स्टाफ सिलेक्शन : सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) व मिलिटरी इंजि, सर्व्हिसेस इ. विभागांमध्ये ९६८ ज्यु. इंजिनिअर्स पदांसाठी इंजि डिप्लोमा/इंजि. पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १८ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
परीक्षेचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि क्वांटिटी सर्व्हेईंग ॲण्ड कॉन्ट्रॅक्टस्) परीक्षा २०२४
पदभरतीच्या विभागानुसार पात्रता –
पदभरतीचा विभाग – बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (BRO) (फक्त पुरुष उमेदवारांसाठी)
१) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – ४३८ (ओपन १४२, ईडब्ल्यूएस ४८, ओबीसी १३६. अजा ७६, अज ३६)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (सिव्हिल) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल)
पदसंख्या – ३७ (ओपन २७, ईडब्ल्यूएस २, अजा ८)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि. डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
शारीरिक पात्रता – उंची – १५७ सें.मी, वजन किमान ५० कि.ग्रॅ, छाती – न फुगवता – ७५ सें.मी, फूगवून – ८० सें.मी दृष्टी – दोन्ही डोळे ६/१२ किंवा उजवा डोळा ६/६, डावा डोळा ६/२४ असावा,
शारीरिक क्षमता चाचणी – १ मैल धाव १० मिनिटांत पूर्ण करणे,
पदभरतीचा विभाग – सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (CPWD)
३) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – १२१ (ओपन ५१, ईडब्ल्यूएस ११, ओबीसी ३२, अजा १८, अज ९)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील)
पदसंख्या – २१७ (ओपन १२० ईडब्ल्यूएस २१, ओबीसी ५८. अजा ३२, अज १६)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (सिव्हील) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग सेंट्रल वॉटर – पॉवर रिसर्च स्टेशन
५) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – ३ (ओपन १, ओबीसी २)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – २ (ईडब्ल्यूएस १, अज १)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग – सेंट्रल वॉटर कमिशन
७) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – १२० (ओपन ४४, ईडब्ल्यूएस १२, ओबीसी ३९. अजा १९, अज ६)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा/पदवी (सिव्हिल) उत्तीर्ण असावा.
८) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)
पदसंख्या – १२ (ओपन ९, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा/पदवी (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग – सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन
९) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – ३ (ओपन १, ओबीसी २)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा/पदवी (सिव्हिल) उत्तीर्ण
१०) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – २ (ईडब्ल्यूएस १, अज १)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा/पदवी (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग – डायरेक्टरेट ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स, नावल, संरक्षण सेवा
११) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)
पदसंख्या – ३ (ओपन २, ईडब्ल्यूएस १)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा, किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि. डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
१२) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – ३ (ओपन २, अजा १)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
पदभरतीचा विभाग – Farakka Barrage Project
१३) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल),
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा.
१४) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल),
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग – मिलिटरी इंजिनिअरींग सर्व्हिसेस (MES)
१५) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (सिव्हिल) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
१६) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल ॲण्ड मेकॅनिकल)
पात्रता – उमेदवार इंजि. पदवी (इलेक्ट्रीकल/मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ३ वर्षे कालावधीचा इंजि, डिप्लोमा (इलेक्ट्रीकल / मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षे अनुभव आवश्यक.
पदभरतीचा विभाग – नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO)
१७) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – ६ ( ओपन ४ ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा.
पदभरतीचा विभाग – ब्रम्हपुत्रा बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती
१८) पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (सिव्हिल) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजी पद क्रं. ३ व ४ साठी ओपन उमेदवाराचे वय ३२ वर्षांपर्यंत तर उर्वरित सर्व पदांसाठी ३० वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. सेवेदरम्यान अपंगत्व आलेल्या सैनिकांना ३ वर्षे तर अजा/अज सैनिकांना वयात ८ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹९,३००-३४,८०० + ग्रेड पे ₹४,२००/अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारास केंद्र सरकारच्या सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. ०१ ऑगस्ट २०२४ रोजीची धरली जाईल. २) उमेदवाराने नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, आईचे नाव इ. दहावी प्रमाणपत्राप्रमाणेच लिहावे. ३) बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनसाठी अपंग उमेदवार अर्ज करण्यास अपात्र. उर्वरीत विभागांसाठी ४० % अपंगत्व असलेले (एका हाताने एका पायाने / कर्णबधीर) उमेदवार अर्ज करण्यास पात्र. अल्पदृष्टी अपंगत्व असलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
निवड पध्दत – उमेदवारांनी निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा व लेखी मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने पूर्व परीक्षा (पेपर १) घेण्यात येईल. पेपर १ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचा २०० गुणांचा व २ तास कालावधीचा असेल. यामध्ये बुद्धिमत्ता (५० प्रश्न -५० गुण), सामान्यज्ञान (५० प्रश्न -५० गुण) आणि संबंधित विषयाचे ज्ञान (१०० प्रश्न – १०० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असले. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केला जाईल.
पेपर १ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ओपन उमेदवारांनी ३० %, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी २५ % तर अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांनी २० % गुण मिळविणे आवश्यक. पेपर १ मधील पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा (पेपर २) घेण्यात येईल. पेपर २ वर्णनात्मक स्वरुपाचा ३०० गुणांचा व २ तास कालावधीचा असेल. यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. पेपर २ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी ओपन उमेदवारांनी ३० %, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी २५ % तर अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांनी २० % गुण मिळविणे आवश्यक. पेपर २ मधील पात्र उमेदवारांची पेपर १ व पेपर २ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. फक्त बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन विभागासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक पात्रता व शारीरिक क्षमता चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा दिनांक – ४ जून २०२४ ते ०६ जून २०२४
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, जळगाव ही परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्रास जवळची अशी पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, वडोदरा ही परीक्षा केंद्रे आहेत. इतर राज्यातील परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पहावी.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे २ फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹१०० अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबीट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. याशिवाय उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने परीक्षा फी भरु शकतात. अर्जाचा पहिला भाग भरल्यांनतर परीक्षा फी चलन प्राप्त होईल. अजा/अज/अपंग/माजी सैनिक व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी ssc.nic.in या वेबसाईटवरून दि. १८ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो (फोटोवर फोटो काढलेला दिनांक नमुद करणे आवश्यक) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) दहावीचे गुणपत्र/ प्रमाणपत्र ३) आधारकार्ड ४) शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) जात प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊंट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास गॅझेट इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी ssc.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. १८ एप्रिल २०२४
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – दि. १९ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *