( पुरुष- ३६, महिला-९)
शाखेनुसार पात्रता –
• एरॉनॉटीकल इंजिनिअर्स (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार ६० % गुणांनी बी.ई./बी.टेक (खालीलपैकी कोणतीही शाखा) उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक किंवा उमेदवार ६० % गुणांनी असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टीट्युट इंजिनिअर्स किंवा एरॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार ६० % गुणांनी इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनची ग्रॅज्युएट मेंबरशिप एक्झामिनेशन उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र ३० मे २०२५ पूर्वी उत्तीर्ण होणे आवश्यक.
उमेदवार पुढीलपैकी कोणत्याही एका शाखेमधून इंजि. पदवी उत्तीर्ण असावा. – •Applied Electronics & Instrumentations •Communication Engineering, •Computer Engineering / Technology, •Computer Engineering & Application, •Computer Science and Engineering / Technology. •Electrical and Computer Engineering, •Electrical and Electronics Engineering, •Electrical Engineering, •Electronics Engineering/ Technology. •Electronics Science and Engineering, •Electronics, •Electronics and communication Engineering. •Electronics and Computer Science •Electronics and/or Telecommunication Engineering •Electronics and/or Telecommunication Engineering (Microwave), •Electronics and computer Engineering, •Electronics Communication and Instrumentation Engineering, •Electronics Instrument & Control, •Electronics Instrument & Control Engineering, •Instrumentation & Control Engineering, •Instrument & Control Engineering, Information Technology. •Spacecraft Technology, •Engineering Physics, •Electric Power and Machinery Engineering •Infotech Engineering, •Cyber Security.
•एरॉनॉटीकल इंजिनिअर (मेकॅनिकल) – उमेदवार ६० % गुणांनी बी.ई./बी.टेक (खालीलपैकी कोणतीही शाखा) उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक किंवा उमेदवार ६० % गुणांनी असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टीट्यूट इंजिनिअर्स किंवा एरॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण असावा. मात्र १२ वीस गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुण असणे आवश्यक. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र ३० मे २०२५ पूर्वी उत्तीर्ण होणे आवश्यक.
उमेदवार पुढीलपैकी कोणत्याही एका शाखेमधून इंजि. पदवी उत्तीर्ण असावा. – •Aerospace Engineering, •Aeronautical Engineering, •Aircraft Maintenance Engineering, •Mechanical Engineering. •Mechanical Engineering and Automation, •Mechanical Engineering (Producation), •Mechanical Engineering (Repair and Maintenance), •Mechatronics, •Industrial Engineering. •Manufacturing engineering, •Production and industrial engineering, •Materials Science and Engineering, •Metallurgical and Materials Engineering, •Aerospace and Applied Mechanics •Automotive Engineering, •Robotics, •Nanotechnology, •Rubber Technology and Rubber Engineering
३) ग्राऊंड ड्युटी (नॉन टेक्निकल ग्रंथ), –
अभ्यासक्रमाचे नाव – a) Short Service Commission (217 SSC) Course No. 217/25G/SSC/M & W
पदसंख्या – वेपन सिस्टम – (WS) बॅच पदसंख्या १७ (पुरुष १४, महिला-३), ॲडमिन-पदसंख्या ५४ (पुरुष- ४३. महिला – ११), LGS पदसंख्या १७ (पुरूष – १३. महिला-४), Accts पदसंख्या १२ – (पुरूष – १०, महिला- २), Edn पदसंख्या ९ – (पुरूष -०७, महिला-२), Met पदसंख्या ७- (पुरूष – ७, महिला-२)
शाखा व पात्रता – •(WS) बँच – उमेदवार १२ वी गणित व फिजिक्स विषयात प्रत्येकी ५० % गुणांनी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ६० % गुणांनी बी.ई./बी.टेक उत्तीर्ण असावा.
•ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड लॉजेस्टीक बँच – उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ६० % गुणांनी असोशिएट मेंबरशीप ऑफ इन्स्टीट्यूट इंजिनिअर्स किंवा एरॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण असावा. पदवीच्या अंतिम वर्षास बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र, मात्र ३० मे २०२४ पूर्वी उत्तीर्ण होणे आवश्यक.
•अकौंट्स बँच – उमेदवार ६० % गुणांनी बी. कॉम किंवा पदवी (बीझनेस ॲडमिनिस्ट्रेशन – फायनांन्स विषयासह) किंवा पदवी (मॅनेजमेंट स्टडीज – फायनांन्स विषयासह) किंवा पदवी (बीझनेस स्टडीज – फायनांन्स विषयासह) किंवा सीए/सीएमए/सीएस/ सीएफए उत्तीर्ण असावा किंवा बी.एस्सी (फायनान्स) उत्तीर्ण असावा.
•एज्युकेशन – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार ६० % गुणांनी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.
•मटेरिऑलॉजी – उमेदवार ६० % गुणांनी १२ वी आणि बी.एस्सी. (फिजीक्स आणि मॅथेमॅटिक्स) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ६० % गुणांनी पदवी (इंजिनिअरींग/टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.
उमेदवार पुढीलपैकी कोणत्याही एका शाखेमधून इंजि. पदवी उत्तीर्ण असावा. – ●Communication Engineering, ●Computer Engineering / Technology, ●Computer Engineering & Application, ●Computer Science and Engineering / Technology, ●Electrical and Computer Engineering, ●Electrical and Electronics Engineering, ●Electronics Engineering / Technology, ●Electronics Science and Engineering, ●Electronics, ●Electronics and communication Engineering, ●Electronics and Computer Science ●Electronics and / or Telecommunication Engineering ●Electronics and /or Telecommunication Engineering (Microwave), ●Electronics Communication and Instrumentation Engineering ●Information Technology. ●Mechanical Engineering
वयोमर्यादा – ग्राऊंड ड्युटी टेक्निकल व नॉन टेक्निकल पदांसाठी- दि. १ जुलै २०२५ रोजी उमेदवाराचे वय २० ते २६ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०२ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००५ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – ग्राऊंड ड्युटी टेक्निकल व नॉन टेक्निकल पदांसाठी – उंची : पुरुष-उंची किमान १५७.५ सें.मी., महिला- उंची किमान १५२ सें.मी. असावी., वजन उंचीच्या प्रमाणात असावे. दृष्टी – •ग्राऊंड ड्युटी टेक्निकलसाठी – प्रत्येक डोळा ६/९, रंगज्ञान (Colour perception) : CP-II ●ग्राऊंड ड्युटी नॉन – टेक्निकलसाठी – अॅडमिनिस्ट्रेशन बँचसाठी – प्रत्येक डोळा ६/६, रंगज्ञान (Colour perception) : CP-II. लॉजिस्टीक आणि अकौंट्स बँचसाठी – चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/१८, रंगज्ञान (Colour perception) : CP-III. उमेदवारांचे गुडघे एकमेकास टेकलेले नसावे. सपाट तळवे, तिरळेपणा, रातांधळेपणा व रंगांधळेपणा असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत. अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१५,६००-३९,१००+ ग्रेड पे ₹ ५,४००+ मिलिटरी सर्व्हिस पे ₹१५,५०० असे वेतन अदा केले जाईल. याशिवाय एअरफोर्सच्या सर्व त्या आकर्षक सोयी, भत्ते, ७५ लाखांचा विमा, दरवर्षी ६० दिवसांची पगारी रजा, २० दिवसांची किरकोळ रजा, प्रवासात सवलत, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी विनामुल्य वैद्यकीय सेवा, कॅन्टिनच्या सोयी इत्यादी सोयी, सवलती अदा केल्या जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्नांची, ३०० गुणांची व २ तास कालावधीची असेल. यामध्ये व्हर्बल ॲबीलिटी इन इंग्लिश, सामान्यज्ञान, अंकगणित, / बुध्दीमापन व मिलीटरी ॲप्टीट्युड या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. ग्राऊंड ड्युटी टेक्निकल बँचसाठी साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेव्यतिरिक्त ४५ मिनिटांची ५० प्रश्नांची आणि १५० गुणांची ऑनलाईन इंजिनिअरींग नॉलेज टेस्ट (EKT) घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची एअरफोर्स सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे (AFSB) मुलाखत घेतली जाईल. मुलाखत एकूण २ स्टेजमध्ये घेतली जाईल. पहिल्या स्टेजमध्ये ऑफिसर इंटेलिजन्स रेटींग टेस्ट तसेच पिक्चर पर्सेप्शन टेस्ट आणि डिस्कशन टेस्ट यांचा समावेश असेल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील अनुत्तीर्ण उमेदवारांना परत पाठवले जाईल. कागदपत्रे तपासणीमधील पात्र उमेदवारांची स्टेज २ मध्ये ग्रुप टेस्ट, सायकॉलॉजीकल टेस्ट व मुलाखत घेतली जाईल. स्टेज २ मधील पात्र उमेदवारांची फ्लाईंग बँचसाठी पायलट कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम टेस्ट (CPSS)/ PABT टेस्ट घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवाराची दिल्ली किंवा बेंगलोर येथे वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. जे उमेदवार अशा मुलाखतींसाठी पहिल्यांदाच हजर राहणार आहेत त्यांना रेल्वेचा/बसचा जाता-येताचा प्रवासखर्च दिला जाईल.
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ओझर (नाशिक), औरंगाबाद ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्राजवळ बेळगाव, पणजी, हैद्राबाद, बेंगलोर अशी परीक्षा केंद्रे आहेत. इतर राज्यातील परीक्षा केंद्रासाठी वेबसाईट पहावी.
मुलाखतीची केंद्रे – डेहराडून, म्हैसूर, गांधीनगर, वाराणसी, फ्लाईंग बँचसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना डेहराडून, म्हैसूर, वाराणसी यापैकी एक परीक्षा केंद्र निवडावे लागेल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत आधार कार्ड तसेच पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ. पैकी एक ओळखपत्र व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे दोन फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण – फ्लाईंग ब्रँच, टेक्निकल ब्रँच, ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी उमेदवारांचे प्रशिक्षण जुलै २०२५ च्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल. फ्लाईंग ब्रँच व ग्राऊंड ड्युटी टेक्निकल ब्रॅचसाठी ७४ आठवड्यांचे तर ग्राऊंड ड्युटी नॉन टेक्निकल साठी बँचसाठी ५२ आठवड्यांचे प्रशिक्षण असेल. प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना फ्लाईंग ऑफिसर या श्रेणीत नियुक्त केले जाईल. प्रशिक्षण काळात नियमाप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹२५०/- अशी असून ती नेट बँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.afcat.cdac.in या वेबसाईटवरून दि. २८ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व / अंगठ्याचा ठसा स्कॅन करुन अपलोड करावा आणि अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अंर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, पुरुष उमेदवारांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, महिला उमेदवारांसाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड ४) गेट परीक्षा उत्तीर्ण असल्यास गेट स्कोअर कार्ड उमेदवारांनी मुलाखतीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास एनसीसी सी प्रमाणपत्र, पदवीच्या अंतिम वर्षास बसलेल्या उमेदवारांनी कॉलेज प्राचार्यांकडून प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक अकौंट पासबूक इ. प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती, त्यांच्या साक्षांकित प्रतींचे दोन संच तसेच पांढरी बॅकराऊंड असलेले २० फोटो (ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे) सोबत घेऊन जाणे आवश्यक. एअरमन आणि शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य यंत्रणेमार्फत भरावेत तसेच मुलाखतीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.afcat.cdac.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २८ जून २०२४
महत्त्वाच्या सूचना – २५ वर्षाच्या आतील उमेदवार अविवाहीत असावेत.
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *